Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सिंगापूर इथे फिन टेक महोत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

सिंगापूर इथे फिन टेक महोत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

सिंगापूर इथे फिन टेक महोत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

सिंगापूर इथे फिन टेक महोत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण


 

वित्त जगतातले प्रभावशाली व्यक्तित्व,सिंगापुरचे उप पंतप्रधान थर्मन षण्मुगरत्नम,फिन टेक मधली आघाडीची संस्था,सिंगापूर वित्तीय प्राधिकरणाचे  व्यवस्थापकीय संचालकरवी मेननशंभराहून जास्त देशातले दहा हजाराहून जास्त प्रतिनिधी,

नमस्कार

सिंगापूर फिन टेक महोत्सवात पहिला शासन प्रमुख  म्हणून  भाषण  देण्याची संधी लाभली हा माझा सन्मान  आहे.

भविष्याकडे पाहणाऱ्या भारतातल्या युवा वर्गाचा हा सन्मान आहे.

भारतातल्या वित्तीय क्रांतीची  आणि 1.3 अब्ज जनतेच्या जीवनातल्या परिवर्तनाची घेतलेली ही दखल आहे.

वित्तीय आणि तंत्रज्ञान विषयक हा कार्यक्रम आहे आणि हा एक महोत्सवही आहे.

भारतीय दीपोत्सवाचा,दीपावलीचा हा काळ आहे. सद्‌गुण,आशा,ज्ञान आणि भरभराट यांचा विजय म्हणून संपूर्ण जगभरात हा उत्सव साजरा केला जातो.सिंगापूर मधे अद्यापही दिवाळीचे दीप तेवत आहेत.

फिन टेक महोत्सव हा विश्वासाचा उत्सव आहे.

नाविन्य आणि कल्पना शक्तीच्या भरारीवरचा  हा विश्वास आहे.

युवा आणि परिवर्तन घडवून आणण्याच्या त्यांच्या चैतन्यावरचा हा विश्वास आहे.

हे विश्व अधिक उत्तम स्थान  करण्यासाठीचा हा विश्वास आहे.

केवळ तिसऱ्या वर्षातच  हा महोत्सव जगातला सर्वात मोठा उत्सव ठरला आहे यात आश्चर्य नाही.

सिंगापूर,जागतिक वित्त केंद्र आहे आणि आता वित्तविषयक  डिजिटल भविष्याच्या दिशेने जोमाने वाटचाल करत आहे.

या वर्षीच्या जूनमध्ये मी इथेच भारताचे रूपे कार्ड आणि भारताचे जागतिक स्तरावरचे यूनिफाइड पेमेंट इंटरफेस  अर्थात युपीआय द्वारे पैसे पाठवता येणाऱ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मोबाईल अॅपचे उद्घाटन केले होते.

फिन टेक  कंपन्या आणि वित्तीय संस्थांना जोडणाऱ्या जागतिक मंचाचे उद्घाटन करण्याचा सन्मान मला आज प्राप्त होणार आहे.याचा प्रारंभ आसियान आणि भारतीय बँका आणि फिन टेक कंपन्यांनी होईल.

भारत आणि आसियान देशांच्या लघु आणि मध्यम उद्योगांना जोडण्याचे काम भारत आणि सिंगापूर करत आहेत, आता हे कार्य भारतीय मंचावर होईल आणि त्याचा जागतिक विस्तार केला जाईल.

मित्रहो,

स्टार्ट अप  सर्कलमध्ये दिलेला सल्ला मी ऐकला.

व्हेंचर कॅपिटल किंवा व्हेंचर कॅपिटलचे वित्तीय पाठबळ 10 टक्क्यांनी वाढवायचे असेल तर गुंतवणूकदारांना सांगायला लागेल की आपण एक मंच चालवत आहोत,नियमित व्यवसाय नव्हे.

व्हेंचर कॅपिटलचे वित्तीय पाठबळ 20 टक्क्यांनी वाढवायचे असेल तर गुंतवणूकदारांना सांगायला लागेल की आपण फिन टेक स्थानात काम करत आहोत.

