नमस्कार ,
कार्यक्रमासाठी उपस्थित केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, विविध राज्यांचे माननीय मुख्यमंत्री सहकारी, खासदारवर्ग, आमदारवर्ग, इतर मान्यवर आणि स्त्री-पुरुषहो,
आजच्या या कार्यक्रमात पद्म सन्मान प्राप्त करणारी अनेक व्यक्तिमत्वे देखील आपल्या सोबत सहभागी झाली आहेत. मी त्यांचे देखील आदरपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो. आज ऑल इंडिया रेडियो च्या एफएम सेवेचा हा विस्तार, देशव्यापी एफएम बनण्याच्या दिशेने एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल आहे. आकाशवाणीच्या 91 एफएम ट्रान्समीटर्सची ही सुरुवात देशातील 85 जिल्ह्यांमधील 2 कोटी लोकांसाठी एखाद्या भेटवस्तू प्रमाणे आहे. एका प्रकारे या आयोजनात भारताची विविधता आणि वेगवेगळया रंगांची झलक देखील आहे. ज्या जिल्ह्यांना यामध्ये समाविष्ट केले जात आहे त्यामध्ये आकांक्षी जिल्हे, आकांक्षी तालुक्यांना देखील या सेवांचा लाभ मिळत आहे. मी या कामगिरीसाठी आकाशवाणीचे अभिनंदन करत आहे आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देत आहे. आपल्या ईशान्येकडील बंधुभगिनींना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे, युवा मित्रांना होणार आहे. यासाठी त्यांचे मी विशेषत्वाने अभिनंदन करतो.
मित्रांनो,
ज्यावेळी रेडियो आणि एफएमची चर्चा होते, तर आपण ज्या पिढीमधील लोक आहोत, आपल्या सर्वांचे एका भावुक श्रोत्याचे देखील नाते आहे आणि माझ्यासाठी तर ही अतिशय आनंदाची बाब आहे की माझे तर एक सादरकर्ता म्हणून देखील नाते निर्माण झाले आहे. आता काही दिवसातच मी आकाशवाणीवर ‘मन की बात’ चा शंभरावा भाग सादर करणार आहे. ‘मन की बात’ चा हा अनुभव, देशवासीयांसोबत अशा प्रकारचा भावनात्मक नातेसंबंध केवळ रेडियोच्या माध्यमातूनच शक्य होता. मी याच्या माध्यमातून देशवासीयांच्या सामर्थ्याच्या संपर्कात राहिलो, देशाच्या सामूहिक कर्तव्यशक्तीच्या संपर्कात राहिलो. स्वच्छ भारत अभियान असो, ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ असो, किंवा ‘हर घर तिरंगा’ अभियान असो, ‘मन की बात’ ने या अभियानांना लोकचळवळ बनवले आहे. म्हणूनच एका प्रकारे मी आकाशवाणीच्या तुमच्या संचाचा देखील एक भाग आहे.
मित्रांनो,
आजच्या या आयोजनाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. वंचितांना मानांकन देण्याच्या सरकारच्या धोरणाला देखील हे पुढे नेत आहे. जे आतापर्यंत या सुविधेपासून वंचित राहिले, ज्यांना अतिदुर्गम भागातील मानले जात होते, ते आता आपल्या सर्वांसोबत आणखी जास्त प्रमाणात जोडले जातील. वेळेवर माहिती पोहोचवयाची असेल, समुदाय बांधणीचे काम असेल, शेतीशी संबंधित हवामानाची माहिती असेल, शेतकऱ्यांना पिके, फळे-भाजीपाला यांच्या दरांची ताजी माहिती देणे असेल, रासायनिक शेतीमुळे होणाऱ्या हानीविषयी चर्चा असेल, शेतीसाठी आधुनिक यंत्रांचे पुलिंग असेल, महिलांच्या बचत गटांना नव्या बाजारपेठांविषयी माहिती द्यायची असेल, किंवा मग एखाद्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात संपूर्ण भागाला मदत पुरवायची असेल, यामध्ये या एफएम ट्रान्समीटर्सची अतिशय महत्त्वाची भूमिका असेल. या व्यतिरिक्त एफएमचे जे माहितीपूर्ण मनोरंजन मूल्य आहे ते तर असेलच.
मित्रांनो,
आमचे सरकार, सातत्याने, याच प्रकारे, तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण , Democratization यासाठी काम करत आहे. भारताला आपल्या सामर्थ्याचा पुरेपूर वापर करता यावा यासाठी कोणत्याही भारतीयाकडे संधीची कमतरता नसेल ही बाब अतिशय गरजेची आहे. आधुनिक तंत्रज्ञान सर्वांसाठी उपलब्ध बनवणे, परवडणारे बनवणे याचे हे खूप मोठे माध्यम आहे. आज भारतात ज्या प्रकारे गावागावांमध्ये ऑप्टिकल फायबर पोहोचवले जात आहे. मोबाईल आणि मोबाईल डेटा, या दोघांच्या किमती इतक्या कमी झाल्या आहेत की त्यामुळे माहिती पर्यंत पोहचणे अतिशय सोपे झाले आहे. सध्या आपण पाहात आहोत की देशाच्या कानाकोपऱ्यात, गावागावांमध्ये डिजिटल उद्योजक तयार होऊ लागले आहेत. गावातील युवा गावात राहूनच डिजिटल तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन कमाई करू लागले आहेत. याच प्रकारे आपल्या लहान दुकानदारांना, फेरीवाल्या मित्रांना इंटरनेट आणि युपीआयची जेव्हापासून मदत मिळाली आहे तेव्हापासून त्यांनी बँकिंग प्रणालीचा लाभ घ्यायला देखील सुरुवात केली आहे. आज तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या मच्छिमार बांधवांना हवामानाची योग्य माहिती योग्य वेळी मिळू लागली आहे. आज तंत्रज्ञानाच्या मदतीने आपले लघुउद्योजक आपली उत्पादने, देशाच्या कानाकोपऱ्यात विकू शकत आहेत. यामध्ये गवर्नमेंट-ई-मार्केट प्लेस म्हणजे GeM ने देखील त्यांना मदत मिळू लागली आहे.
*****
Ankush C/Shailesh p/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Inauguration of 91 FM transmitters will revolutionise the radio industry in India. https://t.co/wYkBbxGHqT
— Narendra Modi (@narendramodi) April 28, 2023
जब बात रेडियो और FM की होती है, तो इससे मेरा रिश्ता एक भावुक श्रोता का भी है, और एक होस्ट का भी है: PM @narendramodi pic.twitter.com/NTrdW7S1Ty
— PMO India (@PMOIndia) April 28, 2023
हमारी सरकार, निरंतर, टेक्नोलॉजी के लोकतंत्रिकरण, Democratization के लिए काम कर रही है। pic.twitter.com/fDNnOH9ADc
— PMO India (@PMOIndia) April 28, 2023
डिजिटल इंडिया ने रेडियो को नए listeners भी दिये हैं, और नई सोच भी दी है। pic.twitter.com/JIH9cI2NNF
— PMO India (@PMOIndia) April 28, 2023