Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सहाय्यक सचिव (आयएएस 2013 तुकडी) यांच्याबरोबर संवाद साधताना पंतप्रधानांनी व्यक्त केलेले विचार

सहाय्यक सचिव (आयएएस 2013 तुकडी) यांच्याबरोबर संवाद साधताना पंतप्रधानांनी व्यक्त केलेले विचार

सहाय्यक सचिव (आयएएस 2013 तुकडी) यांच्याबरोबर संवाद साधताना पंतप्रधानांनी व्यक्त केलेले विचार

सहाय्यक सचिव (आयएएस 2013 तुकडी) यांच्याबरोबर संवाद साधताना पंतप्रधानांनी व्यक्त केलेले विचार

सहाय्यक सचिव (आयएएस 2013 तुकडी) यांच्याबरोबर संवाद साधताना पंतप्रधानांनी व्यक्त केलेले विचार

सहाय्यक सचिव (आयएएस 2013 तुकडी) यांच्याबरोबर संवाद साधताना पंतप्रधानांनी व्यक्त केलेले विचार


उपस्थित मान्यवर

सचेतन व्यवस्थेने काळानुरुप बदल स्वीकारला नाही तर त्यातला जिवंतपणा हरवून जातो. ज्या व्यवस्थेत हा जिवंतपणा नष्ट झाला आहे अशी व्यवस्था स्वत:वरच लादलेल्या एखाद्या ओझ्याप्रमाणे वाटते. म्हणूनच व्यक्तीच्या विकासाप्रमाणेच व्यवस्थेच्या विकासाची गरज असते, त्यात कालानुरुप बदलाची आवश्यकता असते. कालबाहय गोष्टींचा त्याग करायला धाडस लागते. निरीक्षणाअंती काही नव्या गोष्टींचा स्वीकार करायला आपण तयारही होतो.

आज येथे दोन प्रकारचे लोक आहेत. दुसरे आहेत ते जाण्याच्या तयारीत आहेत. ते वाट बघत असतील 16 मध्ये जायचे आहे तर काय करुया, 17 मध्ये जायचे असेल तर काय करुया आणि तुम्ही विचार करत असाल की इथुन निघाल्यानंतर जिथे पोस्टींग होईल तिथे प्रथम काय करुया नंतर काय करुया थोडक्यात या दोन प्रकारच्या समूहातला हा वेळ आहे.

मसूरीतून बाहेर पडताना सर्व काही आपल्या मुठीत असल्याची भावना तुमच्या मनात असेल नंतर समजले असेल की नाही-नाही येथे थोडे दिवस. इथुन काय होईल हे काळच सांगेल. लहानपणी एक गोष्ट ऐकली होती काही लोक दगड तासायचे काम करत होते, कोणी तरी वेगवेगळया लोकांना विचारले, काय करताय ? तर एकाने सांगितले, काय करणार भाऊ, गरीब घरात जन्मलो, दगड तासतो आणि उदरनिर्वाह करतो. दुसऱ्याने सांगितले की आधी दुसऱ्या ठिकाणी काम करत होतो पण तिथे चांगले पैसे मिळत नव्हते, आता येथे आलो आहे, दगड तासून भविष्य घडवता येते का याचा प्रयत्न करतो आहे.

तिसऱ्‍याने सांगितले काम मिळाले असेच शिकतो असेच करतो. आणखी एकाकडे गेलो, तो मोठया उमेदीने काम करत होता. आधीचे तीन जण ते काम करत होते तेच काम हा पण करत होता. त्याने सांगितले, आमचे भाग्य आहे की एक भव्य मंदिर घडवत आहेत त्यासाठी हे दगड तासून मंदिराच्या गाभाऱ्याचा भाग मी तयार करत आहे.

त्याच्या मनात हा भाव होता की एका भव्य मंदिराच्या कामाचा मी एक भाग आहे. मी दगडाचा एक कोना तासत असलो तरी त्याचा परिणाम एका भव्य मंदिरनिर्मितीचा भाग आहे. भव्य मंदिराच्या कल्पनेने त्याचा थकवा नाहीसा होत होता आणि दगड तासणे हे त्याला ओझे वाटत नसे.

