1. भारताच्या पंतप्रधानांनी दिलेल्या आमंत्रणावरून सौदी अरेबियाचे उप पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री मोहंमद बिन सलमान अब्दुल अझीझ अल सौद 19-20 फेब्रुवारी 2019 दरम्यान आपल्या पहिल्या भारत भेटीवर आले होते. माननीय पंतप्रधानांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. या आधी सौदीचे राजे सलमान अब्दुल अझीझ अल सौद यांच्या आमंत्रणावरून एप्रिल 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेले होते.
2. युवराज मोहंमद सलमान यांचे 20 फेब्रुवारी 2019 रोजी राष्ट्रपती भवन येथे पारंपारिक पध्दतीने स्वागत करण्यात आले. त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती कोविंद यांनी मेजवानीचा समारंभ आयोजित केला होता.
3. पंतप्रधान मोदी आणि युवराज मोहंमद सलमान यांच्यात 20 फेब्रुवारी 2019 रोजी हैद्राबाद हाउस येथे शिष्टमंडळ स्तरीय चर्चा झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांनी युवराज मोहंमद सलमान यांच्याशी चर्चा केली.
4. भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात अनेक शतकांपासून मैत्रीपूर्ण आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. भौगोलिक जवळीक, प्राचीन संस्कृतींमधील बंध, सांस्कृतिक प्रेम, नैसिर्गिक सामायिक भावना, दोन्ही देशांच्या नागरिकांमध्ये असलेला चैतन्यमय सुसंवाद. सामायिक आव्हाने आणि संधी यामुळे हे संबंध अधिकच दृढ झाले आहेत.
5. दोन्ही देश आणि त्यांच्या नेत्यांमध्ये असलेल्या मैत्रीच्या मजबूत बंधांच्या भावनेच्या पार्श्वभूमीवर ही द्विपक्षीय चर्चा झाली. उभय नेत्यांनी मैत्री आणि सहकार्याच्या भावनेवर उभ्या राहिलेल्या द्विपक्षीय संबंधांवर समाधान व्यक्त केले. परस्परविश्वास, सहकार्य, एकमेकांप्रती असलेली सद्भावना आणि परस्परांच्या हिसासंबंधाविषयी आदर अशा आधारावर हे मैत्रीसंबंध उभारलेले आहेत. एप्रिल 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रियाधला दिलेल्या ऐतिहासिक भेटीनंतर व्यापार, ऊर्जा, सुरक्षा आणि सांस्कृतिक क्षेत्रासह विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीबद्दल दोन्ही बाजूंनी समाधान व्यक्त केले – या भेटीमुळे दोन्ही देशांच्या परस्पर गुंतवणूकीत वाढ होईल आणि द्वीपक्षीय संबंध पुढच्या पातळीवर पोहोचतील.
6. सौदी अरबमध्ये बदल आणि मुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी युवराज करत असलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधान मोदी यांनी स्वागत केले. तर, भारतीय समाजात रुजलेल्या विविधता, बहुविध संस्कृती आणि सहिष्णुतेसारख्या मूल्यांचे सौदी अरबच्या युवराजांनी कौतुक केले.
7. फेब्रुवारी 2010 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘रियाध घोषणापत्रामध्ये नमूद केलेल्या ‘राजनैतिक भागीदारीला’ अधिक दृढ करण्याच्या वचनबद्धतेचा दोन्ही नेत्यांनी पुनरुच्चार केला. सौदी अरबमधील दोन पवित्र मशिदींचे विश्वस्त राजे सलमान बिनअब्दुलझाझ अल सऊद यांच्या फेब्रुवारी 2014मधल्या भारत भेटीदरम्यान आणि एप्रिल 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरबला केलेल्या दौऱ्यादरम्यान देखील या घोषणापत्राच्या पूर्ततेविषयीची कटिबद्धता व्यक्त करण्यात आली होती.
8. दोन्ही देशांमध्ये असलेली ‘राजनैतिक भागीदारी’ अधिक मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे युवराज यांच्या नेतृत्वाखाली राजनैतिक भागीदारी परिषदेची स्थापना करून त्या अंतर्गत उच्चस्तरीय देखरेख यंत्रणा निर्माण करण्याच्या प्रस्तावाला दोन्ही देशांनी सहमती दिली. या परिषदेत दोन्ही देशातील व्यापक राजनैतिक संबंधांवर विस्तृत चर्चा करण्यासाठी संबधित मंत्रीदेखील सहकार्य करतील.
9. नीती आयोग आणि सौदी येथील आंतरराष्ट्रीय राजनैतिक भागीदारी केंद्र यांनी संयुक्तपणे रियाध येथे अलिकडेच आयोजित कार्यशाळेच्या फलिताविषयी दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. दोन्ही देशातील विविध क्षेत्रात गुंतवणूक आणि संयुक्त भागीदारीच्या किमान 40 संधी असल्याचे या कार्यशाळेत निश्चित करण्यात आले.
10. युवराजांच्या भारत-भेटीदरम्यान उभय देशात खालील सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली: –
(I) भारतातील राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधीमध्ये गुंतवणूक करण्यासंबधीचा सामंजस्य करार
(II) पर्यटन क्षेत्रातील सहकार्याविषयीचा सामंजस्य करार.
(III) गृहनिर्माण क्षेत्रातील सहकार्याविषयीचा सामंजस्य करार.
(IV) इन्व्हेस्ट इंडीया आणि सौदी अरेबिया जनरल इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी यांच्या दरम्यान परस्पर सहकार्यासाठीचा आराखडा तयार करण्याविषयीचा करार.
(v) दृकश्राव्य कार्यक्रमाच्या प्रक्षेपण सहकार्याविषयीचा सामंजस्य करार.
(VI) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या आंतरराष्ट्रीय सौर सहकार्यात सहभागी होण्यास सौदी अरेबियाने संमती दर्शवली असून, त्याविषयीचा करारही यावेळी करण्यात आला.
11. गेल्या काही वर्षात दोन्ही देशात द्विपक्षीय व्यापारात झालेली प्रगती लक्षात घेता,आतापर्यत दुर्लक्षित राहिलेल्या, तेलाशिवायच्या अनेक क्षेत्रांमध्ये व्यापार वाढवण्याची गरज दोन्ही देशांनी यावेळी व्यक्त केली. फेब्रुवारी 2018 मध्ये रियाध येथे झालेल्या भारत-सऊदी संयुक्त आयोगाच्या 12 व्या बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेचे दोन्ही बाजूंनी कौतुक केले.या बैठकीत आर्थिक, व्यावसायिक, परस्पर गुंतवणूक, सांस्कृतिक आणि तांत्रिक क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी चर्चा झाली होती.
12. दोन्ही देशांमधील व्यापार वृद्धिंगत करणे आणि व्यापार वाढवणे तसेच निर्यातीतले अडथळे दूर करण्याचे महत्त्व यावर भर देण्यात आला.
13. सौदी अरेबियाचे व्हिजन 2030 आणि 13 कलमी व्हिजन अंमलबजावणी आराखडा तसेच भारत सरकराचे पथदर्शी कार्यक्रम “मेक इन इंडिया”, “स्टार्ट अप इंडिया”, “स्मार्ट सीटीज’ “क्लीन इंडिया’ आणि “डिजिटल इंडिया” यांच्यात समन्वय साधून त्या अंतर्गत व्यापार आणि गुंतवणूक अधिक दृढ करण्याविषयी दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. भारतातील खाजगी / सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक आणि तंत्रज्ञ यांचे सौदी अरेबियातील आगामी मेगा प्रकल्पांमध्ये स्वागत असेल, असे सौदी सरकारतर्फे यावेळी जाहीर करण्यात आले. भारत आणि सौदी अरेबिया या दोन्ही देशातील अर्थव्यवस्थांमध्ये होत असलेल्या सकारात्मक परिवर्तनाची यावेळी दखल घेण्यात आली.
14. दोन्ही देशातील सरकारांनी व्यवसाय सुलभता, विद्यमान नियमांना तर्कसंगत तसेच,महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये परकीय थेट गुंतवणूकीच्या नियमांमध्ये शिथिलता आणण्यासाठी राबवण्यात आलेल्या महत्त्वाच्या उपक्रमांची दोन्ही पक्षांनी दाखल घेऊन त्याचे स्वागत केले.
15. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2016 च्या रियाध भेटीदरम्यान सौदी अरेबियन जनरल इनव्हेस्टमेंट ऑथोरीटी आणि इनव्हेस्ट इंडीया यांच्यात हवामान बदलासंदर्भात सहकार्य आराखडा करारवर झालेल्या स्वाक्षरीनंतर, या कराराच्या अंमलबजावणीविषयी दोन्ही देशांनी आनंद व्यक्त केला. दोन्ही देशातील उद्योजकांनी दोन्ही देशांमध्ये विशेषत: पायाभूत सुविधा, खाणकाम, अक्षय ऊर्जा, अन्न सुरक्षा आणि तंत्रज्ञान हस्तांतरण यासारख्या गुंतवणूकीच्या संधींचा वापर करण्यासाठी आणि माहिती तंत्रज्ञानातील कुशल मानव संसाधनांच्या क्षेत्रातील सहकार्य आणखी मजबूत करण्यासाठी आवाहन केले.
16. सौदी अरेबियातील औद्योगिक शहरांमध्ये आणि बंदरांमध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिकल सेवा उपलब्ध झाल्या असल्याचे सांगत भारतीय कंपन्या आणि उद्योजकांनी तेथील बाजारपेठेत गुंतवणूक करावी, असे आमंत्रण सौदी अरेबियाच्या राजपुत्रांनी यावेळी दिले.
17. भारतातील ऊर्जा, तेल शुद्धीकरण, पेट्रोकेमिकल्स, पायाभूत सुविधा, शेती, खनिजे आणि खाणकाम, उत्पादन, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात 100 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक करण्याच्या युवराजांच्या घोषणेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले.
18. दोन्ही देशांकडून उभारल्या जाणाऱ्या 44 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या पहिल्याच संयुक्त पश्चिम किनारी तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल प्रकल्पाच्या अंमलबजावणीविषयी उभय नेत्यांनी समाधान व्यक्त केले, मात्र त्याचवेळी या प्रक्रियेला गती देण्याची गरजही व्यक्त करण्यात आली. एका टप्पात सुरु होणारा हा प्रकल्प जगातला सर्वात मोठा ग्रीनफिल्ड तेलशुद्धीकरण प्रकल्प असेल. याव्यतिरिक्त, सार्वजनिक गुंतवणूक निधी आणि त्याच्या तंत्रज्ञान भागीदारांद्वारे 10 अब्ज डॉलर्ससह इतर गुंतवणूक मिळून सुमारे 26 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची चाचपणी केली जात आहे.
19. सौदी अरेबियाने भारतातील नॅशनल इनव्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड (एनआयआयएफ) आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये केलेल्या गुंतवणूकीचे पंतप्रधानांनी स्वागत केले. याच संदर्भात राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत निधी (एनआयआयएफ) मध्ये गुंतवणूक करण्याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्याविषयी दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. या करारामुळे द्विपक्षीय आर्थिक सहकार्य वाढवण्याचा मार्ग प्रशस्त होईल.
20. भारतात, ऊर्जा, शुद्धीकरण, पेट्रोकेमिकल्स, पायाभूत सुविधा, शेती, खनिजे आणि खाणकाम, उत्पादन, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रातील गुंतवणूकीच्या दृष्टीने सौदी अरेबियाने व्यक्त केलेल्या मनोदयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले.
