पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सीमा शुल्कविषयक बाबींमध्ये सहकार्य आणि परस्पर सहकार्य यावरील भारत आणि फिलिपिन्स यांच्यातील करारावर स्वाक्षरी करायला आणि त्याला मान्यता द्यायला मंजुरी दिली आहे.
सीमा शुल्क विषयक गुन्ह्यांना प्रतिबंध आणि चौकशीसाठी संबंधित माहिती मिळवण्यासाठी या करारामुळे मदत होईल. या करारामुळे व्यापार सुलभ होईल आणि देशांदरम्यान मालाची प्रभावीपणे आणि सुरळीत वाहतूक होण्यास मदत होईल.
कराराच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक राष्ट्रीय कायदेशीर आवश्यकता दोन्ही देशांनी पूर्ण केल्यानंतर हा करार लागू होईल.
Gopal/S.Kane/D.Rane