कधी कधी आपण शेतावर जातो एक शेतकरी कुठली गोष्ट घेऊन येतो तर त्याचे काम करतो आपल्याला वाटते आपण शेतकऱ्याचे काम केले. कोणत्या गावात गेलो तिथे विजेची समस्या असेल, ती दूर केली तर आपल्याला वाटते मी विजेच्या प्रश्नातून मार्ग काढला. दिल्लीत तीन महिने येथे राहून जेव्हा जाल तुम्हाला वाटेल की मी दिल्लीत तीन महिने वास्तव्य केले आणि हिंदुस्थानचा चेहरा बदलण्याच्या कामातला एक भाग बनुन ज्या धरणीवर मी राहतो तिथे मी योगदान देत आहे. म्हणूनच मसुरीमधून बाहेर पडलेल्या व्यक्तीने केलेले काम, त्यातुन मिळालेला संतोष आणि दिल्लीत बसून भारताच्या भविष्याचे चित्र बघुन आपल्या क्षेत्रात काम करण्याचा प्रयत्न या दोन्हीत मोठा फरक आहे. हा अनुभव तीन महिन्यात आला असेल तर आपली विचार करण्याची पध्दत बदलून जाईल.

आपण अशा भागात गेलात जिथे दोन गावात विजेचे खांबही नाहीत. तुम्हाला वाटेल हिंदुस्थानातल्या विजेचा खांबही नसणाऱ्या 18 हजार गावांपैकी दोन गावे मला पूर्ण करायची आहेत. त्यासाठी मी उशीर नाही करणार पहिल्यांदा काम पूर्ण करेन. म्हणजेच दृष्टीकोनाप्रमाणे आपली कृती होईल. हे काम पूर्ण करेन. म्हणजेच दृष्टीकोनाप्रमाणे आपली कृती होईल. हे तादात्म्य पुस्तकातून नव्हे, व्याख्यानातून नव्हे, शैक्षणिक चर्चेतून नव्हे तर रोज काम करता-करता वेगळया पध्दतीने शिकता येते. हा नवा प्रयोग असल्याने विकसित होत आहे. आपल्याला आधी एक माहिती दिली गेली असेल. मध्येच एक आणखी काम आले तर अरे हे पण करा. कारण व्यवस्था विकसित करताना जशा जशा सूचना येत गेल्या तशा त्या जोडत गेलो.

तीन महिन्यांचा हा प्रयोग कसा असावा, त्याच्यात बदल घडवायला हवा आहे का, तो अधिक चांगला कसा करता येईल की हा प्रयोग नको असे वाटते आहे. काय करायला हवे. अशा प्रकारे काम करण्याचा अनुभव घेणारी ही पहिलीच तुकडी आहे. यासंदर्भात काही सूचना असतील तर त्या खात्याकडे दया. खाते आपल्या नियमित संपर्कात असते, आपल्या अनुभवांची विचारणा करते असे मला त्यांनी सांगितले आहे. तरीपण ही व्यवस्था अधिक परिणामकारक बनवायची असेल तर त्यासाठी काय करायला हवे यावर आपण सूचना दिल्यास उत्तमच. आपण आता नव्या जबाबदारीच्या दिशेने जात आहात. आपल्या मनात दोन प्रकारच्या गोष्टी येऊ शकतात. एक उत्सुकता असते, पहिल्यांदाच जात आहोत. सरकारी व्यवस्थेत पहिल्यांदा कधी राहिलो नाही. जिथे जातोय ती जागा कशी असेल ? काम कसे असेल ? दुसरीकडे वाटेल, आपल्यालाही काही करुन दाखवायचे आहे. जीवनात आपल्या वाटयाला आलेल्या कामात यशस्वी व्हायची इच्छा प्रत्येकाला असते. तुम्हाला माहित नसते की तुम्ही 22, 28, 25, 30 वर्षाचे असाल पण येथे बसलेला माणूस 35 वर्ष येथे आहे. तुमच्या वयापेक्षा जास्त वर्ष तो येथे बसला आहे.

