Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्विस व भारतीय नागरिकांची ओळख आणि परत पाठवण्यासंदर्भात भारत-स्वित्झर्लंड यांच्यातील द्विपक्षीय तांत्रिक कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


स्विस आणि भारतीय नागरिकांची ओळख व त्यांना परत पाठवण्यासंदर्भात भारत-स्वित्‍झर्लंड यांच्यातील तांत्रिक करारावर स्वाक्षऱ्या करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली.

दोन्ही देशांमधील अनियमित स्थलांतरीतांना परत पाठविण्यासाठीची सहकार्य प्रक्रिया निर्धारित करण्याच्या दृष्टीने हा करार महत्त्वाचा आहे. स्वित्झर्लंडमध्ये अशा प्रकारे राहणाऱ्या भारतीय स्थलांतरीतांची संख्या 100 पेक्षा कमी असल्याचे समजते. प्रस्तावित केल्यानुसार स्वित्झर्लंडसोबतच्या या कराराला मंजुरी मिळाल्यास स्वितझर्लंडच्या धर्तीवर युरोपातील इतर देशांनाही हीच योजना लागू करता येणे शक्य होईल.

B.Gokhale/M.Pange/Anagha