सार्वजनिक प्रशासन आणि प्रशासन सुधारणा क्षेत्रात सहकार्यासाठी नोव्हेंबर 2015 मध्ये भारत आणि ब्रिटन यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज कार्योत्तर मंजुरी दिली.
या करारामुळे ब्रिटनमधील ग्राहकाभिमुख सार्वजनिक सेवा प्रणाली समजून घेण्यास आणि त्यातील सर्वोत्तम पध्दतीं भारतातील सार्वजनिक सेवा प्रणालीत स्वीकारायला मदत होईल.
सरकारी प्रक्रियेची पुनर्रचना, कर्मचारी क्षमता विकास आणि निर्मिती, सार्वजनिक तक्रार निवारण यंत्रणा, स्थानिक प्रशासन सुधारणा, सामाजिक सुरक्षा बळकट करण्यासाठी सुधारणा यांसारख्या प्रमुख क्षेत्रात सहकार्य होईल.
सार्वजनिक प्रशासन आणि शासनावरील संयुक्त कृती गटावर या कराराच्या अंमलबजावणीची जबाबदारी असेल. या कराराअंतर्गत संयुक्त कृती गटाची पहिली बैठक या महिनाअखेरीस लंडन येथे होईल.
S.Kane/S.Tupe/M.Desai