सिंगापूरचे उपपंतप्रधान थर्मन षण्मुगरत्नम यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला.
सिंगापूरचे माजी राष्ट्राध्यक्ष एस.आर.नाथन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत पंतप्रधानांनी सिंगापूरच्या जनतेप्रती संवेदना व्यक्त केल्या. त्यांच्या रुपात सिंगापूरने आपला एक महान सुपूत्र गमावला आहे असे पंतप्रधान म्हणाले.
कौशल्यविकास आणि स्मार्ट शहरे या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य उपक्रमांबाबत षण्मुगरत्नम यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. दोन्ही देशांदरम्यानचे संबंध धोरणात्मक भागीदारीपर्यंत पोहोचवणाऱ्या नोव्हेंबर 2015 च्या आपल्या यशस्वी सिंगापूर दौऱ्याचा यावेळी पंतप्रधानांनी उल्लेख केला. नजीकच्या काळात पंतप्रधान ली ह्सीन लूंग यांच्या भारत दौऱ्याबाबत आपण उत्सुक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
Mr. Tharman Shanmugaratnam, Deputy Prime Minister of Singapore calls on PM @narendramodi.
— PMO India (@PMOIndia) August 26, 2016
via NMApp pic.twitter.com/8sZIYlRpWH