Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

“हवामान बदल न्यायाचा विजय” – पॅरिस कराराबाबत पंतप्रधानांचे निवेदन


पॅरिसमध्ये नुकत्याच संपलेल्या हवामान बदल परिषदेत हवामान बदल न्यायाला विजय मिळाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. सीओपी-21 मध्ये झालेली चर्चा आणि पॅरिस करार यावरुन हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी जागतिक नेत्यांच्या एकत्रित चातुर्याचे दर्शन घडल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. पॅरिस कराराच्या फलश्रुतीत कोणाचाही जय किंवा पराजय झालेला नाही असे पंतप्रधानांनी ट्‌विट्‌सच्या मालिकेत स्पष्ट केले आहे.

“सीओपी-21 मध्ये झालेली चर्चा आणि पॅरिस करार यावरुन हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी जागतिक नेत्यांच्या एकत्रित चातुर्याचे दर्शन घडले आहे. हवामान बदल हे जगापुढील मोठे आव्हान आहे मात्र प्रत्येक देश या आव्हानाचा कसा सामना करत आहे आणि उपाययोजना शोधून काढण्यासाठी कसे प्रयत्न करत आहे याचे प्रतिबिंब पॅरिस करारात दिसून आले आहे. हवामान बदल न्यायाचा विजय झाला असून आपण सर्वजण हरित भवितव्यासाठी एकत्रित काम करत आहोत असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

J.Patnakar/S.Tupe/M.Desai