Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सुफी विद्वानांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली

सुफी विद्वानांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली

सुफी विद्वानांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली

सुफी विद्वानांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली

सुफी विद्वानांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली

सुफी विद्वानांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली

सुफी विद्वानांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली


सुफी संतांची विचारधारा हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असून बहुविध, बहुसांस्कृतिक भारताच्या निर्मितीतही या विचारधारेचं मोलाचं योगदान असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. देशाच्‍या विविध भागातल्या 40 बारेल्व्ही सुफी संताच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. जहाल शक्ती सध्या सुफी विचारधारा दुर्बल करण्याचा प्रयत्न करत आहेत. जहाल तत्त्वांच्या या विचारांना भारतात थारा मिळू नये यासाठी सुफी संत आणि विद्वानांनी सोशल मिडियासह विविध मार्गाचा अवलंब करत या शक्तींना रोखणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

सुफी तत्त्वज्ञानाच्या परंपरेनं दुष्ट प्रवृत्ती नेहमी बाजूलाच ठेवल्‍या आहेत आणि या तत्त्वज्ञानाने नेहमीच भरभराट होत राहिली आहे.

केंद्र सरकारने सुरू केलेल्या कौशल्य विकास योजना आणि कार्यक्रमांचा मुस्लीम समुदायाने जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन पंतप्रधानांनी केले. या शिष्टमंडळाने वक्फ मालमत्तेसंदर्भात उपस्थित केलेल्या मुद्यांबाबत लक्ष घालण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सुफी संस्कृती आणि संगीताला राज्यांनी योग्य ते प्रोत्साहन द्यावे असेही पंतप्रधान म्हणाले. इस्लाम द्वेष किंवा जहालतावादाची शिकवण देत नाही असे या शिष्टमंडळाने पंतप्रधानांशी संवाद साधताना सांगितले. मुस्लीम समुदायाने पंतप्रधानांसमवेत सलोख्याचे संबंध ठेवू नये अशी काही शक्तींची इच्छा आहे. फूटीच्या राजकारणावर आधारित व्होट बँकेमुळे मुस्लीम समुदाय आतापर्यंत सरकारशी केवळ मध्यस्थांमार्फत संवाद साधू शकत होता मात्र आता पंतप्रधानांनी, मुस्लीम समुदायासह, जनतेशी थेट संवाद साधावा असे त्यांना वाटत आहे. जात, पंथ, धर्म भेद न करता जनतेच्या विकासासाठी कार्य करावे अशी विनंती त्यांनी पंतप्रधानांना केली.

इस्लामच्या नावावर दहशतवादाचा प्रसार म्हणजे संपूर्ण जगाच्या शांततेला धोका आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकारणाच्या नावाखाली जिहादला प्रोत्साहन देणाऱ्या शक्तींना आवर घालण्यासाठी कृती करण्याची तातडीची गरज असल्याचे या शिष्टमंडळाच्या सदस्यांनी सांगितले. आयएसआयएस, अल कायदासारख्या संघटना इस्लामच्या मार्गावरुन जात नाहीत याबाबत मुस्लिम समुदायात जागृती निर्माण करण्याची गरजही या सदस्यांनी व्यक्त केली.

सुफी विचारधारा आणि संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे यासाठी सदस्यांनी अनेक सूचनाही केल्या. भारतातल्या सुफी श्रद्धास्थानांच्या पुनरुज्जीवनासाठी, पर्यटनाला चालना देण्यासाठी सुफी मंडळ निर्माण करण्याची सूचनाही या सदस्यांनी केली आहे. एआययूएमबीचे अध्यक्ष आणि संस्थापक हझरत सय्यद मोहंमद अश्रफ किछोवछीबी, कोलकात्याच्या मकदूम अश्रफ मिशनचे अध्यक्ष हसरत सय्यद जलालुद्दीन अश्रफ, हजरत सय्यद अहमद निझामी, सज्जाद नाशिन, दर्गा हझरत निझामुद्दीन औलिया, नवी दिल्ली, ऑल इंडिया मुस्लिम स्कॉलर असोसिएशनचे सरचिटणीस शेख अबुबकर अहमद मुस्लियार, अजमेर शरीफच्या दर्गा ए ख्वाजा मुइनुद्दीन चिश्तीचे अधिकारी हजरत सय्यद मेहंदी चिश्ती आणि शिक्षणतज्ञ जनाब निसार अहमद यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

N.Chitale/S.Tupe