Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सिंगापूरच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी माध्यमांना दिलेले निवेदन

सिंगापूरच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी माध्यमांना दिलेले निवेदन

सिंगापूरच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी माध्यमांना दिलेले निवेदन


महामहीम पंतप्रधान ली सिन लुंग ,

माध्यम प्रतिनिधी ,

मला सांगण्यात आले आहे की, सिंगापूर चालकरहित गाड्या बनवण्यात जगात अग्रेसर आहे. मात्र मला विश्वास आहे, आपणां सर्वाना विश्वास आहे की भारताच्या प्रभावशाली शुभचिंतकांपैकी एक पंतप्रधान ली सिन लुंग, हे सिंगापूरसाठी आणि आपल्या द्विपक्षीय संबंधांसाठी चालकाच्या स्थानी आहेत.

महामहिम ली, तुम्ही भारताचे मित्र आहात. आपले संबंध मजबूत करण्यासाठी तुमची कटिबद्धता आणि योगदान याची आम्ही प्रशंसा करतो. आज इथे तुमचे स्वागत करणे ही माझ्यासाठी अतिशय सन्मानाची गोष्ट आहे.

मित्रानो,

पंतप्रधान म्हणून माझा सिंगापूर दौरा ली कुआन यू यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या पवित्र निमित्ताने झाला होता. यू हे केवळ सिंगापूरसाठीच नाहीत तर संपूर्ण आशियासाठी मार्गदर्शक होते. यावर्षी सिंगापूरचे आणखी एक महान सुपुत्र माजी राष्ट्रपती एस. आर. नाथन यांच्या निधनामुळे आपल्याला दुःख झाले. ते भारताचे जिवलग मित्र होते आणि त्यांना प्रवासी भारतीय सन्मान देण्याचा बहुमान आम्हाला मिळाला होता. आम्हाला त्यांची उणीव भासेल.

मित्रांनो ,

सिंगापूरचे राष्ट्रगीत आहे,” माजुलाह सिंगापुरा”. पुढे चला, सिंगापूर ” म्हणूनच आश्चर्य वाटण्याची बाब नाही की एक असा देश आहे, जो वर्तमानात कृती करतांना दिसतो, भविष्यातील गरजांची त्याला जाण आहे, तो देश म्हणजे सिंगापूर आहे. निर्मिती, पर्यावरण, नाविन्यता,तंत्रज्ञान असो किंवा सार्वजनिक सेवा पुरवणे असो, उर्वरित जग जी गोष्ट उद्या करेल, ती गोष्ट सिंगापूर आज करतो.

मित्रांनो ,

बारा महिन्यांपेक्षा कमी काळापूर्वी , माझ्या सिंगापूर दौऱ्यादरम्यान , आपण आपले द्विपक्षीय संबंध “नवीकृत विचारधारा, नवीन ऊर्जा” सह धोरणात्मक भागीदारीच्या उंचीवर नेले. आपल्या दोन्ही बाजूकडील जनतेला लाभ पोहोचवण्यासाठी सिंगापूरची ताकद आणि गतिमानतेच्या भारताच्या चैतन्याबरोबर मिलाफ करणे हा आमच्या भागीदारीचा उद्देश आहे. गेल्यावर्षी माझ्या दौऱ्यादरम्यान , आमचे महत्वाकांक्षी सहकार कार्यक्रम प्रत्यक्षात साकार करण्यासाठी आम्ही एक दिशादर्शक आराखडा तयार केला होता . सहमती झालेल्या निर्णयांची वेगाने अंमलबजावणी हा देखील आमच्या संबंधांचा एक महत्वपूर्ण घटक आहे. आज महामहिम ली आणि मी आमच्या धोरणात्मक भागीदारीची संरचना आणि घटकांचा विस्तृत आढावा घेतला. माझ्या सिंगापूर दौऱ्यादरम्यान , पंतप्रधान ली मला तांत्रिक शिक्षण संस्था दाखवायला घेऊन गेले होते . आज आम्ही कौशल्य विकासावर आधारित दोन सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. एक आपल्या ईशान्येकडील राज्यांसाठी गुवाहाटी येथे कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यासाठी , आणि दुसरा राष्ट्रीय कौशल्य विकास परिषदेबरोबर.