मात्र गुंतवणूकदारांनी आपला खिसा रिकामा करत भरघोस गुंतवणूक करावी असे आपल्याला वाटत असेल तर आपण ब्लॉकचेन चा वापर करत आहोत असे त्यांना सांगा.

या बाबी आपल्याला वित्तीय जगतात बदल घडवण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञाना प्रती प्रोत्साहित करतात.

खरे तर नवे तंत्रज्ञान आणि कनेक्टीविटीचा वापर करत त्याला आपलेसे करण्यात वित्तीय क्षेत्र नेहमी अग्रेसर असते असे इतिहास सांगतो.  

मित्रहो,

तंत्रज्ञानाने आणलेल्या ऐतिहासिक परिवर्तन युगात आपण आहोत.

डेस्क टॉप  ते क्लाऊड पर्यंत,  इंटरनेट ते सोशल मीडियामाहिती तंत्रज्ञान सेवा ते इंटरनेट ऑफ थिंग्ज पर्यंतचा प्रवास आपण अल्पावधीत पूर्ण केला आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेच्या वैशिष्ट्यात  बदल घडत आहे.

नव्या युगात स्पर्धात्मकता आणि शक्ती  यावर तंत्रज्ञानाचा प्रभाव  आहे.

जीवनात परिवर्तन घडवून आणण्याच्या अपार संधी प्रदान करत आहे.

2014 मध्ये, संयुक्त राष्ट्रात मी सांगितले होते की,फेसबुक आणि ट्विटरमोबाईल फोन यांच्या गतीने विकास आणि सबलीकरणाचा विस्तार होईल हे आपण जाणले पाहिजे.  संपूर्ण जगातकल्पनेतले दृश्य झपाट्याने वास्तवात येत आहे.

याने,भारतात प्रशासन आणि सार्वजनिक सेवा प्रदान करण्यात परिवर्तन घडवले आहे.नाविन्यता,आशा आणि संधी मोठ्या प्रमाणात आहेत. दुर्बल  यामुळे सबल बनत आहेत आणि वंचिताना  समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे.यामुळे आर्थिक संधी प्रवेश पहिल्यापेक्षा अधिक लोकतांत्रिक बनल्या आहेत.

माझ्या सरकारने 2014, मधे दुर्गम भागातल्या गावातल्या गरीबापर्यंत पोहोचणाऱ्यासर्व समावेशक विकासाचे अभियान हाती घेऊन कार्यभार स्वीकारला.

या अभियानाला वित्तीय समावेशकतेच्या भक्कम पायाची गरज होती आणि भारतासारख्या विशाल देशासाठी हे सोपे काम नाही. 

तरीही आम्ही  हे  वर्षांमध्ये नव्हे तर महिन्यांमध्ये साध्य करू इच्छित होतो. 

फिन टेकची शक्ती आणि डिजिटल कनेक्टीव्हिटीच्या सहाय्याने आम्ही गती आणि प्रमाण यांच्या अभूतपूर्व अशा क्रांतीला प्रारंभ केला आहे.

1.3 अब्ज भारतीयांसाठीवित्तीय समावेशन एक वास्तव ठरले आहे.1.2 अब्ज जनतेची बायो मेट्रिक ओळखआधार आम्ही केवळ काही वर्षात निर्माण केली. 

प्रत्येक भारतीयाला बँक खाते पुरवणे हे जन धन योजनेचे उद्दिष्ट आहे. तीन वर्षात आम्ही 330 दशलक्ष नवी बँक खाती उघडली आहेत.ओळख,सन्मान आणि संधीचे हे 330 दशलक्ष स्त्रोत आहेत.2014 मधे 50 टक्क्यापेक्षा कमी भारतीयांची बँक खाती होती.आता ही सार्वत्रिक झाली आहेत.आज अब्जापेक्षा अधिक बायो मेट्रिक ओळखअब्जापेक्षा अधिक बँक खाती,अब्जापेक्षा जास्त मोबाईल फोन यासह भारत,जगातलासर्वात मोठी सार्वजनिक आधारभूत  संरचना असलेला देश ठरला आहे.

