राष्ट्राध्यक्ष ओलांद, राष्ट्राध्यक्ष ओबामा, महामहिम बिल गेट्स, सन्माननीय अतिथी,
फ्रान्सने दाखविलेल्या धैर्य आणि कटिबध्दतेसाठी राष्ट्राध्यक्ष ओलांद आणि तिथल्या जनतेला सलाम, तसेच पॅरिस आणि फ्रान्ससाठी एकजूट दाखविल्याबद्दलही संपूर्ण जगाला माझा सलाम.
येथे केलेली अप्रतिम व्यवस्था या महान राष्ट्राच्या वैशिष्टपूर्णतेचे दर्शन घडवत आहे. पृथ्वीने चिरंतन मार्गावरुन वाटचाल करावी यासाठी संपूर्ण जग येथे एकत्र जमले आहे.
जागतिक तापमान वाढ आणि कार्बन उत्सर्जनाविषयीच्या उद्दिष्टांबाबत आपण बोलले पाहिजे. त्यासाठीच्या साधनांवरही आपण लक्ष केंद्रित करायला हवे. ज्यामुळे ही वाटचाल नैसर्गिक आणि सुलभ राहील.
बरीच मोठी लोकसंख्या गरीबीत राहण्याबरोबरच सूर्यास्तानंतर अंधारात जीवन जगते. त्यांची घरं आणि भविष्य उजळून टाकण्यासाठी त्यांना प्रकाशाची गरज आहे.
औद्योगिक युगाचा परिणामही त्यांना मोठया प्रमाणात भोगावा लागत आहे. ऊर्जेची उपलब्धता आणि उत्तम जीवनमान ही जागतिक आकांक्षा आहे. स्वच्छ पर्यावरण आणि आरोग्यदायी सवयींनाही हे लागू होते.
हवामानविषयक न्याय्य भावनेने पाहताना जे अद्याप विकासाच्या सुरुवातीच्या पायऱ्यांवर आहेत अशा अनेकांची संधी मूठभर लोकांमुळे, हिरावली जाता कामा नये याची खातरजमा आपण करायला हवी.
विकसित राष्ट्रांनी, विकसनशील राष्ट्रांच्या विकासासाठी योग्य ती मुभा ठेवायला हवी. आणि विकासाच्या मार्गावरुन वाटचाल करताना कमीत कमी कार्बन उर्त्सजनासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे.
त्यासाठी, सर्वांच्या आवाक्यात येईल अशा स्वच्छ ऊर्जेसाठी भागीदारी करण्याकरिता आपण एकत्र यायला हवे.
हवामानबदलाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी आणि न्याय्य पर्यावरणासाठी कल्पकता महत्वपूर्ण आहे.
त्यामुळे ही नाविन्यपूर्णतेसंदर्भातली परिषद वैशिष्टयपूर्ण आहे. समान हेतूसाठी ही परिषद आपल्याला एकत्र आणत आहे.
नवीकरणीय ऊर्जा अधिक स्वस्त, अधिक खात्रीशीर, आणि ट्रान्समिशन ग्रीडला सहज जोडण्याजोगी व्हावी यासाठी संशोधन आणि कल्पकतेची आपल्याला गरज आहे.
अपारंपरिक ऊर्जा आपण स्वच्छ बनवू शकतो. नवीकरणीय ऊर्जेचे नवे स्रोत आपण विकसित करु शकतो.
आपल्या सर्वांच्या एकत्रित भविष्यासाठी ही जागतिक जबाबदारी आहे.
बौध्दिक संपदेसह आपले शोध जनकल्याणाच्या हेतूने प्रेरित असावेत, केवळ बाजारासाठीच्या प्रोत्साहनांनी प्रेरित नकोत. विकसनशील देशांप्रती पुरवठादारांची असलेली कटिबध्दताही यात येते. यामुळे स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान सर्वांना वाजवीदरात उपलब्ध होईल.
ही भागीदारी सरकारचे उत्तरदायित्व आणि खाजगी क्षेत्राची कल्पक क्षमता यांचा मिलाफ साधेल. संशोधन आणि नाविन्यपूर्ण कल्पना यासाठीची आमची गुंतवणूक आम्ही दुप्पट करण्याबरोबरच आपापसातले सहकार्य अधिक दृढ करु. येत्या दहा वर्षातल्या नवीकरणीय ऊर्जेवर लक्ष केंद्रीत करणारे 30-40 विद्यापीठे आणि प्रयोगशाळांचे आंतरराष्ट्रीय जाळे आपल्याकडे हवे. नाविन्यपूर्ण कल्पनांचा स्वीकार करणारी त्यांना वाजवी दरात उपलब्ध करुन देणाऱ्या साधनांची जोडही हवी. येथे उपस्थित असलेल्या अनेक देशात खाजगी-सरकारी भागीदारीची यशस्वी मॉडेल्सही आहेत. भारतही बेटांवरच्या छोटया देशांसह, विकसनशील देशांत नवीकरणीय ऊर्जा क्षमता निर्माण करत आहे. स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान आणि किंमत याबाबतची प्रगती प्रभावी आहे. आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर आपण जगात बदल घडवून आणू शकतो.
कार्बन कमी असणाऱ्या नव्या युगाच्या नव्या अर्थव्यवस्थेचा पायाही आपण घालू शकतो. पर्यावरणशास्त्र आणि अर्थव्यवस्था यांच्यातला तसेच वारसा आणि भविष्याप्रती उत्तरदायित्व यांच्यातला समतोल आपण पुन्हा आणू शकतो. याबरोबरच गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत जे जग आपण पाहणारही नाही त्या भावी जगासाठी काळजी घेऊ.
N.Chitale/S.Tupe/N.Sapre
Talked about the importance of innovation to combat climate change at the Innovation Summit hosted by @POTUS. https://t.co/Yev9nklBBF #COP21
— Narendra Modi (@narendramodi) November 30, 2015
Through research & innovation, we must make renewable energy cheaper, reliable & conventional energy cleaner. #COP21 @COP21 @India4Climate
— Narendra Modi (@narendramodi) November 30, 2015
Together, we shall live up to Mahatma Gandhi's call to care for a world that we shall not see. #COP21 @COP21 @COP21en @India4Climate
— Narendra Modi (@narendramodi) November 30, 2015