Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सेंट्रल इनलॅण्ड वॉटर ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या बरखास्तीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सेंट्रल इनलॅण्ड वॉटर ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या बरखास्तीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. सीआयडब्ल्यूटीसीमध्ये सन 2015 मध्ये ऐच्छिक निवृत्ती योजना राबविण्यात आली होती. यासंबंधीचा निर्णय दि. 24 डिसेंबर 2014 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.

सीआयडब्ल्यूटीसी या कंपनीची स्थापना दि. 22 फेब्रुवारी 1967 रोजी भारत सरकारच्या कंपनी कायदा 1956 अन्वये करण्यात आली होती. कंपनीच्या स्थापनेपासूनच ती तोट्यात होती. सध्या कंपनीत फक्त पाच कर्मचारी आहेत.

तोट्यातील कंपन्या आणि सार्वजनिक संस्था बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कंपनीच्या मालमत्तेचा अधिक चांगला आणि जनतेच्या लाभासाठी उपयोग व्हावा यासाठी सरकारनं योजनाही आखली आहे.

N.Sapre/S.Bedekar/P.Kor