नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2023
77व्या स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीत ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की सीमावर्ती गावांमध्ये सरकारने व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रम सुरू केला आहे. ते म्हणाले की यापूर्वी सीमावर्ती गावे देशातील शेवटची गावे मानली जात होती, पण या दृष्टीकोनात बदल झाला आहे. त्यांनी सांगितले की आता या गावांना शेवटची गावे नव्हे तर सीमेवरील पहिली गावे मानले जात आहे. सूर्य पूर्वेला उगवतो आणि सूर्याचे पहिले किरण सीमेवरील पहिल्या गावाला स्पर्श करते आणि जेव्हा सूर्य मावळतो त्यावेळी या बाजूच्या गावाला त्याच्या शेवटच्या किरणाचा फायदा होतो, असे त्यांनी नमूद केले. सीमावर्ती गावातील सुमारे 600 सरपंचांना स्वातंत्र्यदिन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्यात आल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. हे विशेष अतिथी इतक्या दूर अंतरावर पहिल्यांदाच नवा निर्धार आणि बळ घेऊन आले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.
* * *
S.Thakur/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai