नवी दिल्ली, 9 जुलै 2024
रशिया आणि भारत यांच्यात मॉस्को येथे 8-9 जुलै 2024 रोजी पार पडलेल्या 22 व्या वार्षिक द्विपक्षीय शिखर परिषदेनंतर, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षीय व्यावहारिक सहकार्याच्या विद्यमान मुद्द्यांवर आणि रशिया-भारत विशेष आणि विशेषाधिकार धोरणात्मक भागीदारीच्या विकासाबाबत विचारांचे आदानप्रदान केले.
परस्पर आदर आणि समानतेच्या तत्त्वांचे दृढतेने पालन करून, परस्पर फायदेशीर आणि दीर्घकालीन आधारावर दोन्ही देशांचा सार्वभौम विकास, रशिया-भारत व्यापार आणि आर्थिक सहकार्याला चालना देऊन द्विपक्षीय परस्पर संवादाला अतिरिक्त प्रोत्साहन देणे, दोन्ही राज्यांमधील वस्तू आणि सेवांमधील व्यापाराच्या गतिमान वाढीचा कल कायम ठेवण्याच्या आणि 2030 पर्यंत लक्षणीय वाढ सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने खालील घोषणा केल्या :
रशिया आणि भारत यांच्यात पुढील नऊ प्रमुख क्षेत्रांसह द्विपक्षीय आर्थिक सहकार्य विकसित करण्याची योजना आहे:
रशियाचे अध्यक्ष आणि भारताच्या पंतप्रधानांनी व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक सहकार्यावरील रशियन-भारतीय आंतरशासकीय आयोगाला विवक्षित प्राधान्य क्षेत्रांचा अभ्यास करून पुढील बैठकीत त्याच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्याचे निर्देश दिले.
* * *
N.Chitale/Sushma/Vasanti/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Held productive discussions with President Putin at the Kremlin today. Our talks covered ways to diversify India-Russia cooperation in sectors such as trade, commerce, security, agriculture, technology and innovation. We attach great importance to boosting connectivity and… pic.twitter.com/JfiidtNYa8
— Narendra Modi (@narendramodi) July 9, 2024