Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सीमा सुरक्षा बलातील गट “अ” कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संवर्ग आढाव्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी


सीमा सुरक्षा दलाच्या परिचलनात्मक आणि प्रशासकीय क्षमता वाढविण्यासाठी गट “अ” कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संवर्ग आढाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली. त्यानुसार सहाय्यक कमांडंट ते अतिरिक्त महासंचालक अशा विविध दर्जाच्या 74 पदांचीही निर्मितीही केली जाणार आहे.

या मंजूरीनुसार गट “अ”मध्ये असणाऱ्या 4,109 पदांची संख्या 4,183 होणार आहे.

अतिरिक्त महासंचालक दर्जाचे एक पद वाढविण्यात आले आहे. महानिरीक्षक दर्जाची 19 डीआयजी/कमांडंट/21सी दर्जाची 370 तर सहाय्यक कमांडंट दर्जाची 14 पदे वाढविण्यात आली आहेत. उपकमांडंट दर्जांच्या 330 पदांची कपात करण्यात आली आहे.

B.Gokhale/M.Pange/Anagha