Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

I2U2 शिखर संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन

I2U2 शिखर संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन


नवी दिल्ली, 14 जुलै 2022

 

महामहीम पंतप्रधान लापीद, महामहीम शेख मोहम्मद बिन ज़ायेद अल नहयान, महामहीम राष्ट्रपती बायडेन

पंतप्रधानपदाचा कार्यभार ग्रहण केल्याबद्दल सर्वप्रथम पंतप्रधान लापीद यांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा 

आजच्या परिषदेचे यजमानपद भूषवल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. ही बैठक खरोखरीच धोरणात्मक भागीदारांची बैठक आहे. आपण सर्वजण चांगले मित्र आहोत आणि वैचारिक पातळीवर आपल्या दृष्टिकोनामध्ये समानता आहे.

महामहीम महोदय, आजच्या या पहिल्या शिखर संमेलनातच “आय-टू-यू-टूच्या सकारात्मक घोषणापत्राची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. आपण अनेक क्षेत्रांमध्ये संयुक्त प्रकल्पांना निर्देशित केले असून त्यादृष्टीने मार्गाची रूपरेषा ठरवली आहे.

“आय-टू-यू-टू आराखड्याअंतर्गत जल, उर्जा, परिवहन, अंतराळ, आरोग्य आणि अन्नसुरक्षा या सहा महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये संयुक्त गुंतवणूक वाढवण्यावर आपली सहमती झाली आहे. “आय-टू-यू-टू चा दृष्टीकोन आणि अजेंडा प्रगतीशील आणि व्यवहार्य आहे, हे स्पष्ट आहे.

आपापल्या देशाचे सामर्थ्य, भांडवल, नैपुण्य आणि बाजारपेठांना सक्रीय करून आपण आपला  अजेंडा गतिमान करू शकतो आणि जागतिक अर्थव्यवस्थेत महत्वपूर्ण योगदान देऊ शकतो.

वाढत्या जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आपल्यातला समन्वय  व्यावहारिक सहकार्याचे एक आदर्श उदाहरण आहे.

मला पूर्ण विश्वास आहे की “आय-टू-यू-टूच्या सहाय्याने आपण जागतिक स्तरावर उर्जा, सुरक्षा,अन्नधान्य सुरक्षा आणि आर्थिक विकासात उल्लेखनीय योगदान देऊ.

धन्यवाद!

 

S.Patil/B.Sontakke/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com