Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

17 व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या पार्श्वभूमीवर गयानाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत पंतप्रधानांची भेट

17 व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या पार्श्वभूमीवर गयानाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत पंतप्रधानांची भेट


नवी दिल्‍ली, 9 जानेवारी 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंदूरमध्ये 17 व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या निमित्ताने रिपब्लिक ऑफ गयानाचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मोहम्मद इरफान अली यांची भेट घेतली. गयानाचे राष्ट्राध्यक्ष इरफान अली 8-14 जानेवारी 2023 या कालावधीत भारताच्या भेटीवर आहेत. तसेच ते 17 व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. 

ऊर्जा, पायाभूत सुविधांचा विकास, औषधनिर्माण, आरोग्यसेवा, तंत्रज्ञान, नवकल्पना आणि संरक्षण या क्षेत्रात सहकार्यासह विविध मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांनी व्यापक चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत आणि गयानाच्या लोकांमधील 180 वर्षांच्या जुन्या ऐतिहासिक संबंधांचे  स्मरण केले आणि हे संबंध  आणखी दृढ करण्याचा मानस स्पष्ट केला. 

गयानाचे राष्ट्राध्यक्ष इरफान अली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन  द्विपक्षीय चर्चा करतील. याशिवाय ते 10 जानेवारी 2023 रोजी प्रवासी भारतीय दिवसाच्या समापन सत्राला आणि प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहतील. ते 11 जानेवारी रोजी इंदूर येथे होणाऱ्या जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद 2023 मध्ये देखील सहभागी होतील.

गयानाचे राष्ट्राध्यक्ष इरफान अली इंदूरशिवाय दिल्ली, कानपूर, बंगळुरू आणि मुंबईलाही भेट देणार आहेत.

 

* * *

N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai