नवी दिल्ली, 4 जुलै 2023
आदरणीय मान्यवर,
नमस्कार!
आज या तेविसाव्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत, तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. संपूर्ण आशिया खंडात गेल्या दोन दशकांमध्ये शांतता, समृद्धी आणि विकासासाठी एस सी ओ एक महत्वपूर्ण व्यासपीठ म्हणून उदयाला आले आहे. भारत आणि या प्रदेशातील हजारो वर्षांपासूनचे सांस्कृतिक बंध आणि लोकांचे लोकांशी असलेले संबंध हे आपल्या एकत्रित वारशाचे जिवंत उदाहरण आहे. आम्ही हे क्षेत्र एक विस्तारित शेजार म्हणून नव्हे तर एक विस्तारित कुटुंब म्हणून पाहतो.
मान्यवर,
एस सी ओ चा अध्यक्ष या नात्याने भारताने आपले बहुआयामी सहकार्य एका नवीन उंचीवर नेले आहे. आमचे सर्व प्रयत्न दोन मूलभूत तत्वांवर आधारित आहेत. पहिले म्हणजे वसुधैव कुटुंबकम अर्थात हे संपूर्ण विश्व माझे घर आहे. हे तत्व प्राचीन काळापासून आमच्या सामाजिक वागणुकीचा एक अविभाज्य भाग आहे. हे आजच्या आधुनिक काळात प्रेरणा आणि ऊर्जेचा एक कायम स्रोत बनले आहे. दुसरे तत्व म्हणजे SECURE, ज्याचा अर्थ सुरक्षा, आर्थिक विकास, संपर्क, एकता, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर आणि पर्यावरणाचे संरक्षण असा आहे. यातून आमच्या अध्यक्षपदाची संकल्पना आणि एस सी ओ ची दृष्टी प्रतिबिंबित करते.
हा दृष्टिकोन ठेवून भारताने, एस सी ओ समवेत सहकार्याचे पाच नवीन स्तंभ स्थापित केले आहेत:
मान्यवर,
भारताच्या एस सी ओ अध्यक्षपदाखाली आम्ही एस सी ओ मध्ये एकशे चाळीस पेक्षा जास्त कार्यक्रम, परिषदा आणि बैठका आयोजित केल्या आहेत. आम्ही वेगवेगळ्या चौदा कार्यक्रमांमध्ये एस सी ओ चे सर्व निरीक्षक आणि संवाद भागीदारांना समाविष्ट करून घेतले. एस सी ओ च्या चौदा मंत्री स्तरीय बैठकांदरम्यान आम्ही अनेक महत्वाचे दस्तावेज एकत्रितरित्या तयार केले. यासोबतच आम्ही आमच्या सहकार्याला काही नवीन आणि आधुनिक पैलू जोडत आहोत.
जसे की
एस सी ओ मधील हे सहकार्य केवळ शासकीय पातळीवर मर्यादित राहू नये याची काळजी भारताने घेतली आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली लोकांमध्ये संपर्क आणि आपलेपणा वाढीला लागावा या दृष्टीने नवीन उपक्रम सुरु करण्यात आले आहेत. प्रथमच, एस सी ओ भरड धान्य महोत्सव, चित्रपट महोत्सव , एस सी ओ सूरजकुंड कलाकृती मेळा, विचारवंतांच्या परिषदा आणि एकत्रित बौद्ध वारसा या विषयांवर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती.
एस सी ओ ची पहिली पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी, पवित्र शहर वाराणसी, हे विविध कार्यक्रमांसाठी एक आकर्षण स्थान बनले आहे. एस सी ओ राष्ट्रांमधील युवावर्गाची प्रतिभा आणि ऊर्जा वृद्धिंगत करण्यासाठी आम्ही युवा शास्त्रज्ञ संमेलन, युवा साहित्यिक परिषद, युवा निवासी गुणवंत कार्यक्रम, स्टार्ट अप मंच आणि युवा परिषद सारख्या नवनवीन मंचाचे आयोजन केले.
मान्यवर,
सध्याचा काळ हा जागतिक घडामोडींचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
वादविवाद, ताणतणाव आणि महामारीने घेरलेल्या या जगात अन्न, इंधन आणि खतांचा तुटवडा हे सर्व राष्ट्रांसमोरचे एक महत्वाचे आव्हान आहे.
आपल्या लोकांच्या आशा-आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी एक संघटना म्हणून आपण सक्षम आहोत का, यावर आपण एकत्रितपणे विचार केला पाहिजे?
