पंतप्रधान : अच्छा तर तुम्ही कलाकार पण आहात?
विद्यार्थी : सर, ही तुमचीच कविता आहे.
पंतप्रधान : माझीच कविता गाणार आहात.
विद्यार्थी : मनात आपल्या आपल्या बाळगून एक लक्ष्य, ध्येय आपुले घेऊनी प्रत्यक्ष
आम्ही साखळदंड तोडत आहोत, आम्ही नशीब बदलत आहोत.
हे नवे युग आहे, हा नवा भारत आहे, आम्ही स्वःच लिहू भविष्य आपले
आम्ही परिस्थिती बदलत आहोत, स्वतःच आपले नशीब घडवत आहोत
आम्ही निघालो आहोत संकल्प करून, शरीर आणि मन स्वतःचे अर्पण करून
निर्धार आहे, निर्धार आहे, एक सुर्योदय घडवायचा आहे, आभाळाहून उंच जायचे आहे
एक भारत नवा घडवायचा आहे, आभाळाहून उंच जायचे आहे, एक भारत नवा घडवायचा आहे,
पंतप्रधान : वाह.
पंतप्रधान : नाव काय तुझं?
विद्यार्थी : (स्पष्ट नाही).
पंतप्रधान : वाह, तुम्हाला घर मिळालं आहे का? चला, नव्या घरात प्रगती होत आहे, चला चांगलं घडतंय.
विद्यार्थी : (स्पष्ट नाही).
पंतप्रधान : वाह, खूपच छान.
प्रधानमंत्री : यूपीआय
विद्यार्थी : हो सर, आज तुमच्यामुळे प्रत्येक घरा- घरात यूपीआय आहे.
पंतप्रधान : हे तुम्ही स्वत: बनवता का?
विद्यार्थी : हो.
पंतप्रधान : नाव काय तुझं?
विद्यार्थिनी : आरणा चौहान.
पंतप्रधान : हो
विद्यार्थी : मलाही तुम्हाला एक कविता ऐकवून दाखवायची आहे.
पंतप्रधान : कविता ऐकवून दाखवायची आहे, ऐकवा.
विद्यार्थी : नरेंद्र मोदी एक नाव आहे, जे मित्रत्वाचे नवे उड्डाण आहे
आपण झटत आहात देशाला उंच भरारी देण्यासाठी, आम्हीही आपल्या सोबत आहोत देशाला पुढे नेण्यासाठी
पंतप्रधान : शाब्बास.
पंतप्रधान : तुम्हाला प्रशिक्षण पूर्ण झाले आहे का?
मेट्रो लोको पायलट: हो सर.
पंतप्रधान : जबाबदारी सांभाळत आहात?
मेट्रो लोको पायलट: हो सर.
पंतप्रधान : तुम्हाला हे काम करून समाधान वाटतं का?
मेट्रो लोको पायलट: हो सर. सर, आम्ही भारताच्या पहिल्या (अस्पष्ट)… आहोत.सर, याचा खूप अभिमान वाटतो…, खूपच बरं वाटतंय सर.
पंतप्रधान : तुम्हाला खूपच लक्ष केंद्रित करावं लागत असेल, गप्पा मारता येत नसतील ?
मेट्रो लोको पायलट : नाही सर, आमच्याकडे असं काही करायला वेळच नसतो… (अस्पष्ट) असे काहीच घडत नाही.
पंतप्रधान : काहीच घडत नाही.
मेट्रो लोको पायलट: हो सर.
पंतप्रधान : चला तर, तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा.
मेट्रो लोको पायलट: धन्यवाद सर.
मेट्रो लोको पायलट : तुम्हाला भेटून आम्हा सगळ्यांना खूप छान वाटलं सर.
***
S.Kane/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com
नमो भारत ट्रेन के साहिबाबाद-अशोक नगर के नए कॉरिडोर में सफर के दौरान मेरे युवा साथियों की अद्भुत प्रतिभा ने नई ऊर्जा से भर दिया। pic.twitter.com/ov7eUOFKpp
— Narendra Modi (@narendramodi) January 5, 2025