सिस्कोचे अध्यक्ष जॉन चाम्बर्स यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
बैठकीदरम्यान चाम्बर्स यांनी पंतप्रधानांना सिस्कोच्या देश डिजिटायझेशन गतिवर्धन कार्यक्रमाचे घटक समजावून सांगितले आणि पंतप्रधानांची दृष्टी आणि डिजिटल इंडिया, कौशल्य भारत, स्टार्ट-अप-इंडिया, स्मार्ट शहर आणि सायबर सुरक्षा उपक्रमांसारख्या उपक्रमांशी कशाप्रकारे हा कार्यक्रम एकसंगत आहे हे सांगितले.
सिस्को च्या या उपक्रमाचे पंतप्रधानांनी कौतुक केले आणि त्याच्या फायद्याची प्रशंसा केली. अनुदानामध्ये होणारी गळती थांबवण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान उपयुक्त असल्याचे मोदी म्हणाले. सायबर सुरक्षा क्षेत्रातल्या सहकार्याच्या शक्यतांबाबत देखील यावेळी मोदींनी चर्चा केली.
S. Mhatre / S.Tupe / M. Desai
John Chambers of CISCO & I spoke about some of CISCO's initiatives & aspects relating to technology & Digital India. https://t.co/EdBqwqVcuY
— Narendra Modi (@narendramodi) 18 March 2016