Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्वदेशी बनावटीच्या प्रेशराईज्ड हेवी वॉटर रिऍक्टरचे १० संच तयार करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


भारताच्या स्थानिक अणुऊर्जा कार्यक्रमाला गती देण्यासाठी आणि देशाच्या परमाणू उद्योगाला चालना देण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वदेशी बनावटीच्या प्रेशराईज्ड हेवी वॉटर रिऍक्टरचे १० संच तयार करायला मंजुरी दिली. त्यांची एकूण स्थापित क्षमता ७हजार मेगावॅट इतकी असेल. या प्रकल्पामुळे अणुऊर्जा निर्मिती क्षमतेत लक्षणीय वाढ होईल.

भारताची सध्याची स्थापित क्षमता ६७८० मेगावॅट इतकी आहे. सध्या निर्मिती सुरु असलेल्या प्रकल्पांमधून २०२१-२२ पर्यंत आणखी ६७०० मेगावॅट अणुऊर्जा उपलब्ध होईल.

या क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांमधील हा महत्वपूर्ण उपक्रम असेल.

शाश्वत विकास, ऊर्जेतील स्वयंपूर्णता आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी जागतिक प्रयत्नांना गती देण्याच्या भारताच्या कटिबद्धतेला यामुळे मदत मिळेल.

N.Sapre/S.Kane/P.Kor