3.6 लाख करोड पेक्षा जास्त किंवा 50 अब्ज डॉलरचे सरकारी लाभलोकांपर्यंत थेट पोहोचत आहेत. आता दूर-दूरच्या गावातल्या गरीब नागरिकांना दूरवर जावे लागत नाही किंवा आपला अधिकार मिळवण्यासाठी मध्यस्थाला काही द्यावे लागत नाही. 

बनावट आणि नकली खात्याद्वारे आता सरकारी पैशाचा अपव्यय होत नाही. अशी चोरी रोखून आम्ही 80,000 कोटी किंवा 12 अब्ज डॉलर पेक्षा जास्त रुपयांची बचत केली आहे. अनिश्चिततेच्या काठावर असणारे  लाखो लोक  आपल्या खात्यात आता विमा प्राप्त करतात आणि त्यांना वृद्धापकाळात पेन्शन सुरक्षा प्राप्त होऊ शकते.आधार वर आधारित 4,00,000 मायक्रो एटीएमच्या माध्यमातून दुर्गम भागातल्या गावातही बँकिंग प्रणाली दरवाज्या पर्यंत पोहोचली आहे.  डिजिटल पायाभूत सुविधेमुळे जगातली सर्वात मोठी आरोग्य योजनाआयुष्मानची सुरवात करण्यासाठी मदत झाली आहे.ही योजना 500 दशलक्ष भारतीयांना किफायतशीर आरोग्य विमा प्रदान करणार आहे.

डिजिटल पायाभूत सुविधेमुळेमुद्रा योजनेच्या माध्यमातून छोट्या उद्योगपतींना 145 दशलक्ष रुपयांचे कर्ज प्रदान करण्यासाठी मदत झाली आहे.चार वर्षात6.5 लाख कोटी रुपये अथवा 90 अब्ज डॉलरची कर्जे देण्यात आली आहेत.सुमारे 75 टक्के कर्ज महिलांना प्रदान करण्यात आले आहे.

काही आठवड्यांपूर्वीच आम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे उद्घाटन केले.150 हजार पेक्षा जास्त टपाल कार्यालये आणि 300,000 टपाल सेवा कर्मचारीतंत्रज्ञानाचा उपयोग करत घरा- घरात बँकिंग सुविधा देत आहेत.

वित्तीय समावेशकतेसाठीडिजिटल कनेक्टीविटी निश्चितच आवश्यक आहे.

भारतात 120,000 ग्राम परिषदाना सुमारे 300,000 किलोमीटरच्या फायबर ऑप्टिक केबल द्वारे जोडण्यात आले आहे.

300,000 पेक्षा अधिक सामायिक सेवा केंद्रांनी गावापर्यंत डिजिटल कक्षा पोहोचवली आहे. हे केंद्रशेतकऱ्यांना जमीन विषयक तपशील,कर्जविमा तसेच बाजारपेठ आणि उत्तम किमतीसाठी प्रवेश द्वार ठरत आहे.हे केंद्र आरोग्य सेवा आणि महिलांसाठी आरोग्य विषयक स्वच्छता उत्पादने सादर करत आहेत.फिन टेक  द्वारा भारतात पैशाच्या  देवाण घेवाण व्यवहारात  डिजीटलाझेयशनचे परिवर्तन आणल्याशिवाय कोणतेही कार्य प्रभावी ठरले  नसते.

भारत,वैविध्यपूर्ण  परिस्थिती आणि आव्हानांनी युक्त असा देश आहे.त्यासाठी आमचे  तोडगेही वैविध्यपूर्ण हवेत.आपले डिजिटली करण सफल आहे कारण उत्पादनाची सर्व आवश्यकता आपले पेमेंट पूर्ण करते.

मोबाईल आणि इंटरनेट वापरणाऱ्यासाठी,भीम-युपीआयहा व्हर्च्युअल पेमेंट अड्रेसचा उपयोग करत अनेक खात्यातुन पेमेंट  करण्यासाठी जगातला सर्वाधिक सूक्ष्मसुलभ आणि अडथळारहित मंच आहे. 

ज्यांच्याजवळ मोबाईल आहे आणि इंटरनेट नाही त्यांच्यासाठी 12 भाषांतली युएसएसडी प्रणाली आहे आणि ज्यांच्याकडे  मोबाईल नाही आणि इंटरनेटही  नाही त्यांच्यासाठी बायोमेट्रिकचा उपयोग करणारी  आधार सक्षम प्रणाली आहे.या प्रणाली द्वारे एक अब्ज रुपयांची देवाण घेवाण झाली आहे आणि  दोन वर्षात या प्रणालीचा सहापट विकास झाला आहे.

रुपेमुळे पेमेंट कार्ड  सर्वांच्या आवाक्यात येत आहे. चार वर्षापूर्वी ज्या लोकांचे बँक खातेही नव्हते अशा 250 दशलक्षपेक्षा अधिक लोकांपर्यंत रुपे पोहोचले आहे.

कार्डपासून  ते क्यूआर आणि वॉलेट पर्यंत भारतात डिजिटल देवाण घेवाणीचा झपाट्याने  विकास झाला आहे.आज भारतात 128 बँका युपीआयशी जोडल्या गेल्या आहेत.

गेल्या 24 महिन्यात युपीआय द्वारे व्यवहार 1500 पटींनी वाढला आहे.दर महिन्याला देवाण-घेवाणीच्या मूल्यात 30 टक्क्यापेक्षा जात वृद्धी होत आहे.

मात्र गतीपेक्षा,डिजिटल पेमेंट द्वारे प्रदान करण्यात आलेल्या संधी,सक्षमता,पारदर्शकता आणि सुलभता यामुळे मी जास्त प्रेरित झालो आहे.  

एक दुकानदार आपली इन्व्हेटरी ऑनलाईन कमी करू शकतो आणि जलदगतीने वसुली करू शकतो.

फळ उत्पादकशेतकरी आणि ग्रामीण कारागीरासाठी बाजार प्रत्यक्ष आणि जवळ आला आहे.उत्पन्न वाढले आहे आणि पेमेंट मधे गती आली आहे.

एक कामगार आपली कमाई प्राप्त करून आणि एकही दिवसाची रजा न घेता ही रक्कम तो ताबडतोब आपल्या घरी पाठवु शकतो. 

प्रत्येक डिजिटल पेमेंट मुळे वेळेची बचत होते .यामुळे मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय बचत होते.व्यक्ती आणि देशाची उत्पादकता यामुळे वाढत आहे.

यामुळे कर वसुलीत सुधारणा आणि अर्थव्यवस्था निर्मळ  करण्यात मदत होत आहे.

यापेक्षा अधिक म्हणजे डिजिटल पेमेंट हे  शक्यता आणि संधीसाठी  जगाचे प्रवेशद्वार ठरत आहे.

डाटा अॅनालीस्टीक  आणि कृत्रिम बुद्धीमत्तालोकांना मूल्य वर्धित सेवा देण्यात मदत करत आहेत.यामध्ये ज्यांनी कमी कर्ज घेतले आहे,ज्यांना  कर्ज घेण्याची पार्श्व भूमी नाही अशा लोकांच्या  कर्जाचा यात समावेश आहे.

 सूक्ष्मलघु आणि मध्यम  उद्योगापर्यंत वित्तीय समावेशकतेचा विस्तार झाला आहे.

एक वर्षापूर्वी सुरु करण्यात आलेल्या राष्ट्रव्यापी वस्तू आणि सेवा कर डिजिटल नेटवर्क वर हे सर्व येत आहेत.

त्यांना कर्ज देण्यासाठी बँका त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत. कर्ज देण्याचे पर्यायी मंच,कल्पक वित्तीय मॉडेल देऊ करत आहेत. उच्च व्याज दराने कर्ज  देणाऱ्या औपचारिक बाजाराकडे पाहण्याची त्यांना आता गरज भासत नाही.

सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगासाठी,बँकेत न जाता 59 मिनिटात एक कोटी किंवा 150,000 डॉलर पर्यंत कर्ज देण्याचा संकल्प आम्ही याच महिन्यात व्यक्त केला आहे. हे नियमावलीवर प्रेरित आहे,जे कर्ज विषयक निर्णयासाठी वस्तू आणि सेवा कर विवरणपत्र,आय कर विवरणपत्र आणि बँक विवरणपत्र  यांचा उपयोग करतात.

