पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंजाबमधल्या सरहिंद पाणी कालवा आणि राजस्थान पाणी कालव्याच्या पुनर्बांधणीसाठी आर्थिक मदत देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाणार आहे. या कालव्यांसाठी पाच वर्षांसाठी अनुक्रमे 205.75 आणि 620.42 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे.
परिणाम:-
· या दुहेरी जल कालवा प्रकल्पांमुळे पंजाबमधल्या मुख्तसर,फरीदकोट आणि फिरोजपूर जिल्ह्यांमधल्या 84,800 हेक्टरवर साचणाऱ्या पाण्याच्या समस्येपासून सुटका होईल.
· यामुळे नैऋत्य पंजाबमधल्या या दोन कालव्यांत पाण्याची उपलब्धता वाढेल.
· या कालव्यांमुळे 99,739 हेक्टरवर जलसिंचन वाढेल. याचा लाभ शेतकऱ्यांना होईल.
खर्च:-
या प्रकल्पांसाठीचे अर्थसहाय्य नाबार्डमार्फत दिले जाईल. या प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी तज्ञांची प्रकल्प आढावा समिती नेमली जाईल. या कालव्यांसाठीचा एकूण प्रस्तावित खर्च 1305.267 कोटी रुपये असून त्यापैकी 826.16 कोटी रुपये केंद्र सरकारकडून देण्यात येईल.
N.Sapre/R.Aghor/P.Malandkar