उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे
हरियाणातल्या मनेथी इथे नवे एम्स उभारायला मंत्रिमंडळाची मान्यता
28 Feb, 2019
हरियाणातल्या रेवाडी जिल्ह्यात मनेथी इथे 1299 कोटी खर्चाचे, नवे एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था उभारायला आणि या एम्स साठी 2,25,000 रुपये मूळ वेतन अधिक एनपीए मात्र हे दोनही मिळून 2,37,500 रुपयांपेक्षा जास्त नसणाऱ्या संचालकाच्या एका पदाच्या निर्मितीला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
वैशिष्ट्ये – नव्या एम्स मुळे एमबीबीएसच्या 100 जागांची तर बी एससी नर्सिंगच्या 60 जागांची भर
•नव्या एम्सला 15-20 सुपर स्पेशालिटी विभाग असतील.
•नव्या एम्स मधे 750 खाटाचे रुग्णालय असेल.
•नव्या एम्स मधे दर दिवशी 1500 बाह्य रुग्ण विभागातल्या रुग्णांची तपासणी तर रुग्णालयात दाखल केलेल्या 1000 रुग्णांची तपासणी करण्याची क्षमता राहील
तपशील-
दर्जेदार आरोग्य सेवा,वैद्यकीय शिक्षण,परिचारिका शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात,राष्ट्रीय महत्वाची संस्था स्थापित करणे हा नव्या एम्स उभारण्यामागचा उद्देश आहे. 750 खाटांच्या या रुग्णालयात आपत्कालीन, आयुष, खाजगी,अति दक्षता स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी खाटा उपलब्ध असतील.
लाभ-
नव्या एम्स उभारणीमुळे,आरोग्य शिक्षण आणि प्रशिक्षण क्षेत्रात परिवर्तन होण्या बरोबरच क्षेत्रातली आरोग्य सेवा क्षेत्रातली व्यावसायिकांची कमतरता भरून निघण्यासाठी मदत होणार आहे.
रोजगार निर्मिती- यामुळे प्रत्येक एम्स मधे फॅकल्टी आणि बिगर फॅकल्टी पदांच्या 3000 रोजगारांची निर्मिती होणार आहे.