Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ह्युस्टन येथे 22 सप्टेंबरला होणाऱ्या भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचे पंतप्रधानांनी केले स्वागत


अमेरिकेतल्या ह्युस्टन येथे 22 सप्टेंबरला होणाऱ्या भारतीय समुदायाच्या ‘हाऊडी मोदी’ या विशेष कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे ट्रम्प सहभागी होत असल्याच्या वृत्ताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. या कार्यक्रमात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे सहभागी होणे हे भारत आणि अमेरिकेमधील विशेष मैत्रीचे प्रतीक असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा या कार्यक्रमातील सहभाग विशेष असून भारत-अमेरिकेतील द्विपक्षीय संबंधांच्या ताकदीचे महत्व यातून अधोरेखित होत आहे. तसेच भारतीय समुदायाचे अमेरिकी समाज आणि अर्थव्यवस्थेतल्या योगदानाचे महत्वही दर्शवत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

तत्पूर्वी, या कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहभागाला पुष्टी देणारे पत्रक व्हाईट हाऊसने आज प्रसिद्ध केले. “अमेरिकी आणि भारतीय नागरिकांमधील दृढ संबंध मजबूत करण्याची ही मोठी संधी आहे. जगातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या अशा दोन लोकशाहींमधील धोरणात्मक भागीदारीचा पुनरुच्चार या निमित्ताने होत असून ऊर्जा आणि व्यापार संबंध अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा होईल,” असे सांगून पत्रकात कार्यक्रमाचे महत्व अधोरेखित करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांसाठी ‘टेक्सास इंडिया फोरम’ ने अमेरिकेतल्या टेक्सास प्रांतातील ह्यूस्टन इथल्या एनआरजी स्टेडिअममध्ये ‘हाऊडी मोदी-सामाजिक स्वप्ने, उज्ज्वल भवितव्य’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 50 हजारांहून अधिक लोक या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे.

*******

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar