Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

साधारण श्रेणीतील कामगारांच्या भरतीसाठी श्रम सहकार्यासंदर्भात भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील श्रम सहकार्यावरील कराराला कार्योत्तर मंजुरी दिली. पंतप्रधानांच्या सौदी अरेबिया दौऱ्या दरम्यान 2-3 एप्रिल 2016 रोजी रियाध येथे करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

या कराराचा फायदा भारतीय स्थलांतरित कामगारांना विशेषत: अकुशल, निम-कुशल आणि कुशल श्रेणीतील कामगारांना होणार आहे जे सौदी अरेबियामध्ये जात, वंश, धर्म किंवा लिंग याचा विचार न करता काम करतात.

S.Kane/B.Gokhale