Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गंत विकास आयुक्त कार्यालयात भारतीय उद्योग विकास सेवेच्या निर्मितीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी


सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गंत विकास आयुक्त कार्यालयात भारतीय उद्योग विकास सेवेच्या निर्मितीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. नव्या प्रवर्गाच्या निर्मितीमुळे तसेच रचनेतील बदलामुळे संघटना बळकट होण्याबरोबरच स्टार्ट अप इंडिया, स्टॅण्ड अप इंडिया आणि मेक इन इंडिया या कार्यक्रमांचे उद्दिष्ट साध्य करण्यातही मदत मिळणार आहे.

या मंजूरीमुळे तांत्रिक अधिकाऱ्यांच्या समर्पित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संघटनेची क्षमता आणि कार्यशीलता वाढणार असून संबंधित क्षेत्रात विकास साध्य करणे अधिक सोपे होणार आहे.

B.Gokhale/M.Pange/Anagha