पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सायबर गुन्ह्यांचा निपटारा करण्यासाठी मागील महिन्यात भारत व संयुक्त अरब अमिरात यांच्या दरम्यान करण्यात आलेल्या सामंजस्य कराराला मंजुरी देण्यात आली आहे.
या करारामुळे दोन्ही देशांना सायबर गुन्हे निकाली लावण्यास मदत मिळणार आहे. दोन्ही देश सर्व प्रकारे, विशेषत: समन्वय, माहितीची देवाण-घेवाण, सायबर गुन्ह्यांचा तपास यामध्ये सहकार्य करून या समस्येचा मुकाबला करतील.
हा करार लागू करण्यासाठी भारतातर्फे गृह मंत्रालय नोडल एजन्सी म्हणून जबाबदार राहील.
S. Phophle / S.Tupe / M. Desai