Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

25 ऑक्टोबरला ‘मन की बात’; जनतेने सूचना आणि व्हॉईस मॅसेजेस पाठवावेत-पंतप्रधान


येत्या रविवारी 25 ऑक्टोबरला होणाऱ्या ‘मन की बात’च्या पुढील भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांसमोर आपले विचार मांडतील. या कार्यक्रमासाठी जनतेने आपल्या कल्पना MyGov Open Forum वर कळवाव्यात असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

येत्या रविवारी होणाऱ्या मन की बात कार्यक्रमासाठी काही कल्पना आहेत का? असल्यास त्या MyGov Open Forum वर पाठवा, असे ट्वीटही पंतप्रधानांनी केले आहे.
तसेच या कार्यक्रमासाठी 1800-3000-7800 या टोलफ्री क्रमांकावर आपले व्हाईस मेसेजेस पाठवावेत, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे. आलेल्या व्हॉईस मॅसेजेसपैकी काही निवडक मॅसेजेसचा समावेश कार्यक्रमात केला जाऊ शकतो.

येत्या रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमाचा तेरावा भाग असून तो सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित होईल.

हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरुन तसेच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन थेट प्रसारित करण्यात येईल. पंतप्रधान कार्यालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि डीडीन्यूजच्या यूट्यूब चॅनेल्सवरुनही त्यांचे थेट प्रसारण केले जाईल.

संबंधित आकाशवाणी केंद्रांवरुन 25 ऑक्टोबर 2015 रोजी रात्री 8 वाजता प्रादेशिक भाषांमधून हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल.

J.Patankar/S.Tupe/N.Sapre