आधुनिक युगातील आव्हाने पेलण्यासाठी आपण सज्ज आहोत का?
एस सी ओ भविष्यासाठी पूर्णपणे तयार असलेली संघटना म्हणून विकसित होत आहे का?
या संदर्भात, एस सी ओ मध्ये सुधारणा आणि आधुनिकता आणण्यासाठी भारत काही प्रस्तावांचे समर्थन करत आहे.
संपूर्ण एस सी ओ मध्ये भाषेचा अडथळा दूर करण्याच्या उद्देशाने कृत्रिम बुद्धित्मतेवर आधारित भारताचे भाषिणी हे भाषा व्यासपीठ, सर्वांना सामायिक करण्यात आम्हाला आनंद होईल.
संयुक्त राष्ट्रांसह जागतिक संस्थांमधील सुधारणांसाठी एससीओ एक महत्त्वाचा आवाज बनू शकतो.
आज इराण SCO परिवारात नवीन सदस्य म्हणून सामील होणार आहे, याचा मला मनापासून आनंद वाटतो.
याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष रायसी आणि इराणच्या जनतेला अनेकानेक शुभेच्छा देतो.
त्याचबरोबर, SCO सदस्यत्वासाठीच्या Memorandum of Obligation वर बेलारूसने स्वाक्षरी केली, त्याचेही आम्ही स्वागत करतो.
आज SCO मध्ये सहभागी होण्यास इतर देशांचे वाढते स्वारस्य, हे या संघटनेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी पुरेसे आहे.
या प्रक्रियेदरम्यान मध्य-आशियाई देशांचे हित आणि आकांक्षा यावर SCO चे लक्ष केंद्रीत राहणे गरजेचे आहे.
आदरणीय मान्यवर हो,
प्रादेशिक आणि जागतिक शांततेसाठी दहशतवाद हा सर्वात मोठा धोका आहे. या आव्हानाशी दोन हात करण्यासाठी निर्णायक कृती आवश्यक आहे. दहशतवादाचे स्वरूप कोणतेही असो, अभिव्यक्ती कोणतीही असो, आपल्याला त्याच्याविरुद्ध एकत्रितपणे लढायचे आहे. काही देश आपली धोरणे विचारात घेऊन सीमेपलिकडच्या दहशतवादाचा वापर करतात. दहशतवाद्यांना आश्रय देतात. SCO ने अशा देशांवर टीका करताना मागेपुढे पाहू नये. अशा गंभीर विषयाच्या बाबतीत दुटप्पीपणाला जागा असता कामा नये. दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा रोखण्यासाठी आपण परस्पर सहकार्य वाढवले पाहिजे. या कामी SCO ची RATS यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावते आहे. आपल्या देशातील तरुणांमध्ये कट्टरतावादाचा प्रसार रोखण्यासाठी आपण आणखी सक्रिय पावले उचलली पाहिजेत. कट्टरतावादाच्या मुद्द्यावर आज जारी करण्यात आलेले संयुक्त निवेदन हे आमच्या सामायिक वचनबद्धतेचे प्रतीक आहे.
आदरणीय मान्यवर हो,
अफगाणिस्तानातील परिस्थितीचा थेट परिणाम आपल्या सर्वांच्या सुरक्षेवर झाला आहे. अफगाणिस्तानबाबत भारताच्या चिंता आणि अपेक्षा SCO च्या बहुतांश देशांसारख्याच आहेत. अफगाणिस्तानमधील जनतेच्या कल्याणासाठी आपल्याला एकत्रित प्रयत्न करावे लागतील. अफगाणी नागरिकांना मानवतावादी मदत; सर्वसमावेशक सरकारची निर्मिती; दहशतवाद आणि अंमली पदार्थांच्या तस्करीविरूद्ध लढा; आणि महिला, मुले आणि अल्पसंख्याकांचे हक्क सुनिश्चित करणे या आमच्या सामायिक प्राधान्याच्या बाबी आहेत. शतकानुशतके भारत आणि अफगाणिस्तानमधील जनतेचे परस्परांशी मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. गेल्या दोन दशकांमध्ये आम्ही अफगाणिस्तानच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात योगदान दिले आहे. 2021 च्या घटनाक्रमानंतरही आम्ही मानवतावादी दृष्टीकोनातून मदत पाठवणे सुरू ठेवले आहे. शेजारी देशांना अस्थिर करण्यासाठी किंवा अतिरेकी विचारसरणीला प्रोत्साहन देण्यासाठी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर केला जाणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
आदरणीय मान्यवर हो,
कोणत्याही क्षेत्राच्या प्रगतीसाठी सक्षम जोडणी खूप महत्त्वाची असते. उत्तम जोडणीमुळे केवळ परस्परांसोबतचा व्यवसाय वाढत नाही तर परस्परांबद्दल विश्वासाची भावनाही वाढीला लागते. मात्र या प्रयत्नांमध्ये, SCO सनदेतील मूलभूत तत्त्वांचा, विशेषत: सदस्य देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करणे आवश्यक आहे. इराणच्या SCO सदस्यत्वानंतर चाबहार बंदराचा अधिक चांगला वापर करण्यासाठी आपण काम करू शकतो. इंटरनॅशनल नॉर्थ-साउथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर हा मध्य आशियातील भूपरिवेष्टित देशांसाठी हिंदी महासागरापर्यंत पोहोचण्याचा सुरक्षित आणि सोपा मार्ग बनू शकतो. त्याची पूर्ण क्षमता आपण ओळखली पाहिजे.