21. गृहनिर्माण क्षेत्रातील सहकार्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. भारतीय कंपन्याना सौदी अरबमधील गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधानांनी प्रोत्साहित केले
22. त्याच्या रॉयल हाइनेस क्राउन प्रिन्सने आपत्ती प्रतिबंधक पायाभूत व्यवस्था उपक्रमासाठी समन्वय साधण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पुढाकाराचे सौदीच्या युवराजांनी स्वागत केले. आपत्ती व्यवस्थापनासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
23. राजनैतिक भागीदारीचा प्रमुख स्तंभ म्हणून ऊर्जा सुरक्षिततेचे महत्त्व लक्षात घेत, दोन्ही बाजूंनी ऊर्जा क्षेत्रामध्ये द्विपक्षीय व्यापार वाढविण्याची इच्छा व्यक्त केली, सऊदी अरबला तेल आणि गॅसच्या जगातील सर्वात विश्वासार्ह पुरवठादार आणि भारताचा प्रमुख पुरवठादार म्हणून मान्यता देण्यात आली. भारत-सौदी अरेबिया दरम्यान ऊर्जाविषयक सल्ला-मसलत चालू ठेवण्यावर दोन्ही देशांनी भर दिला. ऊर्जा-क्षेत्रातील खरेदीदार-विक्रेत्यातील नातेसंबंधातील गुंतवणूकीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी धोरणात्मक भागीदारी आणि पेट्रोकेमिकल संकुलांमध्ये संयुक्त उपक्रमांमध्ये रूपांतर करण्यास दोन्ही देश सहमत झाले.
24. कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या भारताच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी सौदी अरेबिया कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार सौदीच्या युवराजांनी केला. तेल आणि इंधानाच्या पुरवठ्यात कमतरता आल्यास इतर स्रोतांच्या माध्यमातून ती भरून काढण्याचे आश्वासनही युवराजांनी दिले.
25. भारताच्या आकस्मिक पेट्रोलियम साठ्यांमध्ये(SPRs) या देशाच्या सहभागाचे देखील पंतप्रधानांनी स्वागत केले.
26. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सहभागी होण्याच्या सौदीच्या बाजूने घेण्यात आलेल्या निर्णयाचे पंतप्रधानांनी स्वागत केले. दोन्ही देशांनी अपारंपरिक उर्जा क्षेत्रातील केवळ गुंतवणुकीचेच नव्हे तर संशोधन आणि विकासविषयक सहकार्याचे देखील महत्त्व लक्षात घेतले.
27. दोन्ही पक्षांकडून, रिमोट सेन्सिंग सहित अंतराळ, विज्ञान आणि तंत्रज्ञान, उपग्रह दळणवळण आणि उपग्रह आधारित दिशादर्शन या क्षेत्रातील सहकार्याबाबत सहमती व्यक्त करण्यात आली.
28. दोन्ही देशांनी कौशल्य विकासविषयक संयुक्त कृती गट स्थापन करण्याबाबत सहमती व्यक्त केली, ज्यामध्ये उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, दळणवळण आणि प्रोग्रॅमिंग यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात दोन्ही देशांना फायदेशीर ठरतील अशी क्षेत्रे निश्चित करण्याचा या गटाच्या स्थापनेमागील उद्देश आहे.
29. संरक्षण क्षेत्रात, विशेषतः या क्षेत्रातील प्रावीण्य आणि प्रशिक्षण यांच्यातील देवाणघेवाणीसंदर्भात विशेषत्वाने महामहीम राजे सलमान बिन अब्दुलअजीज अल सौद यांच्या फेब्रुवारी 2014 मधील भारतभेटीच्या वेळी झालेल्या सामंजस्य करारानंतर होणाऱ्या अलीकडच्या घडामोडींचे दोन्ही पक्षांनी स्वागत केले. या संदर्भात रियाध येथे अलीकडेच 2-3 जानेवारी 2019 रोजी झालेल्या संरक्षण सहकार्यविषयक चौथ्या संयुक्त समितीच्या फलनिष्पत्तीचे त्यांनी स्वागत केले.
30. दोन्ही बाजूंनी लवकरात लवकर दोन्ही देशांचा पहिला संयुक्त नौदल सराव आयोजित करण्याबाबत आणि इतर क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याचा विस्तार करण्याबाबत सहमती व्यक्त केली आहे.
31. परस्परांचा फायदा आणि वाव ओळखून दोन्ही देशांनी नौदल आणि त्याचबरोबर जमिनीवर वापरल्या जाणाऱ्या संरक्षणविषयक प्रणालींसाठी सुट्या भागांच्या उत्पादनासाठी त्याचबरोबर पुरवठा साखळी निर्माण करण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ आणि ‘व्हिजन 2030’ ला अनुसरून परस्परांना सहकार्य आणि सहयोग करण्याबाबत सहमती व्यक्त केली.
32. दोन्ही देशांची सुरक्षा आणि समृद्धीसाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या सागरी सुरक्षेसाठी आणि या मार्गाने होणारा आंतरराष्ट्रीय व्यापार सुरक्षित राखण्यासाठी हिंदी महासागराच्या परिघावर असलेल्या इतर देशांशी एकत्रित काम करण्याबाबत दोन्ही पक्षांनी सहमती व्यक्त केली.
33. दोन देशांमधील प्रादेशिक जोडणी प्रकल्प, देशांची प्रादेशिक एकात्मता आणि सार्वभौमत्वाचा आदर यांच्यासह आंतरराष्ट्रीय कायद्याला अनुसरून असावेत याबाबत दोन्ही पक्षांनी सहमती व्यक्त केली.
34. प्रादेशिक स्थैर्य आणि शेजाऱ्यांशी चांगले संबंध यावर दोन्ही देशांनी भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी वैयक्तिक पुढाकारासह केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची महामहीम राजपुत्रांनी प्रशंसा केली.या संदर्भात दोन्ही देशांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सर्वसमावेशक संवाद पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले वातावरण निर्माण करण्याच्या गरजेवर सहमती व्यक्त केली.
35. दहशतवाद आणि कट्टरवाद यांचा धोका सर्वच राष्ट्रांना आणि समाजांना असल्याचे मान्य करत दोन्ही पक्षांनी या सार्वत्रिक समस्यांचा संबंध कोणताही धर्म, पंथ आणि संस्कृतीशी जोडण्याचा कोणताही प्रयत्न अमान्य केला. दुसऱ्या देशांच्या विरोधात दहशतवादाच्या वापराला विरोध करण्याचे, दहशतवादाच्या पायाभूत सुविधा ज्या ठिकाणी अस्तित्वात आहेत तिथून नष्ट करण्याचे आणि त्यांना होणारा अर्थपुरवठा आणि कोणत्याही प्रकारचे पाठबळ खंडित करण्याचे, दहशतवाद पसरवणाऱ्यांचे सर्व प्रदेशातून उच्चाटन करण्याचे आणि त्यांना कायद्याच्या कक्षेत आणण्याचे आवाहन दोन्ही देशांनी सर्व देशांना केले आहे.
आंतरराष्ट्रीय दहशतवादाविषयीचा संयुक्त राष्ट्रांचा सर्वसमावेशक ठराव लवकरात लवकर स्वीकृत करण्यासह, आंतरराष्ट्रीय समुदायाकडून दहशतवादाविरोधात एकत्रित कृती करण्याची गरज देखील दोन्ही देशांनी नमूद केली आणि संयुक्त राष्ट्रांकडून दहशतवाद्यांवर आणि त्यांच्या संघटनांवर कठोर निर्बंध लादण्याचे महत्त्व दोन्ही देशांनी अधोरेखित केले.
36. दहशतवाद हे एखाद्या देशाचे धोरण म्हणून राबवण्याला विरोध करण्याचे आवाहन दोन्ही पक्षांनी सर्व देशांना केले. इतर देशांविरोधात दहशतवादी कारवाया करण्यासाठी दहशतवाद्यांच्या हाती क्षेपणास्त्रे किंवा ड्रोन यांच्यासह शस्त्रास्त्रे पडता कामा नयेत, याची खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी सर्व देशांना केले.
37. पंतप्रधान आणि त्यांचे शाही महामहीम यांनी The Prime Minister and His 14 फेब्रुवारी, 2019 रोजी जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला.
38. दोन्ही देशांनी परस्परांच्या हिताच्या पश्चिम आशिया आणि मध्यपूर्वेतील सुरक्षाविषयक स्थिती, सामायिक हिताचे प्रादेशिक आणि जागतिक शांतताविषयक मुद्दे, सुरक्षा आणि स्थैर्य यांसह प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा केली. दोन्ही देशांनी सुरक्षा परिषदेचा सिरिया प्रश्नावरील तोडग्याशी संबंधित ठराव (2254) आणि सुरक्षा परिषदेचा ठराव (2216), जीसीसी पुढाकार आणि येमेनमधील समस्येवरील तोडग्यासाठी येमेनी राष्ट्रीय संवादाची फलनिष्पत्ती याबाबत चर्चा केली.
39. दोन्ही देशांनी पॅलेस्टिनी जनतेला त्यांच्या न्याय्य हक्काची हमी देण्यासाठी, अरब शांतता पुढाकार आणि संयुक्त राष्ट्रांचे संबंधित ठराव यावर आधारित न्याय्य आणि सर्वसमावेशक आणि चिरंतन शांतता टिकवणारे वातावरण मध्यपूर्वेमध्ये निर्माण होण्याची आशा व्यक्त केली
40. दहशतवाद प्रतिबंधाच्या प्रयत्नांमध्ये आणखी सहकार्य वाढवण्यासाठी आणि दोन्ही देशांदरम्यान गुप्तचरांच्या माहितीची तात्काळ(रिअल टाईम) देवाणघेवाण करण्यासाठी दोन्ही देशांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवर सर्वसमावेशक सुरक्षा संवाद करण्याबाबत आणि दहशतवाद प्रतिबंधक संयुक्त कार्यगट स्थापन करण्याबाबत सहमती व्यक्त केली.
41. पंतप्रधान आणि त्यांचे शाही महामहीम यांनी सुरक्षाविषयक विविध मुद्यांवर विशेषत सागरी सुरक्षा, कायद्याची अंमलबजावणी, मनी लॉन्डरिंग अर्थात अवैध सावकारी प्रतिबंध, अंमली पदार्थांची तस्करी, मानवी तस्करी, बेकायदेशीर स्थलांतर आणि इतर प्रकारचे आंतरराष्ट्रीय गुन्हे यासंदर्भात सध्या सुरू असलेले सहकार्य पुढे सुरू ठेवण्याचे ठरवले.
42. सायबर स्पेसचा वापर कट्टरवादी आणि विघटनवादी विचारसरणीचा प्रसार करण्याचे एक माध्यम म्हणून केला जात असल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त करत दोन्ही देशांनी सायबर स्पेसमधील तांत्रिक सहकार्य आणि सायबर गुन्हे रोखण्याच्या एका सामंजस्य करारावर सह्या करण्याचे स्वागत केले. दहशतवादासाठी, मूलतत्ववादासाठी आणि सामाजिक सौहार्द नष्ट करण्यासाठी सायबरस्पेसचा वापर यांसह या क्षेत्रातील सहकार्याला चालना देण्याबाबत दोन्ही पक्षांनी सहमती व्यक्त केली.
43. एका विशाल भारतीय समुदायाचे आतिथ्य करण्याबद्दल आणि त्यांच्या समृद्धीला आणि कल्याणाला प्रोत्साहन देत असल्याबद्दल भारतीय बाजूने सौदी नेतृत्वाचे आभार मानले.
44. 32व्या सौदी राष्ट्रीय वारसा आणि संस्कृती महोत्सवात ‘जनाद्रियाह 2018’ मध्ये भारताला मानाचा अतिथी म्हणून नामांकित केल्याबद्दल पंतप्रधानांनी सौदी नेतृत्वाचे आभार मानले. दोन्ही देशांच्या जनतेमध्ये थेट संवाद व्हावा आणि सांस्कृतिक सहकार्य वृद्धिंगत व्हावे यासाठी ‘इंडिया वीक इन सौदी अरेबिया’ आणि ‘सौदी अरेबिया वीक इन इंडिया’ या कार्यक्रमांचे नियमित आयोजन करण्यावर दोन्ही देशांनी भर दिला.
45. दोन पवित्र मशिदींचे काळजीवाहक बनल्याबद्दल आणि भारतातून हज यात्रेला जाणाऱ्या हज यात्रेकरूंचा कोटा सध्या असलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणात 200,000 इतका केल्याबद्दल पंतप्रधांनानी महामहीम राजपुत्रांचे आभार मानले.
46. दोन पवित्र मशिदींचे काळजीवाहक आणि महामहीम यांनी सौदीच्या तुरुंगातून 350 भारतीयांच्या मुक्ततेचे आदेश दिल्याबद्दल त्यांचे पंतप्रधानांनी आभार मानले.
47. दोन्ही बाजूंनी पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि त्याच्या मार्गातले कौन्स्युलर आणि इमिग्रेशनविषयक अडथळे दूर करण्यासाठी दोन्ही देशांच्या जनतेमधील संवाद वाढवण्याची आवश्यकता दोन्ही पक्षांनी व्यक्त केली.
48. सौदी अरेबियन एयरलाईन्सच्या जागांमध्ये मासिक 80,000 वरून 112,000 जागा इतकी वाढ करण्याची भारत सरकारने तयारी दर्शवली आहे आणि त्यामध्ये आणखी वाढ करण्याबाबत अभ्यास सुरू आहे.
49. दोन्ही देश स्थलांतरासाठीच्या ई- मायग्रेट आणि ई तौथिक या स्थलांतर मंचांचे एकीकरण करून एक भक्कम स्थलांतरविषयक वातावरण निर्माण करण्याचेही दोन्ही देशांचे प्रयत्न आहेत.
50. सर्वसामान्यपणे भारतीय समुदायाच्या आणि हज/ उमराह यात्रेकरूंच्या सोयीसाठी रुपे या पेमेंट प्रणालीसह पेमेंट प्रणाली तयार करण्यासाठीच्या संधी निर्माण करण्यासाठी सहकार्य करण्याबाबत दोन्ही देशांनी सहमती व्यक्त केली. सौदी अरेबियात स्वतःची कोणतीही चूक नसताना अडकून पडलेल्या भारतीय मजुरांचा ‘इकामाह’ हा प्रश्न मानवतेच्या दृष्टीकोनातून सोडवल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे शाही अतिथी राजपुत्र सलमान यांचे आभार मानले.
51. संयुक्त राष्ट्रे, जी-20, डब्लूटीओ इ. आंतरराष्ट्रीय संघटना आणि बहुस्तरीय मंच यावर बहुपक्षवादाला चालना देण्यासाठी दोन्ही देशांनी वचनबद्धता व्यक्त केली. यासंदर्भात त्यांनी संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद, डब्लूटीओ, आंतरराष्ट्रीय वित्तीय प्रणाली इ. सारख्या आंतरराष्ट्रीय प्रशासन संस्थांच्या सुधारणेच्या गरजेवर भर दिला.
52. जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी समकालीन वस्तुस्थितींवर संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रतिबिंबित झालेल्या बाबींवर आधारित एक प्रभावी बहुस्तरीय प्रणाली निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. संयुक्त राष्ट्रांमध्ये सुरक्षा परिषदेतील सुधारणेसह इतर सुधारणा तातडीने करण्याच्या आवश्यकतेवरही त्यांनी भर दिला.
53. फरार आर्थिक गुन्हेगारांच्या समस्येची हाताळणी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटना आणि संस्थांच्या माध्यमातून एकत्रित प्रयत्न करण्याबाबतही त्यांनी वचनबद्धता व्यक्त केली.
54. महामहीम राजपुत्र मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुलअजीज, उपपंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांनी त्यांच्या आणि त्यांच्यासोबत असलेल्या शिष्टमंडळाचे जिव्हाळ्याने स्वागत केल्याबद्दल आणि आदरातिथ्याबद्दल भारत सरकार आणि भारतीय जनतेचे आभार मानले.
B. Gokhale/ R. Aghor/ S. Patil
भारत और सऊदी अरब के आर्थिक, सामाजिक और सांस्कृतिक सम्बन्ध सदियों पुराने हैं। और यह सदैव सौहार्द्रपूर्ण और मैत्रीपूर्ण रहे हैं। हमारे लोगों के बीच के घनिष्ठ और निकट संपर्क हमारे देशों के लिए एक सजीव सेतु यानि living bridge है: PM @narendramodi pic.twitter.com/eTdPnOXEKE
— PMO India (@PMOIndia) February 20, 2019
हिज मेजेस्टी की, और रॉयल हाईनेस आपकी, व्यक्तिगत रुचि और मार्गदर्शन से हमारे द्विपक्षीय सबंधों में और भी प्रगाढ़ता, मधुरता और शक्ति आई हैं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 20, 2019
आज, 21वीं सदी में, सऊदी अरब, भारत के सबसे मूल्यवान strategic partners में है।
— PMO India (@PMOIndia) February 20, 2019
यह हमारे विस्तृत पड़ोस में है, एक करीबी दोस्त है और भारत की ऊर्जा सुरक्षा का महत्वपूर्ण स्रोत भी है: PM @narendramodi
आज हमने द्विपक्षीय संबंधों के सभी विषयों पर व्यापक और सार्थक चर्चा की है। हमने अपने आर्थिक सहयोग को नई ऊंचाइयों पर ले जाने का निश्चय किया है: PM @narendramodi pic.twitter.com/YobAUzKQup
— PMO India (@PMOIndia) February 20, 2019
हमारे ऊर्जा संबंधों को स्ट्रेटेजिक पार्टनरशिप में तब्दील करने का समय आ गया है। दुनिया की सबसे बड़ी रिफाइनरी और स्ट्रेटेजिक पेट्रोलियम रिज़र्व में सऊदी अरब की भागीदारी, हमारे ऊर्जा संबंधों को buyer-seller relation से बहुत आगे ले जाती है: PM @narendramodi pic.twitter.com/h2zYnL9lNN
— PMO India (@PMOIndia) February 20, 2019
हम अक्षय ऊर्जा के क्षेत्रों में अपने सहयोग को मज़बूत करने पर सहमत हुए हैं। हम इंटरनेशनल सोलर अलायंस में सऊदी अरब का स्वागत करते हैं। परमाणु ऊर्जा के शांतिपूर्ण उपयोग, विशेषरूप से water desalination और स्वास्थ्य के लिए, हमारे सहयोग का एक और आयाम होंगे: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 20, 2019
विशेषकर अपने strategic वातावरण के संदर्भ में, हमने आपसी रक्षा सहयोग को मज़बूत करने और उसका विस्तार करने पर भी सफल चर्चा की है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 20, 2019
पिछले हफ्ते पुलवामा में हुआ बर्बर आतंकवादी हमला, इस मानवता विरोधी खतरे से दुनिया पर छाए कहर की एक और क्रूर निशानी है।
— PMO India (@PMOIndia) February 20, 2019
इस खतरे से प्रभावशाली ढंग से निपटने के लिए हम इस बात पर सहमत हैं कि आतंकवाद को किसी भी प्रकार का समर्थन दे रहे देशों पर सभी संभव दबाव बढ़ाने की आवश्यकता है: PM
आतंकवाद का इंफ्रास्ट्रक्चर नष्ट करना और इसको समर्थन समाप्त करना और आतंकवादियों और उनके समर्थकों को सजा दिलाना बहुत जरूरी है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 20, 2019
साथ ही अतिवाद के खिलाफ सहयोग और इसके लिए एक मज़बूत कार्ययोजना की भी ज़रूरत है, ताकि हिंसा और आतंक की ताकतें हमारे युवाओं को गुमराह न कर सकें। मुझे खुशी है कि सऊदी अरब और भारत इस बारे में साझा विचार रखते हैं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 20, 2019
पश्चिम एशिया और खाड़ी में शांति और स्थिरता सुनिचित करने में हमारे दोनों देशों के साझा हित हैं। आज हमारी बातचीत में, इस क्षेत्र में हमारे कार्यों में तालमेल लाने और हमारी भागीदारी को तेजी से आगे बढ़ाने पर सहमति हुई है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 20, 2019
हम इस बात पर भी सहमत हुए हैं कि counter terrorism, समुद्री सुरक्षा और साइबर सुरक्षा जैसे क्षेत्रों में और मजबूत द्विपक्षीय सहयोग दोनों देशों के लिए लाभप्रद रहेंगे: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 20, 2019
Your Royal Highness, आपकी यात्रा ने हमारे रिश्तों के तेज विकास को एक नया आयाम दिया।
— PMO India (@PMOIndia) February 20, 2019
मैं एक बार फिर, हमारे निमंत्रण को स्वीकार करने के लिए रॉयल हाईनेस का शुक्रिया अदा करता हूँ। मैं उनके और प्रतिनिधिमंडल के सभी सदस्यों की भारत में सुखद प्रवास की कामना भी करता हूँ: PM @narendramodi pic.twitter.com/VOVz3zOORr