Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सरकारी ई बाजार (जीईएम) मंचाने एका वर्षात 1 लाख कोटी रुपयांच्या ऑर्डर्स मिळविल्याबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा


जीईएम या सरकारी बाजार मंचाने 2021-22 या आर्थिक वर्षात 1 लाख कोटी रुपयांच्या ऑर्डर्स मिळविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली आहे. यापैकी 57% किंमतीच्या ऑर्डर्स एमएसएमई क्षेत्रातील उत्पादनांसाठी आल्यामुळे हा जीईएम मंच एमएसएमई उद्योगांचे विशेषत्वाने सशक्तीकरण करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

 “@GeM_India या सरकारी बाजार मंचाने 2021-22 या आर्थिक वर्षात 1 लाख कोटी रुपयांच्या ऑर्डर्स मिळविल्याचे समजल्यानंतर मला प्रचंड आनंद झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही अत्यंत भरीव वाढ झाली आहे. जीईएम मंच एमएसएमई उद्योगांचे विशेषत्वाने सशक्तीकरण करत आहे, कारण या एका वर्षातील ऑर्डर्सपैकी 57% किमतीच्या ऑर्डर्स एमएसएमई क्षेत्रातील उत्पादनांसाठी आल्या आहेत.

***

ST/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com