Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

4 ते 8 जूनदरम्यान पंतप्रधान मोदी 5 राष्ट्रांच्या दौऱ्यावर


पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 ते 8 जून 2016 या कालावधीत अफगाणिस्तान, कतार, स्वित्झर्लंड, अमेरिका आणि मॅक्सिको या पाच देशांचा दौरा करणार आहेत. पंतप्रधानांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटमधील श्रृंखलांमध्ये म्हटले आहे की, “उद्याच्या अफगाणिस्तान दौऱ्यासाठी मी खूपच उत्सूक आहे. मी उद्या अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घानी यांच्यासोबत हेरात प्रांतातील अफगाणिस्तान-भारत मैत्री धरणाचे उद्‌घाटन करणार आहे. हे धरण आपल्या मैत्रीचे प्रतीक आहे आणि हे धरण आमच्या आशा पल्लवीत करण्यासोबतच घरांना प्रज्वलीत करेल, हेरातमधील शेतजमिनीला सकस करेल आणि या प्रांतातील लोकांच्या जीवनात समृध्दी घेऊन येईल.

मी, माझे मित्र राष्ट्रपती अशरफ घानी यांना भेटण्यासाठी आणि भविष्यात द्विपक्षीय सहकार्यासाठी क्षेत्रीय स्थिती आणि विषय सूची तयार करण्यासाठी त्यांच्यासोबत विचार विनिमय करण्याकरिता उत्सूक आहे.

कतारचे महामहिम अमीर कॉफ यांच्या नियंत्रणावरुन मी 4 आणि 5 ला कतारचा दौरा करणार आहे.

मी महामहिम शेख तमीम यांना भेटण्यासाठी देखील उत्सूक आहे, ज्यांच्या गेल्यावर्षीच्या ऐतिहासिक भारत दौऱ्यामुळे उभय देशांच्या संबंधांना एक नवी दिशा प्रदान केली.

मला फादर अमीर यांना भेटण्याचे देखील सौभाग्य प्राप्त होणार आहे. ज्यांनी व्यक्तीश: मागील दोन दशकांपासून आपल्या संबंधांना मार्गदर्शन केले आहे.

हा दौरा आमच्या मैत्रीच्या नात्याला अधिक वृध्दींगत करेल. लोकांचा आपसातील संवाद, ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक भागीदारी यामध्येही या भेटीमुळे वाढ होईल.

मी कामगारांच्या शिबिरामध्ये जाऊन भारतीय कामगार आणि काही सदस्यांसोबत चर्चा करणार आहे. तिथे 6 लाखांहून अधिक भारतीय आपल्या मेहनतीने आणि घामाने आपल्या संबंधांची जपणूक करत आहेत. व्यापार आणि गुंतवणूक सहकार्यातील क्षमतांचा पूर्ण उपयोग करून घेण्यासाठी मी कतारमधील व्यापाऱ्यांची भेट घेणार आहे.

युरोपमधील आमचे प्रमुख भागीदार स्वित्झर्लंडच्या द्विपक्षीय दौऱ्यावर मी 5 जूनला संध्याकाळी जिनेवा येथे पोहोचेन. आपले द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सहकार्याला वृध्दींगत करण्यासाठी मी राष्ट्रपती स्केशनायडर-अम्मान यांची भेट घेणार आहे.

जिनेवामध्ये मी प्रमुख व्यापाऱ्यांसोबत बैठक करणार आहे. आर्थिक आणि गुंतवणूक संबंधांचा विस्तार करणे हा आमचा मुख्य विषय असणार आहे. मी सीईआरएनमध्ये काम करणाऱ्या वैज्ञानिकांची भेट घेणार आहे. मानवतेच्या सेवेमध्ये विज्ञानामधील नवीन क्षेत्रातील योजनाबद्दल भारताला त्यांच्यावर गर्व आहे.

राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या आमंत्रणाला मान देऊन मी 6 जूनला संध्याकाळी वॉशिंग्टन डीसीला जाणार आहे.

7 जूनला राष्ट्राध्यक्षांसोबत होणाऱ्या बैठकीत उभय देशांच्या विविध क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारीमध्ये नवीन उत्साह व गती प्रदान करण्याच्या दिशेने चर्चा करू.

मी यूएसआयबीसीच्या 40 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करणार आहे आणि अमेरिकेतल्या दिग्गज व्यापाऱ्यांची भेट घेणार आहे. ज्यांनी मागील दोन वर्षात भारतामध्ये नवीन विश्वास दाखवला आहे.

मी अमेरिकेतल्या विचारवंतांसोबत माझ्या विचारांचे अदान प्रदान करणार आहे आणि भारतीय प्राचीन वस्तू परत आणण्यासंदर्भातल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.

आर्लिंग्टन स्मशानभूमीच्या दौऱ्यादरम्यान मी अज्ञात सैनिकांच्या स्मृतिस्थळावर आणि अंतराळ शटल कोलंबिया स्मारकाला भेट देऊन भारतीय वंशाच्या अंतराळ वीर कल्पना चावला यांना देखील पुष्पांजली अर्पित करणार आहे.

8 जूनला मी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहे. काँग्रेसजन आणि संसद सदस्यांसोबत माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी अध्यक्ष पॉल रयान यांचे आभार मानतो.

अमेरिकेच्या राजधानीच्या दौऱ्यादरम्यान मी संसद सदस्यांसोबत चर्चा करणार आहे, अधिकाधिक सदस्य हे भारताचे महत्त्वपूर्ण मित्र आहेत.

भारत आणि अमेरिका हे नैसर्गिक भागीदार आहेत. दोन अशा लोकशाही आहेत ज्या आपल्या विविधता व बहत्ववाद साजरे करतात. भारत-अमेरिकेच्या मजबूत संबंधांमुळे फक्त दोन्ही देशांना लाभच होणार नाही तर संपूर्ण जगाला फायदा होणार आहे.

अमेरिका क्षेत्रात विशेषाधिकार प्राप्त भागीदार मॅक्सिकोच्या माझ्या दौऱ्यादरम्यान मी 8 जूनला राष्ट्रपती पेना नीटो यांना भेटण्यास उत्सूक आहे. राष्ट्रपती पेना नीटो यांनी दूरगामी सुधारणांना सुरुवात केली आहे. मी माझे अनुभव सांगण्यास उत्सूक आहे. 30 वर्षानंतर एखादा भारतीय पंतप्रधान मॅक्सिकोच्या द्वीपक्षीय दौऱ्यावर जात आहे. तसं पाहायला गेले तर हा एक छोटा दौरा आहे परंतु याची विषय सूची खूप महत्वपूर्ण आहे. जी आपल्या भागीदारीला नवीन उंचीवर नेऊन ठेवेल.

S.Mhatre/B.Gokhale