स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या महा अंतिम कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी व्हिडीओ कॉनफरन्सिंगद्वारे संवाद साधला. देशभरातल्या विविध संस्थांमधून हॅकेथॉनमधे सह्भागी झालेल्या विविध गटांशी पंतप्रधानांनी संवाद साधला.कृषी,वित्त,कुपोषण आणि शिक्षण यासारख्या मुद्द्यांवर हा संवाद झाला.
हे राष्ट्रीय स्तरावरचे सर्वात मोठे खुले कल्पकतेशी संबंधित मॉडेल आहे असे पंतप्रधान म्हणाले.भारताची अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत असून नाविन्यतेत देश नवे मापदंड स्थापन करत आहे.भारत हे सध्या तिसरे सर्वात मोठे स्टार्ट अप राष्ट्र आहे असे पंतप्रधान म्हणाले.
B.Gokhale/N.Chitale/P.Kor