उद्योग,रोजगार आणि समृद्धीला प्रेरित करण्याची ही फिन टेकची शक्ती आहे.

डिजिटल  तंत्रज्ञान पारदर्शकता आणत आहे आणि सरकारी ई बाजारपेठ म्हणजे जीईएम यासारख्या नाविन्यपूर्ण माध्यमाद्वारे  भ्रष्टाचार नष्ट करत आहे.  सरकारी एजन्सी द्वारे खरेदी करण्यासाठी हा एकीकृत मंच आहे.

हा मंच,शोध आणि तुलना,निविदा,ऑनलाईन ऑर्डर,करार आणि पैसे चुकते करण्याची सुविधा प्रदान करतो.

या मंचावर आधीपासूनच 600,000 उत्पादने आहेत.या मंचावर सुमारे 30,000 ग्राहक संघटना आणि 150,000 पेक्षा जास्त विक्रेता आणि सेवा पुरवठादार नोंदणीकृत आहेत. 

मित्रहो,

भारतात,फिन टेक कल्पकता आणि उद्योगाचा व्यापक विस्तार झाला आहे. यामुळे भारत हा जगातला सर्वात अग्रगण्य फिन टेक आणि स्टार्ट अप देश बनला आहे.भारतात फिन टेक आणि  उद्योग 4.0 चे भविष्य उज्वल आहे.

आमचे युवा असे अॅप्स विकसित करत आहेत ज्यामुळे कागद रहित,रोकड रहितस्वतः उपस्थित राहिल्या खेरीज सुरक्षित देवाण घेवाण शक्य होईल. ही इंडिया स्टेक या  जगातल्या सर्वात मोठ्या  अॅप्लीकेशन प्रोग्रामिंग इंटर फेस सेटची कमाल आहे.

 बँकानियामक आणि ग्राहकांच्या समस्यावर तोडगा काढण्यासाठीयुवा,कृत्रिम बुद्धिमत्ता,ब्लॉकचेन आणि मशिन  लर्निगचा उपयोग करत आहेत.

युवा आमचे  सामाजिक उपक्रम – आरोग्य आणि शिक्षणापासून ते सूक्ष्म कर्ज आणि विमा यांचा वापर करत आहेत.

स्टार्ट अप इंडिया आणि प्रोत्साहनपर धोरणे आणि निधी पुरवणाऱ्या कार्यक्रमांचा,भारतातली  विपुल  प्रतिभालाभ घेत आहे. 

जगातला डाटाचा सर्वात जास्त  वापर भारतात होतो आणि डाटा दरही सर्वात स्वस्त आहेत. फिनटेक वापरणाऱ्या सर्वोच्च  देशांपैकी  भारत एक आहे.म्हणूनच सर्व फिन टेक कंपन्या आणि स्टार्ट अप साठी भारत हे सर्वश्रेष्ठ स्थान आहे असे माझे त्यांना सांगणे आहे.

एलईडी बल्ब उद्योगानेभारतात प्राप्त केलेल्या आर्थिक व्याप्तीमुळे,हे  उर्जा  सक्षम तंत्रज्ञान जागतिक पातळीवर अधिक किफायतशीर ठरत आहे. त्याचप्रमाणे,भारताची विशाल बाजारपेठ, फिन टेक उत्पादनांना,व्याप्ती वाढवूनकिंमत आणि जोखीम कमी करून जागतिक पातळीवर आणण्यासाठी सक्षम करेल.     

मित्रहो,

थोडक्यात, फिन टेकचे, प्रवेश, समावेशकता, कनेक्टीविटी, जीवनाची सुलभता,संधी आणि उत्तरदायित्व, हे  6 लाभ भारत दर्शवतो.

संपूर्ण जगात,इंडो-पॅसिफिक पासून ते आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेपर्यंतजीवनात परिवर्तन घडवणाऱ्या असाधारण कल्पकतेच्या प्रेरक गाथा आपल्याला पाहायला मिळतात.

मात्र अजूनही बरेच काही करणे बाकी आहे.

वंचितांच्या विकासातून सर्वांचा विकास यावर आपले लक्ष केंद्रीत असले पाहिजे.बँकिंग सुविधांपासून वंचितजगातल्या 1.7 अब्ज लोकांना औपचारिक वित्तीय बाजार पेठेत आपल्याला आणायचे आहे.

जगातल्या अनौपचारिक क्षेत्रात काम करणाऱ्या एक अब्जापेक्षा जास्त कामगारांना विमा आणि निवृत्ती वेतन सुरक्षा प्रदान करायची आहे.

कोणाचेही स्वप्न  अपुरे राहू नये आणि कोणताही उद्योजक वित्तीय पाठबळ मिळवण्यापासून वंचित राहू नये  याची खातर जमा करण्यासाठी आपण फिन टेक चा उपयोग करू शकतो.

जोखीम  हाताळणी व्यवस्थापन,घोटाळे आणि पारंपारिक मॉडेल मधले अडथळे हाताळण्यातबँका आणि वित्तीय संस्थाना अधिक लवचिक बनवायला हवे.

नियमन आणि देखरेख सुधारूनकल्पकतेला प्रोत्साहन आणि जोखीम नियंत्रणात राहील अशा तंत्रज्ञानाचा आपण वापर करायला हवा.     

मनीलॉंड्रिंग आणि इतर वित्तीय गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी फिन टेक उपायांचा अवलंब करावा लागेल.

 परस्परांशी जोडलेल्या या जगातआपल्या डाटा आणि प्रणाली अधिक सुरक्षित होतील तेव्हाचउदयोन्मुख वित्तीय विश्व सफल होईल.

सायबर धोक्यापासून आपल्या जागतिक वायर प्रणाली सुरक्षित राखाव्या लागतील.

फिन टेकची गती आणि विस्तार यामुळे लोकांचे हित साधले जावे,त्यांचे अहित होता कामा नये यावर आपला कटाक्ष राहिला पाहिजे.तंत्रज्ञानवित्तीय क्षेत्रातमानवी स्थितीत सुधारणा निश्चित करते.

समावेशक धोरणे आणि तंत्रज्ञानाच्या वापराबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करून त्यांना शिक्षण देण्याची गरज आहे.

यासाठी फिन टेक केवळ एक व्यवस्थाच नव्हे तर एक चळवळ ठरण्याची आवश्यकता आहे.        

   डाटा स्वामित्व आणि ओघ,गोपनीयतासार्वजनिक हित,कायदा आणि मुल्ये यासारख्या मुद्यांचीही दखल घ्यावी लागेल.

 भविष्यासाठी आपल्याला,कौशल्य निर्मितीत गुंतवणूक करावी लागेलदीर्घकालीन गुंतवणूक आणि कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी तत्पर राहावे लागेल.

मित्रहो,

प्रत्येक युगाला  स्वतःच्या संधी आणि आव्हाने असतात. भविष्य घडवण्याची  जबाबदारी प्रत्येक पिढीची असते.

ही पिढीही,जगातल्या प्रत्येकाचे भविष्य घडवेल.

इतिहासात आतापर्यंत कोणत्याही काळात आपल्याला इतक्या संधी प्राप्त झाल्या नाहीतया संधी आणि समृद्धीलाखो लोकांच्या जीवनात वास्तव ठरतील.

या संधीगरीब आणि श्रीमंत,शहरे आणि गावेआशा आणि साध्य कामगिरी यांच्यात जगाला अधिक समान आणि मानवी करतील. 

भारत जगाकडून शिकेल त्याचप्रमाणे आपले अनुभव आणि नैपुण्यही जगाला देईल.

  कारण भारतासाठी जे प्रेरक आहे ते जगासाठी आशादायी आहे.भारतासाठी आपण जे स्वप्न पाहतो तेच स्वप्न जगासाठीही पाहतो.  

आपणा सर्वांसाठी हा सामायिक प्रवास आहे.

अंधारावर मात करून आशा आणि आनंदाच्या  प्रकाशाने उजळवणाऱ्या प्रकाशोत्सवाप्रमाणे हा समारंभ मानवतेच्या उज्वल भविष्यासाठी आपल्याला एकत्र येण्याचे आवाहन करत आहे.

धन्यवाद. 

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar