भारतातील कोविड – 19 च्या एकत्रित चाचण्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ दिसून आली आहे. आज भारताने एकूण 18 कोटी चाचण्यांचा (18,02,53,315) टप्पा ओलांडला आहे.
गेल्या 24 तासात 9,16,951 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशभरात प्रगतीपथावर असलेल्या चाण्यांच्या पायाभूत विस्तारामुळे देशातील चाचण्यांचा आलेख उंचावण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 1201 शासकीय वैद्यकीय प्रयोगशाळा आणि 115 खासगी प्रयोगशाळा अशा एकूण 2316 प्रयोगशाळांमुळे दैनंदिन चाचणी क्षमतेत भरघोस वाढ झाली आहे.
उच्च स्तरावर सर्वसमावेशक व्यापक चाचण्या केल्यामुळे देखील राष्ट्रीय पातळीवरील कोरोना बाधितांचा दर खाली आणण्यास मदत झाली आहे.
एकूण चाचण्यांचा 18 कोटींचा टप्पा ओलांडल्यामुळे एकूण चाचणी दरात घट होत आहे. कोरोना बाधितांचा एकूण राष्ट्रीय दर आज 5.79 % इतका आहे. तो पाच महिन्यांच्या काळात 8.93 % वरून 5.79 % इतका खाली आला आहे.
15 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना बाधितांचा दर हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. बिहारमध्ये कोरोना बाधितांचा दर 1.44 % आहे.
भारतात प्रति दशलक्ष (टीपीएम) चाचण्यांमागे आज 130618.3 चाचण्या होत आहे. चाचण्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ झाल्यामुळे टीपीएमध्ये देखील अभूतपूर्व वाढ झाली आहे.
22 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रति दशलक्ष नुसार राष्ट्रीय सरासरी पेक्षा चाचण्यांचे प्रमाण बऱ्याच अंशी चांगले आहे.
13 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रति दशलक्ष प्रमाणे राष्ट्रीय आकडेवारीच्या तुलनेत चाचण्यांचे प्रमाण कमी आहे आणि या भागांमध्ये चाचण्यांचे प्रमाण उच्च पातळीवर वाढविणे गरजेचे असल्याचे दिसते.
याच काळात भारतात 19,253 नव्याने बरे झालेल्या रुग्णांची नोंद झाली आहे, त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या आणखी कमी झाली आहे. भारतात सध्या 2,24,190 सक्रीय रुग्ण असून हा आकडा भारतातील एकूण बाधित रुग्ण संख्येच्या केवळ 2.15 % इतका आहे.
आज एकूण 10,056,651 इतरे रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 96.41 % सुधारला आहे. बरे झालेले रुग्ण आणि सक्रिय रुग्ण यांच्यातील अंतर हे सातत्याने वाढत आहे आणि सध्या ते 9,832,461 इतके आहे.
बरे झालेल्या रुग्णांपैकी 78.89 % रुग्ण हे दहा राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमधील आहे. केरळमध्ये 5,324 रुग्ण कोविडमधूल बरे झाले आहेत. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये अनुक्रमे 2,890 आणि 1,136 रुग्ण बरे झाले आहेत.
गेल्या 24 तासात 18,222 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
नवीन रुग्णांपैकी 79.83 % रुग्ण 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.
केरळमध्ये गेल्या 24 तासात 5,142 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल महाराष्ट्रात 3,693 रुग्णांची तर कर्नाटकमध्ये 970 रुग्णांची नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासात 228 मृत्यूंची नोंद झाली असून मृत्यूंपैकी 76.32 % मृत्यू सात राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.
महाराष्ट्रामध्ये 73 मृत्यूंची नोंद झाली आहे. केरमध्ये देखील 23 मृत्यूंची नोंद तर पश्चिम बंगालमध्ये 21 इतकी नोंद झाली आहे.
लसीकरणाच्या सर्व प्रकारच्या तयारीची सुनिश्चिता पाहण्यासाठी आणि कोणत्याही गोंधशाशिवाय लसीकरणासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी देशभरात घेण्यात आलेली चाचणीची काल तिसरी मोठी फेरी होती, ज्यात 33 राज्ये, केंद्रशासित प्रदेश, 615 जिल्हे आणि 4895 सत्र केंद्रांचा समावेश आहे.
…..
S.Mhatre/S.Shaikh/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com
Speaking at the Pravasi Bharatiya Divas. Watch. https://t.co/FZ4l1KeGdF
— Narendra Modi (@narendramodi) January 9, 2021
The Indian diaspora has distinguished itself globally. During my conversations with world leaders, they have been appreciative of the Indian community in their respective nations, especially the doctors, nurses and paramedics. pic.twitter.com/1SgOj6LJvE
— Narendra Modi (@narendramodi) January 9, 2021
Be it our tech industry or the pharma industry, India has always been at the forefront of helping mitigate global challengees. pic.twitter.com/IGBBMz3UKY
— Narendra Modi (@narendramodi) January 9, 2021
If the world trusts India, one of the important reasons is the Indian diaspora. World over, people have seen our diaspora's accomplishments and through them, seen glimpses of India's glorious culture as well as ethos. pic.twitter.com/sC8pM3XLyH
— Narendra Modi (@narendramodi) January 9, 2021