आदरणीय मान्यवर हो,
SCO जगातील चाळीस टक्के लोकांचे आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील सुमारे एक तृतीयांश लोकांचे प्रतिनिधित्व करते. आणि म्हणूनच परस्परांच्या गरजा आणि संवेदनशीलता समजून घेणे, ही आपली सामायिक जबाबदारी ठरते. उत्तम सहकार्य आणि समन्वयाच्या माध्यमातून आपण सर्व आव्हानांवर मात केली पाहिजे. आणि आपल्या लोकांच्या कल्याणासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत. भारताचे अध्यक्षपद यशस्वी करण्यासाठी आपणा सर्वांचे सतत सहकार्य लाभले. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो. संपूर्ण भारताच्या वतीने, मी SCO चे पुढील अध्यक्ष, कझाकस्तानचे अध्यक्ष आणि माझे मित्र राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांना मी शुभेच्छा देतो. SCO च्या यशासाठी, भारत सर्वांच्या सोबतीने सक्रियपणे योगदान देण्यासाठी वचनबद्ध आहे.
अनेकानेक आभार!
Jaydevi PS/B.Sontakke/M.Pange/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
Addressing the SCO Summit. https://t.co/oO9B1nnXer
— Narendra Modi (@narendramodi) July 4, 2023
पिछले दो दशकों में, SCO, पूरे यूरेशिया क्षेत्र में, शान्ति, समृद्धि और विकास के लिए एक महत्वपूर्ण प्लेटफार्म के रूप में उभरा है।
— PMO India (@PMOIndia) July 4, 2023
इस क्षेत्र के साथ, भारत के हजारों वर्ष पुराने सांस्कृतिक और people to people संबंध, हमारी साझा विरासत का जीवंत प्रमाण हैं। pic.twitter.com/brBBHAVw7a
SCO के अध्यक्ष के रूप में, भारत ने हमारे बहुआयामी सहयोग को नयी ऊंचाइयों तक ले जाने के लिए निरंतर प्रयास किये हैं।
— PMO India (@PMOIndia) July 4, 2023
इन सभी प्रयासों को हमने 2 मूलभूत सिद्धांतों पर आधारित किया है: PM pic.twitter.com/EG0TE8UjMJ
भारत ने SCO में सहयोग के पाँच नए स्तंभ बनाए हैं। pic.twitter.com/Av9xsd1ooF
— PMO India (@PMOIndia) July 4, 2023
विवादों, तनावों और महामारी से घिरे विश्व में food, fuel और fertilizer crisis सभी देशों के लिए एक बड़ी चुनौती है। pic.twitter.com/w7p48o3ItQ
— PMO India (@PMOIndia) July 4, 2023
आतंकवाद चाहे किसी भी रूप में हो, किसी भी अभिव्यक्ति में हो, हमें इसके विरुद्ध मिलकर लड़ाई करनी होगी। pic.twitter.com/EeGXJoONhB
— PMO India (@PMOIndia) July 4, 2023
अफ़ग़ानिस्तान को लेकर भारत की चिंताएं और अपेक्षाएं SCO के अधिकांश देशों के समान हैं। pic.twitter.com/WTTj2EQCPP
— PMO India (@PMOIndia) July 4, 2023