Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

समृद्धी आणि युवा सक्षमीकरणाच्या प्रवासात आपण पुढे वाटचाल करत असताना क्यूएस जागतिक भविष्यवेधी कौशल्य निर्देशांक मोलाचा आहे – पंतप्रधान


नवी दिल्ली , 16 जानेवारी 2025

क्यूएस जागतिक भविष्यवेधी कौशल्य निर्देशांक क्रमवारीत कॅनडा आणि जर्मनी यांच्या पुढे जात भारताने दुसरे स्थान मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. “हे पाहून माझे ह्रदय आनंदाने भरुन गेले आहे! गेल्या दशकात युवा पिढीला स्वावलंबी होऊन अर्थार्जन करता यावे यासाठीचे कौशल्य शिक्षण देऊन त्यांना सक्षम बनविण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे,” मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, समृद्धी आणि युवा सक्षमीकरणाच्या दिशेने आपण पुढे मार्गक्रमण करत असताना क्यूएस जागतिक भविष्यवेधी कौशल्य निर्देशांक क्रमवारीतील हे स्थान महत्त्वाचे आहे.

क्यूएस क्वाकरेली सायमण्डस् लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक नन्झिओ क्वाकरोली यांना दिलेल्या उत्तरात पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहीले आहे की,

“हे पाहून अतिशय आनंद होत आहे ! गेल्या दशकभरात आमच्या सरकारने युवा पिढीला स्वावलंबी होण्यासाठी आणि संपत्ती निर्माण करता यावी यासाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम केले आहे. आम्ही तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा वापर करुन भारताला नवकल्पना आणि उद्योगाचे केंद्र बनविले आहे. समृद्धी आणि युवा सक्षमीकरणाच्या दिशेने आपण पुढे मार्गक्रमण करत असताना क्यूएस जागतिक भविष्यवेधी कौशल्य निर्देशांक क्रमवारीतील हे स्थान खूप मोलाचे आहे.”

S.Patil/S.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai