नवी दिल्ली, 6 एप्रिल 2025
पंतप्रधान – स्वागत आहे मित्रांनो!
श्रीलंकेचे खेळाडू – धन्यवाद, धन्यवाद सर!
पंतप्रधान – स्वागत आहे!
पंतप्रधान – मला बरं वाटतय की मला तुम्हा सर्वांना भेटण्याची संधी मिळाली आणि मला वाटते की तुमचा संघ असा आहे की आजही भारतातील लोक तो लक्षात ठेवतात….कशी गोलंदाजांची धुलाई करुन तुम्ही आला होता, ते लोक विसरलेले नाहीत.
श्रीलंकेचे खेळाडू– सर, आज तुमची भेट होणे हा एक मोठा सन्मान आणि आमचे सद्भाग्य आहे, आणि तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आम्हाला वेळ आणि भेटण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही तुमचे खूप आभारी आहोत.
पंतप्रधान – आता तुमच्यापैकी असे किती जण आहात, ज्यांचा भारताशी काही ना काही संबंध येत राहतो?
श्रीलंकेचे खेळाडू- मला वाटतं सर, जवळपास प्रत्येकाचा येतो.
पंतप्रधान – अच्छा…. बरं! सनथचा कशाप्रकारे येतो?
श्रीलंकेचा खेळाडू-मी मुंबई इंडियन्ससोबत होतो सर आणि आमच्यातील बहुतेक खेळाडू आयपीएल खेळले आहेत.
पंतप्रधान-अच्छा….. आयपीएल खेळला आहात!
श्रीलंकेचा खेळाडू- आणि कुमार धर्मसेना तेव्हा पंच होते
पंतप्रधान-हं!
श्रीलंकेचा खेळाडू- होय… कारण त्यामुळे…( बाकी आवाज अस्पष्ट)
पंतप्रधान- 2010 मध्ये कदाचित तुम्ही अहमदाबादमध्ये खेळत असताना मला वाटते तुम्ही पंच होता…. मी सामना पाहण्यासाठी आलो होतो. मी तेव्हा मुख्यमंत्री होतो. जेव्हा भारताने 1983 मध्ये विश्वचषक जिंकला आणि तुम्ही सर्वांनी 1996 मध्ये विश्वचषक जिंकला, तेव्हा दोघांनीही एका प्रकारे क्रिकेटचे विश्व बदलून टाकले आणि मला तर वाटते की टी-20 चा जन्म तर…. तुम्ही ज्याप्रकारे 1996 मध्ये खेळलात त्या तुमच्या खेळण्याच्या शैलीतून झाला. मला इतरांकडूनही ऐकायला आवडेल की ते आजकाल काय करत आहेत? तुम्हाला काय सांगायचे आहे? क्रिकेटशी तुम्ही सध्या कसे निगडित आहात? तुम्ही अजूनही प्रशिक्षक आहात का?
श्रीलंकेचा खेळाडू– यापैकी बहुतेक खेळाडू सध्या क्रिकेटमध्ये गुंतलेले आहेत आणि मला वाटते की आज त्यांना अंतिम सामन्यात खेळण्यापेक्षा, तुम्हाला भेटताना जास्त भारावून गेले आहेत.
श्रीलंकेचा खेळाडू– मला वाटते की आम्ही अशा परिस्थितीवर, वेगवेगळ्या विषयांवर बोलू इच्छितो…. आम्ही 1996 मध्ये विश्वचषक जिंकला होता, परंतु आम्ही जिंकण्याचे एक कारण म्हणजे त्या वेळी श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाकडून दोन गोष्टी आल्या नव्हत्या, आम्ही… (बाकी आवाज अस्पष्ट)
पंतप्रधान- बॉम्बस्फोट!
श्रीलंकेचा खेळाडू- हो आणि भारताने आम्हाला मदत केली. जगाला दाखवण्यासाठी की ते एक सुरक्षित ठिकाण आहे….. भारताला खेळायला पाठवले… आणि हेच एक कारण आहे की श्रीलंका संघ विश्वचषक जिंकू शकला. म्हणून आम्ही भारताचे खूप आभारी आहोत.
पंतप्रधान – मला आठवतंय…त्यावेळी जेव्हा भारताने निर्णय घेतला की आपण जायचं…. तर जेव्हा बॉम्बस्फोटानंतर सर्व संघ पळून जात होते, तेव्हा मी पाहिले की तुमच्या सर्व खेळाडूंनी, भारताने मोठी खिलाडूवृत्ती दाखवली…. याचे खूप कौतुक केले कारण श्रीलंकेचे लोक ज्या अडचणींना तोंड देत होते तेव्हा त्यांना त्यांच्या नशिबावर सोडून न देता, आम्ही देखील आलो…. चला बाबांनो….आपण जाऊ… काय होते ते पाहूया. त्यामुळे तुमच्या क्रीडा जगतात त्याचे खूप कौतुक झाले. आजही भारतातील लोकांमध्ये तीच खेळाची भावना होती. एका बाजूला बॉम्बस्फोट होत होते आणि दुसऱ्या बाजूला खेळाडूंचा उत्साह होता आणि खेळ भावनेने बॉम्बस्फोटांवर विजय मिळवला. आणि एवढेच नाही तर ती भावना आजही आहे. 1996 मध्ये झालेल्या त्या बॉम्बस्फोटाप्रमाणे…. ज्याने संपूर्ण श्रीलंकेला हादरवून टाकले…..2019 मध्ये श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर आणि चर्चमध्ये तशी ती घटना घडल्यानंतर लगेचच श्रीलंकेत येणारा मी पहिला जागतिक नेता होतो. त्यावेळी, बॉम्बस्फोटानंतरही भारतीय संघ आला होता. यावेळी, मी बॉम्बस्फोटानंतर आलो आहे. याचा अर्थ तीच भावना कायम आहे. श्रीलंकेच्या प्रत्येक सुख-दुःखात सोबत राहणे ही भारताची भावना जशीच्या तशी आहे.
श्रीलंकेचा खेळाडू- श्रीलंकेचा एक नागरिक म्हणून, शेजारी देश म्हणून, मी तुमच्या अहमदाबादच्या मैदानावर विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पंच होतो. ते संपूर्ण जगातील सर्वात मोठे मैदान आहे. खरं तर, ते एक अद्भुत वातावरण आणि क्रिकेटसाठी एक उत्तम मैदान होते. आणि मला वाटतं की प्रत्येकाला तिथे खेळायला आणि पंचगिरी करायला आवडते.
श्रीलंकेचा खेळाडू- सर, माझा पहिला दौरा 1990 मध्ये झाला होता… माझे पहिले वर्ष. तो माझा पहिला दौरा होता. आणि त्याच आठवणी माझ्या मनात आहेत, कारण मी भारतात एक महिनाभर होतो. मी पाच दिवसांपूर्वी आलो होतो. आम्ही नियमितपणे भारताला भेट देतो. आणि मी म्हणेन की, जेव्हा जेव्हा श्रीलंका संकटात असते, विशेषतः आर्थिकदृष्ट्या, तेव्हा भारत पाठिंबा देण्यासाठी नेहमीच पुढे येतो आणि म्हणून आम्ही भारताचे नेहमीच आभारी आहोत… कारण आम्हाला वाटते की भारत आमचा भाऊ आहे. म्हणून जेव्हा आम्ही भारतात येतो तेव्हा आम्हाला ते आमचे घरच वाटते. म्हणून धन्यवाद, सर…धन्यवाद!
