पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात आयोजित राष्ट्रकुल कायदे शिक्षण संघटना (सी. एल. ई. ए.)- राष्ट्रकुल देशांच्या विधीज्ञ आणि महाधिवक्ता परिषद (सी. ए. एस. जी. सी.) 2024 चे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान यावेळी उपस्थितांना संबोधितही करतील.
‘न्यायदानातील सीमापार आव्हाने’ ही या परिषदेची संकल्पना आहे. या परिषदेत कायदा आणि न्याय यांच्याशी संबंधित न्यायिक संक्रमण आणि कायदेशीर प्रक्रियेचे नैतिक आयाम, कार्यकारी उत्तरदायित्व तसेच आधुनिक काळातील कायदे शिक्षणाचा फेरविचार यासारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होईल.
या परिषदेत विविध आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसह आशिया-प्रशांत, आफ्रिका आणि कॅरिबियन क्षेत्रात पसरलेल्या राष्ट्रकुल देशांचे महाधिवक्ता आणि विधीज्ञ सहभागी होतील. राष्ट्रकुल देशातील कायदे क्षेत्रामधील विविध घटकांमध्ये संवाद साधण्यासाठी एक मंच प्रदान करून ही परिषद एक महत्वाचे अनोखे व्यासपीठ म्हणून काम करते. कायदे शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय न्यायदानातील आव्हानांचा सामना करण्यासाठी एक सर्वसमावेशक आराखडा विकसित करण्याच्या उद्देशाने विधीज्ञ आणि महाधिवक्ता यांच्यासाठी आयोजित केलेल्या विशेष गोलमेज परिषदेचाही यात समावेश आहे.
***
NM/Vinayak G/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai