Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सरकारच्या वरिष्ठ वैज्ञानिक अधिकाऱ्यांची पंतप्रधानांसह बैठक

सरकारच्या वरिष्ठ वैज्ञानिक अधिकाऱ्यांची पंतप्रधानांसह बैठक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केंद्र सरकारच्या वरिष्ठ वैज्ञानिक अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. सारस्वत, सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. आर. चिदंबरम्‌ आणि केंद्र सरकारच्या विज्ञान विभागांशी संबंधित सचिव सहभागी झाले होते.

विज्ञानातल्या विविध क्षेत्रातल्या प्रगतीची माहिती अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना दिली.

विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवनवीन शोध या भारताच्या प्रगतीच्या आणि समृध्दीच्या किल्ल्या आहेत. देशापुढील समस्या सोडवण्यासाठी विज्ञानाच्या वापराला सरकारचे प्राधान्य आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

क्रीडा क्षेत्रातील चमक शोधण्याबाबतचे उदाहरण देऊन पंतप्रधानांनी सांगितले की, शालेय स्तरावर विज्ञानात चमक दाखवणारे हुशार विद्यार्थी शोधण्यासाठी यंत्रणा असली पाहिजे.

खालच्या पातळीवर अनेक शोध लावले जात आहेत, असे ते म्हणाले. त्यांचे योग्‍य ते दस्तऐवजीकरण करण्यासाठी आणि त्याला पुढे वाव देण्यासाठी यंत्रणा स्थापन करण्यावर पंतप्रधानांनी भर दिला. संरक्षण क्षेत्रातल्या व्यक्ती करत असलेल्या नाविन्यपूर्ण शोधाचाही त्यांनी उल्लेख केला.

कृषी क्षेत्राात उच्च प्रथिनांच्या डाळी, पोषणयुक्त अन्न आणि एरंडेल बियांणाच्या दर्जात सुधारणा या क्षेत्राला प्राधान्य देऊन गती देण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली.

ऊर्जा क्षेत्रात, ऊर्जा आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सौर ऊर्जेवर लक्ष द्यायला पंतप्रधानांनी सांगितले.
आव्हानांवर मात करण्याच्या आणि सर्वसामान्य भारतीय नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी मार्ग शोधण्याच्या भारतीय शास्त्रज्ञांच्या क्षमतेवर पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव, वर्ष 2022 पर्यंत गाठता येणारी उद्दिष्टे निश्चित करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत

B.Gokhale