श्रीलंकेचा खेळाडू- जसे रोमेश म्हणाला की, जेव्हा श्रीलंकेत अशांतता आणि समस्या होत्या तेव्हा आमच्याकडे पेट्रोल, डिझेल नव्हते, वीज नव्हती, दिवे नव्हते आणि मला वाटते की तुम्ही आणि सरकारने आम्हाला खूप मदत केली, सर. म्हणून आम्ही नेहमीच आभारी आहोत आणि आमच्या देशाला मदत केल्याबद्दल तुमचे आभार मानतो. श्रीलंकेला मदत केल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. आणि माझी एक छोटीशी विनंती आहे, सर. श्रीलंका क्रिकेटचा प्रशिक्षक म्हणून सध्या आम्ही जाफना वगळता संपूर्ण श्रीलंकेत खेळतो. मला श्रीलंका क्रिकेटचा प्रशिक्षक म्हणून, भारताने आम्हाला जाफनामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात मदत केली, तर मला ते आवडेल. जाफना, उत्तर आणि पूर्व भागातील लोकांसाठी ती खूप मोठी मदत असेल, जेणेकरून… आम्ही सध्या ती एक कमतरता अनुभवत आहोत… म्हणून आम्ही उत्तर भागाला वेगळे पडू देणार नाही, म्हणून ते देखील खूप जवळ येतील, श्रीलंका क्रिकेटसोबत काम करतील आणि आम्ही सध्या त्यावर काम करत आहोत, परंतु जर तुम्ही जाफनामध्ये आंतरराष्ट्रीय सामने खेळलात तर ते अधिक जवळ येतील. म्हणून माझी एक छोटीशी विनंती आहे सर, जर तुम्ही याबाबतीत काही मदत करू शकत असाल तर….
पंतप्रधान – जयसूर्याच्या तोंडून हे सर्व ऐकून मला खूप आनंद झाला आहे, कारण भारताच्या बाबतीत तेच खरे आहे, ते म्हणजे शेजारी प्रथम! शेजारील देशांमधील कोणत्याही संकटात आपण जितक्या लवकर मदत करू शकू तितक्या लवकर करायला हवी. तुम्ही पाहिले असेलच की जेव्हा म्यानमारमध्ये भूकंप झाला तेव्हा पहिले धावून जाणारे आम्ही होतो. कारण आमचा असा विश्वास आहे की आपण एक मोठा देश असल्याने आपल्या शेजारील आणि मित्र देशांची काळजी घेणे ही भारताची जबाबदारी आहे. जेव्हा हे आर्थिक संकट आले आणि ती एक मोठी बिकट परिस्थिती होती, तेव्हा भारताने एकच विचार केला की श्रीलंकेने या संकटातून बाहेर पडावे आणि आम्ही त्यासाठी त्यांना पूर्ण मदत करू. आम्ही या भूमिकेतून प्रयत्न केला….आम्ही ते आमचे कर्तव्य मानतो. आणि आजही, तुम्ही लक्षात घेतले असेल की, मी अनेक नवीन प्रकल्पांची घोषणा केली आहे. पण जाफनाबद्दल तुम्ही दाखवलेली काळजी मला आवडली आणि यामुळे एक चांगला संदेश जाईल की श्रीलंकेच्या क्रिकेट नेत्याचे…. जाफनामध्येही क्रिकेट खेळले गेले पाहिजे…. ते जाफना बाहेर जाता कामा नये… तिथेही आंतरराष्ट्रीय सामने खेळले पाहिजेत, ही कल्पनाच खूप बळ देते आणि मी तुम्हाला खात्री देतो की, माझे लोक नक्कीच याची नोंद घेतील की हे कसे करता येईल. पण मला बरं वाटलं, तुम्ही सगळ्यांनी वेळ काढला, जुन्या आठवणी ताज्या झाल्या, मला सर्वांचे चेहरे पाहण्याची संधी मिळाली. पण मला असे वाटते की तुमचे भारताशी असलेले संबंध असेच राहावेत आणि तुम्ही जे काही धाडस दाखवाल, मी तुम्हाला जे काही सहकार्य देऊ शकेन ते माझ्याकडून मिळेल.
* * *
JPS/A.Save/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
Cricket connect!
— Narendra Modi (@narendramodi) April 5, 2025
Delighted to interact with members of the 1996 Sri Lankan cricket team, which won the World Cup that year. This team captured the imagination of countless sports lovers! pic.twitter.com/2ZprMmOtz6
A wonderful conversation with members of the Sri Lankan cricket team that won the 1996 World Cup. Do watch… pic.twitter.com/3cOD0rBZjA
— Narendra Modi (@narendramodi) April 6, 2025