नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता श्री स्वामीनारायण गुरुकुल राजकोट संस्थानच्या अमृत महोत्सवाला दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.
श्री स्वामीनारायण गुरुकुल राजकोट संस्थानची स्थापना राजकोट येथे 1948 मध्ये गुरुदेव शास्त्रीजी महाराज श्री धर्मजीवनदासजी स्वामी यांनी केली. संस्थानच्या कार्यक्षेत्राचा विस्तार झाला असून सध्या जगभरात 40 पेक्षा जास्त शाखा आहेत. संस्थानामार्फत 25,000 हून अधिक विद्यार्थ्यांना शालेय, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर शिक्षणाच्या सुविधा पुरवल्या जातात.
S.Kakade/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai