Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सेंट्रल रेलसाइड वेअरहाउस कंपनी लिमिटेडचे  (सीआरडब्ल्यूसी) आणि सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन (सीडब्ल्यूसी) बरोबर विलीनीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


 

पंतप्रधानांच्या किमान शासन कमाल कारभार या संकल्पनेच्या  दिशेने अंमलबजावणीसाठी  आणखी एक पाऊल उचलत  व्यवसाय  सुलभतेला प्रोत्साहन  आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये खासगी क्षेत्राची कार्यक्षमता आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने सेंट्रल रेलसाइड वेअरहाउस कंपनी लिमिटेड‘ (सीआरडब्ल्यूसी) या मिनी रत्न श्रेणी -२ मधील केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कम्पनीची सर्व मालमत्ता, दायित्व, हक्क आणि जबाबदाऱ्या यांचे सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन मध्ये विलीनीकरण व हस्तांतरण करायला मान्यता दिली आहे. विलीनीकरणामुळे दोन्ही कंपन्यांच्या गोदाम, हाताळणी आणि वाहतूक यासारख्या समान कामांचे एकत्रीकरण होईल. आणि  एकाच प्रशासनाच्या माध्यमातून कार्यक्षमता, योग्य क्षमता वापर, पारदर्शकता, उत्तरदायित्व, आर्थिक बचत सुनिश्चित करण्यासाठी आणि नवीन गोदाम क्षमता वाढवण्यात मदत होईल.

कॉर्पोरेट कार्यालय भाडे, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर प्रशासकीय खर्चात बचत झाल्यामुळे रेलसाइड वेअरहाउस कॉम्प्लेक्सचा व्यवस्थापन खर्च (आरडब्ल्यूसी) 5 कोटी रुपयांनी कमी होण्याचा अंदाज आहे. आरडब्ल्यूसीच्या क्षमता वापरामध्येही सुधारणा होईल कारण सीडब्ल्यूसी सध्या साठवल्या जाणाऱ्या सिमेंट, खत, साखर, मीठ आणि सोडा या वस्तूंव्यतिरिक्त इतर वस्तू साठवण्याची शक्यता आहे. विलीनीकरण माल शेडच्या ठिकाणी आणखी किमान 50  रेलसाईड गोदामे उभारण्यास मदत करेल. यामुळे कुशल कामगारांसाठी 36,500  आणि अकुशल कामगारांना 9,12,500 मनुष्य दिवस इतक्या रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. निर्णयाच्या तारखेनंतर 8 महिन्यांत हे विलीनीकरण पूर्ण होणे अपेक्षित आहे.

सीडब्ल्यूसी ही एक मिनी रत्न श्रेणी –1 मधील सीपीएसई आहे जी केंद्र सरकारकडून अधिसूचित कृषी उत्पादन व काही अन्य वस्तूंच्या गोदामांच्या उद्देशाने व तेथे संबंधित बाबींसाठी गोदाम महामंडळांचे नियमन करण्यासाठी 1957 मध्ये स्थापन करण्यात आली. सीडब्ल्यूसी एक नफा कमवणारी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी (पीएसई) आहे ज्याचे अधिकृत भांडवल 100 कोटी आहे आणि पेड अप भांडवल 68.02 कोटी रुपये आहे. सीडब्ल्यूसीने 10 जुलै 2007 रोजी सेंट्रल रेलसाइड वेअरहाऊस कंपनी लि.’ (सीआरडब्ल्यूसी) नावाची वेगळी सहाय्यक कंपनी स्थापन करून रेल्वेकडून भाड्याने घेतलेल्या जागेवर रेलसाइड वेअरहाउसिंग कॉम्प्लेक्स / टर्मिनल्स / मल्टिमॉडल लॉजिस्टिक हब विकसित करणे, संपादित करणे आणि ऑपरेट करण्याची योजना असून यासाठी 10 जुलै 2007 रोजी कंपनीची स्थापना केली. सीआरडब्ल्यूसी मध्ये 50 कर्मचारी आणि 48 आउटसोर्स कर्मचारी आहेत. सध्या ते देशभरात 20 रेलसाईड वेअरहाउसचे परिचालन पाहतात.  31 मार्च 2020 पर्यंत कंपनीचे निव्वळ मूल्य  (पेड अप कॅपिटल प्लस फ्री रिझर्व) 137.94  कोटी रुपये आहे. सीआरडब्ल्यूसीने आरडब्ल्यूसीच्या विकास आणि परिचालनात विशेषत: कौशल्य विकसित केले मात्र  भांडवलाच्या कमतरतेमुळे आणि रेल्वे मंत्रालयाबरोबर त्याच्या सामंजस्य करारातील काही प्रतिबंधात्मक कलमांमुळे त्याची वाढ अपेक्षेप्रमाणे झाली नाही.

सीडब्ल्यूसी हा सीआरडब्ल्यूसीचा एकमेव भागधारक आहे आणि सर्व मालमत्ता आणि दायित्व आणि अधिकार आणि जबाबदाऱ्या सीडब्ल्यूसीकडे हस्तांतरित केल्या जातील, त्यामुळे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही तर  समन्वय वाढेल. आरडब्ल्यूसीच्या परिचालन आणि विपणन यासाठी सीडब्ल्यूसीकडून आरडब्ल्यूसी डिवीजननावाचा स्वतंत्र विभाग तयार केला जाईल.

***

U.Ujgare/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com