नवी दिल्लीत स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून, लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून उत्सव पाहण्यासाठी आणि सहभागी होण्यासाठी देशभरातील 50 परिचारिकांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. विशेष पाहुण्यांमध्ये सरपंच, शिक्षक, शेतकरी, मच्छीमार अशा विविध क्षेत्रातल्या 1800 विशेष पाहुण्यांचा सहभाग होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे भाग्य बदलण्यासाठी परिचारिका, डॉक्टर आणि इतरांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. ते म्हणाले की, कोविडने आपल्याला शिकवले आहे की मानव केंद्रित दृष्टिकोनाशिवाय जगाचा विकास शक्य नाही.
Addressing the nation on Independence Day. https://t.co/DGrFjG70pA
— Narendra Modi (@narendramodi) August 15, 2023
देशातील सार्वत्रिक आरोग्य सेवेचा विस्तार सुधारण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांवर जोर देऊन ते म्हणाले की, सरकारने त्यासाठी 70,000 कोटी रुपये आयुष्मान भारत मध्ये खर्च केले आहेत ज्यामुळे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना वार्षिक 5 लाख रुपयांची आरोग्य हमी प्रदान करून देण्यात आली आहे.
200 करोड़ वैक्सिनेशन का काम हमारी आंगनवाड़ी वर्कर, आशा वर्कर, हेल्थ वर्कर ने करके दिखाया है।#IndependenceDayIndia pic.twitter.com/3uzC6LPL3a
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) August 15, 2023
यावेळी आपल्या संबोधनात, पंतप्रधानांनी 200 कोटींहून अधिक कोविड लसीकरणाचा टप्पा गाठण्यासाठी आरोग्य कर्मचार्यांच्या विशेषत: अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांच्या समर्पण आणि सातत्यपूर्ण योगदानाचे कौतुक केले. “कोविडच्या काळात आणि नंतर जगाला मदत केल्याने भारताला जगाचा मित्र म्हणून स्थापित केले आहे,” असंही पंतप्रधानांनी नमूद केलं.
एक पृथ्वी, एक आरोग्य आणि एक भविष्य या संकल्पनेवर प्रकाश टाकताना ते म्हणाले, “जनऔषधी केंद्रांनी देशातील मध्यमवर्गीयांना 20,000 कोटी रुपयांची बचत करून नवीन बळ दिले आहे.. जनऔषधी केंद्रांची संख्या सध्याच्या 10 हजार केंद्रांवरून 25,000 पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट घेऊन आगामी काळात देश काम करणार आहे, अशी ग्वाही प्रधानमंत्र्यांनी दिली.
***
Snoal T/Shailesh M/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Addressing the nation on Independence Day. https://t.co/DGrFjG70pA
— Narendra Modi (@narendramodi) August 15, 2023
200 करोड़ वैक्सिनेशन का काम हमारी आंगनवाड़ी वर्कर, आशा वर्कर, हेल्थ वर्कर ने करके दिखाया है।#IndependenceDayIndia pic.twitter.com/3uzC6LPL3a
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) August 15, 2023