राजस्थान सरकारच्या सहकार्याने उदयपूर येथे पर्यटन प्रशिक्षणासाठी सर्वोत्कृष्ट केंद्राच्या उदघाटनाचेही स्वागत केले. नगर विकास आणि कचरा व्यवस्थापन क्षेत्रांमध्ये देखील राजस्थान सिंगापूरबरोबर भागीदारी करत आहे. अमरावती हि आंध्र प्रदेशची नवीन राजधानी विकसित करण्यात सिंगापूर आमचा भागीदार आहेच.

मित्रांनो ,

व्यापार आणि गुंतवणूक संबंध हे आमच्या द्विपक्षीय संबंधांचा कणा आहे. परस्पर व्यापार भागीदारीसाठी आमचे मजबूत जाळे आहे. यासंदर्भात , पंतप्रधान ली आणि मी आमच्या सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य कराराचा दुसरा आढावा लवकरात लवकर घेण्यासाठी सहमत झालो आहोत.आज बौद्धिक संपदाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या , त्यामुळे परस्पर व्यापार आणि सहकार्य अधिक सुलभ होईल. पंतप्रधान ली आणि मी सिंगापूरमध्ये कॉर्पोरेट “रुपी बॉण्ड” जारी करण्याच्या निर्णयाचे स्वागत करतो. भारताच्या व्यापक पायाभूत विकास गरजा पूर्ण करण्यासाठी भांडवल उभे करण्याच्या आमच्या प्रयत्नांच्या दिशेने हे एक पाऊल आहे.

मित्रांनो ,

आमचे संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य हे आमच्या धोरणात्मक भागीदारीचे प्रमुख स्तंभ आहेत. दोन सागरी देश म्हणून दूरसंचारचे सागरी मार्ग खुले ठेवणे आणि समुद्र आणि महासागराच्या आंतरराष्ट्रीय कायदे व नियमांचा आदर राखणे याला आमचे प्राधान्य आहे. आसियान संरचना, पूर्वआशिया शिखर परिषद आणि आसियान क्षेत्रीय संरचना मधील आमच्या सहकार्याचा उद्देश प्रांतीय सहकार्यासाठी आस्था आणि विकासाच्या वातावरणात एक खुली आणि सर्वसमावेशक संरचना निर्माण करणे हा आहे. वाढता दहशतवाद, विशेषतः सीमेपलीकडील दहशतवाद आणि कट्टरपंथीयांचा उदय ही आपल्या सुरक्षेसमोरील गंभीर आव्हाने आहेत. आपल्या समाजाच्या संरचनेला त्यांचा धोका आहे. ज्या लोकांचा शांतता आणि मानवतेवर विश्वास आहे त्यांनी या संकटाविरुद्ध एकत्रितपणे उभे ठाकण्याची आणि कृती करण्याची गरज आहे. आज, सायबर सुरक्षेसह या संकटांचा सामना करण्यासाठी आपले सहकार्य वृद्धिंगत करण्यावर आम्ही सहमत झालो आहोत.

महामहीम ली ,

भारत मजबूत आर्थिक विकास आणि परिवर्तनाच्या मार्गावर वाटचाल करत आहे. या प्रवासात आम्ही सिंगापूरला एक महत्वपूर्ण भागीदार मानतो. अलिकडेच , बदलत्या भारताबाबत उपपंतप्रधान षण्मुगरत्नम यांचे विचार आम्हाला ऐकावयास मिळाले. मी देखील तुमच्या वैयक्तिक मैत्रीची मनापासून कदर करतो आणि आपले द्विपक्षीय संबंध नव्या उंचीवर नेण्यासाठी तुमचे नेतृत्व महत्वपूर्ण मानतो. पुन्हा एकदा , मी तुमचे आणि तुमच्या प्रतिनिधिमंडळाचे हार्दिक स्वागत करतो . तुमचा दौरा भारतासाठी लाभदायक आणि यशस्वी ठरेल असा मला विश्वास वाटतो.

धन्यवाद .

खूप खूप धन्यवाद .

B.Gokhale/S.Kane /V.Deokar