तुम्हाला वाटेल मी मोठा आयएएस अधिकारी बनलो आहे. तर त्याला वाटेल की तुमच्यासारखे 15 अधिकारी माझ्या काळात येऊन गेले. या अहंकाराच्या संघर्षाने सुरुवात होते. तुम्ही स्वप्न घेऊन गेलात तर तो परंपरा घेऊन जगत आहे. तुमची स्वप्न आणि त्याची परंपरा यांच्यात द्वंद सुरु होते. एक क्षण असा येतो की या संघर्षात वेळ जातो किंवा एखादी गोष्ट तुम्ही करुही शकता. तुम्हाला वाटते बघा मी करुन दाखविले येथे उपस्थित सर्वांना हा अनुभव आला असेल, तुम्ही त्यांच्याशी संवाद साधल्यावर तुम्हाला कळेल. हे मानुन घ्या की तुमच्याकडे दहा वर्षांपेक्षा जास्त काळ नाही. जे काही नवे कराल जे काही शिकाल, जो काही प्रयोग कराल 10 वर्षच आपल्या बरोबर आहे, बाकी तुम्ही आहात, फाईल आहेत आणखी काही नाही. दहा वर्षात तुम्ही फाईल नाही तर जीवन जोडता. आणि म्हणूनच 10 वर्षांचा जास्तीत जास्त उपयोग करा त्याचा पाया इतका मजबूत असेल की उरलेल्या 20-25 वर्षांसाठी त्याचे योगदान राहील जर त्याने पृथ्वीवरील चीज वस्तूंचा अनुभव घेतलेला नसेल, कारण, जर कालावधी संपल्यांनतर तो या प्रवाहात आला असेल तर निर्धारित स्थानी तो पोहोचेलच. तो स्वत: देखील भार बनतो. मग वाटते कि, आता काय करावे, 20 वर्ष जुना अधिकारी आहे, त्याला कुठे ठेवणार, चला त्या विभागात टाकूया, आता तो आणि त्याच्या विभागाचे नशीब. मात्र जर आपण मनापासून शिक्षण घेऊन आलेले असाल, तर पहा, प्रत्येक गोष्ट जाणण्याची, समजण्याची, हाताळण्याची तुमची ताकद किती असेल. कारण तुम्ही ते स्वत: केले असेल. कधी कधी हा अनुभव खूप मोठी शक्ती देतो.

मला एका मुख्यमंत्र्यांनी एक प्रसंग ऐकवला होता. ते त्यांच्या कारकीर्दीत अतिशय सामान्य होते. ते देखील पोलिस विभागात लहान-सहान नोकरी करत होते. व्यक्तिमत्वात खूप काही होते, मुख्यमंत्री बनले. त्यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात एका खूप मोठया नेत्याच्या मुलाचे अपहरण झाले. खूप तणाव निर्माण झाला. कारण ज्याच्या मुलाचे अपहरण झाले ते दुसऱ्या पक्षाचे होते आणि हे जे मुख्यमंत्री होते ते तिसऱ्या पक्षाचे आता माध्यमांसाठी ही मौजेची बाब होती. मात्र त्यांनी यंत्रणेला जागे केले. त्यांनी एक सूचना केली. ती खूपच कुतूहलाची बाब आहे. त्यांनी आपल्या गुप्तचर यंत्रणांना सांगितले की, हे पहा, तुम्ही जरा दूध विक्रेत्यांना भेटा. आणि पहा कुठे दुधाची मागणी अचानक वाढली आहे. आधी अर्धा लिटर घ्यायचे, आता 2 लीटर घेतात, कुठे आहे ते पहा. त्यांनी पाहिले की काही ठिकाणी दुधाची मागणी अचानक वाढली. त्यांनी सांगितले की त्यांच्यावर जरा लक्ष ठेवा. आणि आश्चर्याची बाब म्हणजे, हे जे अपहरणकर्ते जिथे राहिले होते, तिथेच अचानक दोन-तीन लिटर दूध खरेदी केले जात होते. या एका गोष्टीसाठी त्यांनी मुख्यमंत्री बनल्यानंतर आपला बालपणीचा आणि तरुणपणातला पोलिस विभागातला अनुभव पणाला लावला आणि सर्व अपहरणकर्ते पकडले गेले. आणि मुलाची सुटका झाली. आणि खूप मोठया संकटातून बाहेर आले. हे का झालं ? तर आपल्या आयुष्यातल्या सुरुवातीच्या काळात केलेल्या कामांच्या अनुभवामुळे शक्य झाले.

तुम्ही तुमच्या आयुष्यात, त्या टप्प्यावर आहात. इतका घाम गाळायला हवा, इतका घाम गाळायला हवा की, सहकाऱ्यांना वाटायला हवे की हा मोठा अधिकारी स्वत: किती मेहनत करतो, मग इतरांना सांगावे लागत नाही. सर्वजण कामाला लागतात तुम्ही जर फलक लावलात की कार्यालयात वेळेवर यायला हवे. त्याची इतकी ताकद नसेल, पण जर तुम्ही वेळेपूर्वी पाच मिनटे आधी पोहोचलात, तर त्याची ताकद अधिक असेल. तुम्ही अधिकाऱ्यांना सांगाल की आठवडयातून एकदा दौरा करायला हवा, रात्री गावात थांबायला हवे, दोन दिवस थांबायला हवे. त्याचा परिणाम तितका होणार नाही, जेवढा तुम्ही स्वत: तिथे जाऊन राहिल्यावर होईल.

आपल्या पूर्वजांनी जी व्यवस्था विकसित केली आहे, ती व्यर्थ नसेल असे आपण धरुन चालू. त्यामागे काही ना काही तत्व नक्की असेल, काहीतरी कारण असेल. मूलभूत गोष्टींचे स्वत:चे सामर्थ्य असते. ते आपण नित्यनेमाने पाळू शकू ? आपण नित्यनेमाने पाळू, मात्र त्याला बुध्दीची जोड देऊन त्यातून परिणाम साधण्याच्या दिशेने आपण प्रयत्न करायला हवा. आणि जर आपण हे केले तर आपल्याला वाटेल की आपण खरेच परिणाम घडवत आहोत. आज येथे उपस्थित तुम्ही आगामी 10 वर्षात भारताच्या अंदाजे एक पंचमांश जिल्हयांना सांभाळणारे आहात. पुढल्या दहा वर्षात, भारताच्या एक पंचमांश जिल्हयांचे नशीब बदलणार आहे. तुम्ही कल्पना करु शकता की, देशाच्या एक पंचमांश जिल्हयांमध्ये या टीमने बदल घडवून आणला, तर मला नाही वाटत की भारताला बदलण्यात कुठला अडथळा येऊ शकेल. तुमच्याकडे यंत्रणा आहे, तुमच्याकडे निर्णय घेण्याचा अधिकार आहे, तुमच्याकडे मनुष्यबळ आहे, साधनसंपत्ती आहे काय नाही आहे ? सर्व काही आहे.

दुसरी बाब, कमीत कमी संघर्ष, कमीत कमी. मी असे म्हणू शकत नाही कि कुठेही काही होणार नाही. थोडाफार होऊ शकते. मात्र टीम तयार करण्याच्या दिशेने प्रयत्न. जुन्या अनुभवी माणसांना विचारणे. ज्या जिल्हयात तुम्हाला पाठवण्यात येईल, तिथे येथे बसलेल्यांपैकी काही जणांनी आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात काम केलेले असेल. तर जरा शोधा, गेल्या 25 वर्षात तुम्ही जिथे गेला असाल, तिथे त्यापूर्वी कोण कोणते अधिकारी येऊन गेले होते. त्यांना पत्र लिहा, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा, विचारा कि, जेव्हा तुम्ही येथे आला होतात, तेव्हा काय विशेष होते, कशा प्रकारे कामे व्हायची. तुम्हाला अगदी सहज 25 वर्षांचा इतिहास जाणून घेता येईल. तुम्ही एका धाग्यात गुंफले जाल. आणि अन्य बरेच जण असतील.

