Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सहाय्यक सचिवांचे समारोप सत्र – 2015 च्या भाप्रसे अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांसमोर केले सादरीकरण

सहाय्यक सचिवांचे समारोप सत्र – 2015 च्या भाप्रसे अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांसमोर केले सादरीकरण

सहाय्यक सचिवांचे समारोप सत्र – 2015 च्या भाप्रसे अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांसमोर केले सादरीकरण


2015 च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील सहाय्यक सचिवांनी प्रशिक्षण सत्र समारोपाच्या शेवटच्या दिवशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सादरीकरण केले.

अपघाग्रस्त, वैयक्तिक कार्बन पाऊल खुणांचा मागोवा, आर्थिक अंतर्भाव, ग्रामीण उत्पन्नात सुधारणा, आकडेवारीवर आधारीत ग्रामीण समृध्दी, वारसा पर्यटन, रेल्वे सुरक्षा आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आदी आठ निवडक संकल्पनांवर आधारीत सादरीकरणे करण्यात आली.

सर्वात कनिष्ठ आणि सर्वात वरिष्ठ अधिकारी परस्पर संवाद साधण्यात खूप काळ व्यतित करत आहेत ही उल्लेानीय बाब आहे, असे पंतप्रधानांनी यावेळी बोलातांना सांगितले. या संवांदांमधून तरुण अधिकाऱ्यांनी सकारात्मक गोष्टी आत्मसात करायलाच हव्यात असे पंतप्रधान म्हणाले. वस्तू सेवाकर अंमलबजावणी तसेच डिजिटल व्यवहार, विशेषत: भीम ॲपद्वारे होणाऱ्या व्यवहारांना चालना देण्यावर तरुण अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

सर्व अधिकाऱ्यांनी खात्यात सरकारी मार्केटप्लेस अर्थात (GEM) चा स्वीकार करण्याला गती देण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. यामुळे दलालांचे उच्चाटन होईल आणि सरकारची बचत होईल असे त्यांनी सांगितले.
उघडयावर शौच मोहिमेचे आणि ग्रामीण विद्युतीकरण ही उदाहरणे देऊन या अधिकाऱ्यांनी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जोमाने काम करण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले. 2022 पर्यंत स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी या अधिकाऱ्यांनी कार्य करावे सर्वसामान्य पार्श्वभूमी असलेल्या अधिकाऱ्यांनी तरुण विद्यार्थ्यांना भेटून त्यांना प्रोत्साहित करावे तसेच संवादातून करुणा निर्माण होते असेही पंतप्रधान म्हणाले.
राष्ट्र आणि नागरकिांचे कल्याण हे आजच्या अधिकाऱ्यांचे मुख्य लक्ष्य आहे असे ते म्हणाले. अधिकाऱ्यांनी संघ भावनेतून कार्य करावे असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

B.Gokhale/J.Patanakar/Anagha