Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

Prime Minister’s meeting with Mr. Osamu Suzuki, Senior Advisor, Suzuki Motor Corporation

Prime Minister’s meeting with Mr. Osamu Suzuki, Senior Advisor, Suzuki Motor Corporation


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 23 मे 2022  रोजी टोकियो येथे  सुझुकी मोटार कॉर्पोरेशनचे वरिष्‍ठ सल्लागार ओसामू सुझुकी यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी पंतप्रधानांनी, सुझुकी यांचे भारताशी असलेले संबंध आणि भारतातले योगदान यांचे स्मरण करत  भारतातल्या वाहन उद्योगामध्‍ये  सुझुकी मोटर्सने बजावलेल्या परिवर्तनात्मक भूमिकेची प्रशंसा केली.  वाहन उद्योग आणि वाहनांचे  सुट्टे भाग क्षेत्रातल्या,उत्पादनाशी संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजने अंतर्गत स्वीकृत अर्जदारांपैकी  सुझुकी मोटर गुजरात प्रायव्‍हेट लिमिटेड आणि मारूती सुझुकी इंडिया लिमिटेड असल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली.

शाश्‍वत विकासाचे लक्ष्‍य साध्‍य करण्‍यासाठी इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरीच्या उत्‍पादनाची सुविधा तसेच पुनर्वापर केंद्रे उभारण्‍यासाठी भारतामध्‍ये आणखी गुंतवणूक करण्‍यासाठी असलेल्या संधींविषयी उभय नेत्यांमध्‍ये यावेळी चर्चा झाली. जपान- इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग (जेआयएम) आणि जपान एनडोव्हड  कोर्सेस (जेइसी) यांच्‍या माध्‍यमातून कौशल्य विकासासह भारतातील स्‍थानिक नवोन्मेश प्रणाली उभारण्याच्या धोरणांवरही पंतप्रधान मोदी आणि सुझुकी यांच्यामध्‍ये चर्चा झाली.

***

SB/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com