मनुष्यजीवन हे खूप वैशिष्टयपूर्ण आहे, त्याचा लाभ घेता येऊ शकेल. मनुष्य जेव्हा निवृत्त होतो आणि निवृत्तीवेतन यायला सुरुवात होते, तेव्हा निवृत्तीवेतन बौध्दिक स्वरुपासारखे असते. संपूर्ण ज्ञान निवृत्तीवेतनाबरोबर येते आणि ते इतके सूचना सल्ले देतात असे केले तर चांगले झाले असते. ते चुकीचे करत होते, हे माझे मत नाही. माझ्या वेळी करु शकलो नाही, मात्र त्यांना हे माहित होते की हे करण्यासारखे होते. काही कारणांमुळे करु शकलो नाही. जर तुमच्या माध्यमातून होत असेल, तर त्याची इच्छा असते की तुम्ही हे करा. म्हणूनच त्यांचे जे ज्ञान संपूर्ण आहे, ते आपल्याला उपलब्ध होते. तुम्ही ज्या परिसरात काम केले, तिथे गेल्या 20-22 वर्षात आठ-दहा अधिकारी जाऊन आले असतील, आज जिथे असाल, वेळ काढून दूरध्वनी करा, पत्र लिहा मला तुमचे मार्गदर्शन हवे आहे. मी तिथे जात आहे. तुम्ही इतकी वर्ष काम केलेत, जरा सांगा ते तुम्हाला लोाकांची नावं सांगतील. हे पहा, त्या गावात जी दोन लोक होती, ती खूप चांगली होती. केव्हाही मदतीला येऊ शकतात. आज त्यांचे वय वाढले असेल, मात्र त्यांची मदत होईल. तुमचा हा गुण चांगला वारसा आहे. तो सरकारी फायलीत नसतो आणि तुमच्या कार्यालयातही असा माणूस नसेल जो तुमचे बोट पकडून घेऊन जाईल. हे अनुभवी लोकांकडून मिळते. आपला हा प्रयत्न असायला हवा, यात आपण आणखी जोडू शकू ? आपण हे धरुन चालायला हवे की सरकारच्या शक्तीपेक्षा समाजाची ताकद अधिक असते. जे काम करण्यासाठी सरकारला अथक प्रयत्न करावे लागतात, ते काम समाज एकत्र आला तर चुटकीसरशी होते, कुणाला पत्ता लागत नाही. आपल्या देशाची वृत्ती आहे. नैसर्गिक संकटे येतात. आता समजा, सरकारी कार्यालयात खाद्यपदार्थांची पाकिटे पोहचवायची आहेत, तर कितीही व्यवस्थापन करा, खर्च करा दोन हजार, पाच हजार रुपये, मात्र समाजाला आवाहन केलंत की इतकी पाकिटे वितरित करण्यासाठी आपली ताकद कमी पडेल, इतकी लोकं येतील ही समाजाची ताकद आहे.

सरकार आणि समाजातील दरी ही केवळ राजकारणी भरुन काढू शकत नाहीत. आपण आपला स्वभाव बदलायला हवा. आपण निवडणुकीच्या माध्यमातून समाजाशी जोडले जायला हवे हे जरुरी नाही. आपल्या व्यवस्थेचा थेट संवाद समाजाशी व्हायला हवा. जे स्थिरस्थावर झाले आहेत, त्यांच्या माध्यमातून गेल्यास जास्त लाभ होत नाही. कारण त्यांचा विकास झालेला असतो, त्यामुळे त्यांची कक्षा देखील ठरलेली असते. तुम्ही नागरिकांशी थेट संवाद साधलात तर पहा, तुमची ताकद किती वाढेल. इतकी मदत मिळेल, ज्याची तुम्ही कल्पना करु शकणार नाही. तुमचे प्रत्येक काम ते करुन देतात. जर तुम्हाला शिक्षण क्षेत्रात काम करायचे आहे, तर तुम्ही सरकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जाल किंवा शिक्षकांबरोबर बैठक घ्याल ? तुम्ही पहाल, आपोआप एका शक्तीत बदल घडायला सुरुवात होईल. माझ्या म्हणण्याचे तात्पर्य हे आहे की, आपण स्वत:ला आपल्या कार्यालयाच्या बाहेर आणू शकतो, आपली व्यवस्था कार्यालयीन कक्षेच्या बाहेर आणून जोडू शकतो. आता अनुभवी अधिकाऱ्‍यांनी जी योजना तयार केली होती आणि तुम्हाला मी ज्या सूचना केल्या होत्या, सिन्हा यांनी त्या पहाव्यात, ते योग्य प्रकारे त्यावर चर्चा करतील आणि काही त्रुटी असल्यास शोधून काढतील. तुमच्या सादरीकरणाने या सर्व गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. तुमचा जेवढा अनुभव होता, ज्या परिस्थितीत तुम्ही काम केले, आपल्या सूचना पण दिल्यात. माझी इच्छा आहे की विभागाच्या लोकांनी गंभीरपणे याकडे योग्य दृष्टीकोनातून पाहावे कि काय होऊ शकते ? दहा पैकी दोन होतील, पण होतील तर खरे.

तुम्ही जिथे-जिथे जाल, तुम्हाला या प्रक्रिया, परंपरा विभिन्न प्रकारे आढळून येतील. जे नवीन आहेत, कोणी पाच वर्षांचा अनुभव असलेले असतील, कोणी सात वर्षांचा, त्यांना त्या परिसरात एखाद दुसरी समस्या आढळून आली, प्रमुख दोन समस्या. आणि तुम्हाला वाटले की मला दोन-अडीच वर्ष येथे काढायची आहेत तर मला या दोन समस्या सोडवायला हव्यात. त्यांना बसवा, बोलवा, अरे बघा, जरा अभ्‍यास करुन सांगा. काय उपाययोजना करायला हवी, कशा सुधारणा करायला हव्यात, तुम्ही मला सूचवा. तुम्ही पहाल, ते तुमच्या टीमचा एक भाग बनतील. ज्या कामासाठी तुम्हाला सहा महिने दयावे लागतील, ते काम ते एका आठवडयात करुन देतील. आपण आपल्या टीमचे वेगवेगळे भाग करायला हवेत, विस्तार करायला हवा. आपल्या प्रशासनात आपण लवचिकता आणली, तर तुम्ही पहाल खूप मोठे परिवर्तन घडू शकेल. हे तुमच्यावर आहे. मला आज हे सांगायचे नाही की भारत सरकारच्या या योजना आहेत, त्या लागू करा, फलाणा लागू करा. हा सरकारी अधिकाऱ्यांचा स्वभाव आहे कि वरुन दस्ताऐवज आली, तर त्याच्यासाठी ते बायबल होते. मात्र त्यात वेळोवेळी ताकद भरण्याची जबाबदारी त्या त्या व्यक्तीची असते. आणि तुम्ही ते केलत, तर तुम्ही चांगले परिणाम देऊ शकाल. कधी कधी आजारी पडलेले दोन चार जण दिसले की आपण म्हणतो विषाणू संसर्गाची साथ आली आहे म्हणून लोक आजारी आहेत पण त्याचवेळी आपण बघतो की यातच अनेक लोक असे आहेत जे आजारी पडले नाहीत. ते आजारी नाहीत कारण त्यांची रोगप्रतिकार क्षमता चांगली असल्यामुळे त्यांच्यावर परिणाम झाला नाही. आपण जिथे जाऊ तिथे समजा आळसाचा विषाणू असू दे, उदासीनतेचा असू दे, भ्रष्टाचाराचा असू दे, आपण जर अशी ताकद घेऊन जात असाल तर हा विषाणू संसर्ग असूनही औषधाची एक गोळीही आपल्याला टिकवून धरु शकते. एक गोळी जर परिवर्तन घडवू शकते तर मी तर माणूस धरु शकते. एक गोळी जर परिवर्तन घडवू शकते तर मी तर माणूस आहे, मी का नाही करु शकत ? रडत बसल्याने काही होत नाही.

तणाव आणि संघर्ष असताना परिस्थिती बदलता येत नाही. लोकांशी जेवढे जोडून घ्याल तेवढी तुमची ताकद वाढते. आपण अशा क्षेत्रात जात आहात. ज्या जबाबदाऱ्या निभावयला जात आहात.. राष्ट्राच्या जीवनात कधी कधी असे प्रसंग येतात जे आपल्याला कुठून कुठे नेऊन ठेवतात. आज जागतिक परिस्थितीचा मी अनुभव घेत आहे, या काळासारखी सुवर्णसंधी गमावण्याचा भारताला अधिकार नाही. सव्वाशे कोटी देशवासियांना भारतासाठीची अशी सुवर्णसंधी गमावण्याचा अधिकार नाही, यंत्रणेतल्या आपल्या सगळयांना ही सुवर्णसंधी घालवण्याचा अधिकार नाही, यंत्रणेतल्या आपल्या सगळयांना ही सुवर्णसंधी घालवण्याचा अधिकार नाही. मी अनुभवत असलेल्या संधी जागतिक स्तरावर क्वचित येतात. जे आले आहे ते हातातून निसटून जायला नको. भारताला नव्या उंचीवर नेण्यासाठी या संधीचा आपण कसा उपयोग करावा ? परिस्थितीचा फायदा कसा घ्यावा ? आपण जिथे आहोत तिथून, आपली जितकी जबाबदारी आहे, जितकी ताकद आहे त्याचा पुरेपुर वापर केला आणि निश्चिय केला की मला पुढे जायचे आहे तर देश पुढे जाईल. आपणा सर्वांना माझ्या शुभेच्छा.

अनेक अनेक धन्यवाद.

N.Chitale/S.Kane/S.Tupe/N.Sapre