Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

हैदराबादमध्ये जैव वैद्यकीय संशोधनासाठी राष्ट्रीय संसाधन सुविधा स्थापन करायला मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य संशोधन विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या प्रस्तावाअंतर्गत, जैव वैद्यकीय संशोधनासाठी हैदराबादच्या जिनोम व्हॅलीमध्ये भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेद्वारे राष्ट्रीय संसाधन सुविधा स्थापन केली जाणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 338.58 कोटी रुपये असून हे संसाधन केंद्र 2018-19 पर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित आहे.

मूलभूत आणि उपयोजित जैव वैद्यकीय संशोधनासाठी ही संस्था एकमेवाद्वितीय ठरेल.

वानर, पराउत्पत्तीमूलक तसेच जनुकीयदृष्ट्या संशोधित उंदीर ज्यांचा संशोधन आणि विकास उत्पादनांच्या परीक्षणात वापर केला जातो अशा प्राण्यांच्या प्रजनन आणि निवासाची जागतिक दर्जाची सुविधा म्हणून विकसित केले जाईल. या संस्थेत आधुनिक जैव वैद्यकीय संशोधनाला गती देण्यासाठी अनेक प्रयोगशाळा आणि संबंधित तंत्रज्ञान पुरवले जाईल. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तसेच संशोधन आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आणि जैव तंत्रज्ञान/जैव औषध कंपन्यांमध्ये संशोधन सुसाध्य बनवण्यासाठी ही सुविधा देण्यात येणार आहे.

जैव वैद्यकीय संशोधनाच्या विशिष्ट क्षेत्रांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण सुविधा देखील या केंद्रात उपलब्ध होईल.

राज्य सरकारने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेला हैदराबादच्या जिनोम व्हॅली येथील 102.69 एकर भूखंड जैव वैद्यकीय संशोधनासाठी राष्ट्रीय पशुसंसाधन सुविधा उभारण्यासाठी नि:शुल्क वितरित करण्यात आला आहे.

S. Kane/S.Tupe/N.Sapre