Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

हवामान बदल आणि पर्यावरण क्षेत्रात तांत्रिक सहकार्य करण्याबाबत भारत आणि स्विझर्लंड यांच्यातल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


हवामान बदल आणि पर्यावरण क्षेत्रात तांत्रिक सहकार्य करण्याबाबत भारत आणि स्विझर्लंड यांच्यातल्या सामंजस्य कराराला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झालेल्या  केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्वलक्षी प्रभावाने मंजुरी देण्यात आली. 13 सप्टेंबर 2019 ला स्विझर्लंडमधे या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.

महत्वाचा प्रभाव:-

पर्यावरण ऱ्हासाचा फटका, समाजातल्या संपन्न घटकांपेक्षा  सामाजिक आणि आर्थिक वंचित घटकांना जास्त झेलावा लागतो.  पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी केलेले प्रयत्न,आणि पर्यावरण विषयक संसाधने समाजातल्या सर्व स्तरातल्या घटकांना उपलब्ध व्हावेत यावर भर देण्यात येणार आहे. 

लाभ:-

 या सामंजस्य करारामुळे पर्यावरण रक्षण,तसेच  न्याय, परस्पर लाभ यावर आधारित नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन  या क्षेत्रात घनिष्ट आणि दीर्घकालीन सहकार्याला प्रोत्साहन मिळणार आहे.  या करारामुळे पर्यावरण रक्षण, हवामान बदल विषयक उत्तम व्यवस्थापन यामध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि उत्तम प्रथा अवलंबिली जाण्याची अपेक्षा आहे.

 वैशिष्ट्ये:-

हवामान बदल आणि शाश्वत जल व्यवस्थापन या क्षेत्रात  क्षमता वृद्धी

 शाश्वत वन व्यस्थापन

वायू, जल आणि भू प्रदूषणाची दखल घेणे

स्वच्छ आणि नविकरणीय उर्जेवर लक्ष केंद्रित करणे 

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar