Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

19 फेब्रुवारी 2018 रोजी बाहुबली मस्तकाभिषेकासाठी पंतप्रधानांची श्रवणबेळगोळाला भेट

19 फेब्रुवारी 2018 रोजी बाहुबली मस्तकाभिषेकासाठी पंतप्रधानांची श्रवणबेळगोळाला भेट

19 फेब्रुवारी 2018 रोजी बाहुबली मस्तकाभिषेकासाठी पंतप्रधानांची श्रवणबेळगोळाला भेट

19 फेब्रुवारी 2018 रोजी बाहुबली मस्तकाभिषेकासाठी पंतप्रधानांची श्रवणबेळगोळाला भेट


परमपूज्य आचार्य महाराज जी, समस्त पूज्य मुनिवर जी आणि पूज्य गणनीय माताजी, समस्त आर्यका माताजी आणि मंचावर विराजमान कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला, केंद्रीय मंत्रीमंडळातले माझे सहकारी सदानंद गोंडाजी, अनंत कुमार जी, पियुष गोयल जी, राज्य मंत्रीमंडळातील श्री मंजू जी, इथल्या प्रबंध समितीचे श्रीमान वास्त्रीश्री चारुके, श्री भट्टारका स्वामी जी, हसन निष्ठा पंचायतीच्या अध्यक्षा श्रीमती बी.एस.श्वेता देवराज जी, आमदार एन. बालकृष्णजी आणि देशाच्या काना-कोपऱ्यातून विशाल संख्येने आलेले सर्व श्रद्धाळू, माता भगिनी आणि बंधूनो.

12 वर्षात जेंव्हा एकदा हे महापर्व येते, त्याच काळात पंतप्रधानांच्या रुपात देशाची सेवा करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, हे माझे मोठे भाग्य आहे. आणि त्यामुळे पंतप्रधानाच्या जिम्मेदारीच्या या काळात, या पवित्र वेळी तुमचे सर्वांचे आशिर्वाद प्राप्त करण्याचे सौभाग्य मला लाभले आहे.

श्रवणबेळगोळा येथे येऊन भगवान बाहुबली, महामस्तक अभिषेकाच्या या वेळी आणि आज येथे जेवढे आचार्य, भगवंत, मुनी आणि माताजी यांचे एकाच वेळी दर्शन घेणे, त्यांचे आशिर्वाद प्राप्त करणे हेच एक खूप मोठे भाग्य आहे.

जेंव्हा येथे येणाऱ्या यात्रेकरुंच्या सोयींकडे पाहता, भारत सरकारकडे काही प्रस्ताव आले होते. काही परिस्थिती अशा असतात की भारतीय पुरातत्व विभागाला काही गोष्टी करायला मोठ्या अडचणी येतात. काही असे कायदे आणि नियम आहेत, पण असे सर्व असूनही भारत सरकार येथे येणाऱ्या यात्रेकरुंच्या सोयीसाठी व्यवस्था करण्यात सहभागी होऊन ज्या-ज्या सोयी उभ्या करण्याची आवश्यकता आहे, त्या सर्वांमध्ये पूर्ण जिम्मेदारीने आपली जबाबदारी निभावण्याचा प्रयत्न करत आहे आणि आमच्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे.

आज मला एका इस्पितळाचे लोकार्पण करण्याचीही संधी मिळाली. आपल्या देशात धार्मिक प्रवृत्ती खूप आहेत. पण सामाजिक दायित्व खूप कमी आहे, असे बरेच लोक मानतात, पण हा समज बरोबर नाही. भारतातील संत, महंत, आचार्य, मुनि, भगवंत- सर्व कोणी, जिथे आहेत, ज्या रुपात आहेत, तिथे समाजासाठी काहीतरी भले करण्यातच कार्यरत असतात.

आजही आमची अशी महान संत परंपरा आहे की, 20-25 किलोमीटर अंतरावर, जर कोणी भुकेली व्यक्ती असेल, तर आमच्या संत परंपरेची व्यवस्था अशी आहे, की त्या व्यक्तिचे पोट भरण्याची व्यवस्था कोणत्या ना कोणत्या संताद्वारे केली जात असते.

अनेक सामाजिक कार्य-शिक्षण क्षेत्रातील काम, आरोग्य क्षेत्रातील काम, लोकांना व्यसनमुक्त करण्याचे काम, ही कृती आमच्या महान परंपरेत आजही आमच्या ऋषी-मुनींद्वारे तेवढेच अथक परिश्रम केले जात आहे.

आज जेव्हा मी गोमटेकसुदीकडे पाहत होतो, तेंव्हा मला वाटले मी ते आपल्या समोर उद्धृत करु. गोमटेकसुदीमध्ये ज्या प्रकारे बाहुबलीचे वर्णन केले आहे, गोमटेक या संपूर्ण स्थानाचे वर्णन केले गेले आहे.

अच्छायस्वरच्छंाजलकंतगण्डनम, आबाहूदौरतमसुकन्न पासमं

गयेंदसिंधुजलबाहुदंडम, तमगोमटेशमपनणामिर्चम

आणि याचा अर्थ असा- ज्याचा देह आकाशासारखा निर्मळ आहे, ज्यांचे दोन्ही गाल पाण्यासारखे स्वच्छ आहेत, ज्यांचे कान पानांप्रमाणे खांद्यापर्यंत आहेत, ज्यांचे दोन्ही बाहू गजराजाच्या सोंडेएवढे लांब आणि सुंदर आहेत. अशा गोमटेश स्वामींना मी दर दिवशी प्रणाम करतो.

पूज्य स्वामीजींनी माझ्यावर आशिर्वादांचा वर्षाव केला. माझ्या आईचेही स्मरण केले. मी त्यांचा खूप-खूप आभारी आहे, हे आशिर्वाद दिल्याबद्दल. देशात काळाच्या बदलानुसार सामाजिक जीवनात बदल घडवून आणण्याची परंपरा, हे भारतीय समाजाची वैशिष्ट्य आहे. ज्या गोष्टी कालबाह्य आहेत, समाजात ज्या वाईट चालीरिती प्रवेश करतात आणि कधी-कधी त्यांना श्रद्धेचे रुप दिले जाते.

हे आपले भाग्य आहे की, आमच्या सामाजिक व्यवस्थेतूनच असे सिद्ध पुरुष, असे संत, असे मुनी, असे आचार्य-भगवंत जन्माला येतात, जे तत्कालीन समाजाला योग्य दिशा दाखवून, ज्या कालबाह्य गोष्टी आहेत, त्यांच्यापासून मुक्ती मिळवून, कालानुरुप जीवन जगण्यासाठी प्रेरित करत राहतात.

प्रत्येक 12 वर्षांना येणारा हा एक प्रकारे कुंभाचाच योग आहे. इथे सर्व जण एकत्र येऊन सामाजिक चिंतन करतात. पुढील 12 वर्षात समाजाला योग्य दिशा दाखवून, कालबाह्य गोष्टीपासून मुक्ती मिळवून काळानुरुप जीवन जगण्यासाठी प्रेरित करत राहतात.

दर 12 वर्षांनी येणारा हा एक प्रकारे कुंभाचाच योग आहे. इथे सर्व जण एकत्रित सामाजिक चिंतन करतात. पुढील 12 वर्षात समाजाला कुठे घेऊन जायचे आहे, समाजाने आता हा मार्ग सोडून त्या मार्गावर चालले पाहिजे, कारण देशाच्या प्रत्येक काना-कोपऱ्यातून संत, मुनि, भगवंत, आचार्य, सर्व माताजी, त्या-त्या क्षेत्रातील अनुभव सोबत घेऊन येतात. चिंतन-मनन होते, विचार-विमर्ष होतो आणि त्यातूनच समाजासाठी अमृत रुपातील काही गोष्टी आम्हा लोकांना प्रसाद रुपात प्राप्त होतात. आणि या गोष्टी जीवनात आचरणात आणण्याचा आम्ही जोरदार प्रयत्न करतो.

आज बदलत्या युगातही, मला येथे एका इस्पितळाचे लोकार्पण करण्याची संधी मिळाली. एवढ्या मोठ्या प्रसंगाच्या सोबत एक मोठे सामाजिक कार्य या अर्थसंकल्पात आमच्या सरकारने एक खूप मोठे पाऊल उचलल्याचे तुम्ही पाहिलेच असेल.

आयुष्यमान भारत – या योजनेअंतर्गत कुठलेही गरीब कुटुंब, जेंव्हा कुटुंबात आजार येतो, त्या वेळी केवळ एकच व्यक्ती आजारी पडत नाही तर एक प्रकारे त्या कुटुंबातल्या दोन-तीन पिढ्या आजारी पडतात. कारण एवढे आर्थिक कर्ज होते की मुले सुद्धा फेडू शकत नाहीत आणि संपूर्ण कुटुंब बरबाद होते. एक आजार पूर्ण कुटुंबाला गिळंकृत करतो.
अशा वेळी समाज आणि सरकार, आपले सर्वांचे उत्तरदायित्व बनते की अशा कुटुंबाच्या, संकटाच्या वेळी आपण हात पकडले पाहिजे, त्याची काळजी केली पाहिजे आणि यासाठी भारत सरकारने आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत एक वर्षात कुटुंबातील कोणी आजारी पडल्यास, एक वर्षात पाच लाख रुपयांपर्यंत उपचाराचा खर्च, औषधांचा खर्च, इस्पितळात राहण्याचा खर्च, 5 लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाची तरतूद विम्याच्या माध्यमातून भारत सरकार करेल. स्वातंत्र्यानंतर भारतात उचलले गेलेले हे पाऊल, संपूर्ण जगात कोणीही एवढे मोठे पाऊल उचलण्याबाबत विचार केला नसेल, ना कोणी असे पाऊल उचलले असेल.. जे आमच्या सरकारने उचलले आहे.

आणि हे तेंव्हाच शक्य होते, जेंव्हा आमच्या शास्त्रांनी, आमच्या ऋषींनी, आमच्या मुनींनी आम्हाला हा उपदेश केला आहे.

सर्वे सुखेना भवन्तुक। सर्वे सन्तुह निरामया

आणि हा सर्वे सन्तु निरामया….. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही एका मागून एक पावले टाकत आहोत. मला आज सर्व आचार्यांचा, सर्व मुनिवरांचा, सर्व माताजी, पूज्य स्वामीजींचा आशिर्वाद प्राप्त करण्याचे भाग्य लाभले आहे. मी स्वत:ला खूप भाग्यशाली समजतो.

या पवित्र वेळी उपस्थित राहिल्याबद्दल, मला स्वत:ला खूप धन्य वाटते आहे.

खूप-खूप धन्यवाद !

B.Gokhale/J.Patankar/P.Malandkar