Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान सहभागी

15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान सहभागी


नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी  23 ऑगस्ट 2023 रोजी दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षतेखाली जोहान्सबर्ग येथे  झालेल्या 15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाले.

यावेळी नेत्यांनी जागतिक आर्थिक पुनर्प्राप्ती, आफ्रिका आणि ग्लोबल साउथबरोबर भागीदारी याबाबत  फलदायी चर्चा केली तसेच ब्रिक्स अजेंड्यासंबंधी  आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेतला.

आपल्या भाषणात पंतप्रधानांनी ब्रिक्सला बळकट करण्याचे आवाहन केले, ते असे:

B – (Breaking barriers) अडथळे दूर करेल

R – (Revitalising economies)अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करेल

I – (Inspiring Innovation)नवोन्मेषाला प्रोत्साहन देईल

C – (Creating opportunities)संधी निर्माण करेल

S – (Shaping the future)भविष्याला आकार देईल

आपल्या भाषणात पंतप्रधानांनी पुढील मुद्दे अधोरेखित केले :

  • संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणांसाठी ठोस कालमर्यादा  निश्चित करण्याचे केले आवाहन
  • बहुपक्षीय वित्तीय संस्थांमध्ये सुधारणा करण्याचे आवाहन केले
  • जागतिक व्यापार संघटनेत  सुधारणा करण्याचे आवाहन
  • ब्रिक्सला त्याच्या विस्तारावर सर्वसहमती  निर्माण करण्याचे केले आवाहन
  • ब्रिक्सने ध्रुवीकरणाचा नव्हे तर एकतेचा जागतिक संदेश देण्याचे केले आवाहन
  • ब्रिक्स स्पेस एक्सप्लोरेशन कंसोर्टियमची प्रस्तावित स्थापना
  • ब्रिक्स भागीदारांना भारतीय डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा – भारतीय स्टॅक देऊ केले
  • ब्रिक्स  देशांमध्ये स्किल मॅपिंग, कौशल्य प्रशिक्षण आणि गतिशीलतेला प्रोत्साहन देण्याचे प्रस्तावित उपक्रम
  • आंतरराष्ट्रीय बिग कॅट आघाडी  अंतर्गत मार्जार कुळातल्या मोठ्या प्राण्यांच्या  संरक्षणासाठी ब्रिक्स देशांचे प्रस्तावित संयुक्त प्रयत्न
  • ब्रिक्स  देशांमध्ये पारंपारिक औषधांचे भांडार स्थापन करण्याचा प्रस्ताव
  • आफ्रिकन महासंघाच्या जी 20 च्या स्थायी सदस्यत्वाला पाठिंबा देण्याचे ब्रिक्स भागीदारांना केले आवाहन

S.Kakade/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai