Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

हुतात्मा दिनानिमित्त भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना पंतप्रधानांची आदरांजली


हुतात्मा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगतसिंह राजगुरु आणि सुखदेव यांना अभिवादन केले आहे.

भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांच्यासमोर नतमस्तक होत त्‍यांच्या शौर्य आणि देशभक्तीला पंतप्रधानांनी सलाम केला आहे. भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांचे शौर्य आणि देशभक्ती सर्व पिढयांसाठी सदैव स्फूर्तीदायी असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पुढच्या पिढयांना स्वातंत्र्य अनुभवायला मिळावे यासाठी युवादशेतच या तीन शूरवीरांनी आपल्या आयुष्याचे बलिदान दिले असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

N.Chitale/S.Tupe/M.Desai