Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

11 सप्टेंबर रोजी लक्षावधी आशा, एएनएम आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांसोबत पंतप्रधान साधणार संवाद


पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्या दिनांक ११ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी १०.३० वाजता, “पोषण-माह” चा एक भाग म्हणून लाखो आशा, एएनएम, आंगणवाडी कार्यकर्त्यांशी आणि आरोग्य लाभधारकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधतील.

संपूर्ण देशभरात सप्टेंबर महिना हा “पोषण माह ” (पोषणासाठी समर्पित असलेला महिना), म्हणून साजरा करण्यात येतो. याद्वारे इष्टतम पौष्टिकतेच्या महत्त्वाच्या संदेशासह देशातील प्रत्येक घरात पोहोचण्याचा हेतू आहे.

केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१७ मध्ये, स्थापन केलेल्या राष्ट्रीय पोषाहार अभियानाच्या उद्दिष्टांपर्यंत पोहचून कुपोषण, अनेमिया, कमी वजनांच्या मुलांचा जन्म यांची पातळी घटविण्याचा प्रयत्न करील. पोषण अभियानांतर्गत, सरकारने, शारीरिक वाढ अवरोध, कुपोषण, अनेमिया, (तरुण मुले, महिला आणि पौगंडावस्थेतील मुली) तसेच वार्षिक कमी वजनाच्या बालकांच्या जन्माचे प्रमाण अनुक्रमे २%, २%, ३% आणि २% ने घटविणे) हे उद्दीष्ट्ट ठरविले आहे.

या दिशेने, पंतप्रधानांच्या सहभागामुळे या अभियानात सहभागी होणारे विविध हितधारक एकत्र येतील. पोषण क्षेत्रामधील यशोगाथा सामायिक पद्धतीने प्रसारित करण्यासाठी हे एक व्यासपीठ बनेल.