Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

समर्पित भारत – युरोपिअन परिषदेदरम्यान पंतप्रधानांचे माध्यमांना दिलेले वक्तव्य (ऑक्टोबर 6, 2017)

समर्पित भारत – युरोपिअन परिषदेदरम्यान पंतप्रधानांचे माध्यमांना दिलेले वक्तव्य (ऑक्टोबर 6, 2017)

समर्पित भारत – युरोपिअन परिषदेदरम्यान पंतप्रधानांचे माध्यमांना दिलेले वक्तव्य (ऑक्टोबर 6, 2017)

समर्पित भारत – युरोपिअन परिषदेदरम्यान पंतप्रधानांचे माध्यमांना दिलेले वक्तव्य (ऑक्टोबर 6, 2017)


माननीय महोदय,

अध्यक्ष टस्क आणि अध्यक्ष जंकर,

प्रतिष्ठित प्रतिनिधी,

प्रसार माध्यमांचे सदस्य,

14 व्या भारत-युरोपियन युनियन शिखर परिषदेसाठी अध्यक्ष टस्क व अध्यक्ष जंकर यांचे स्वागत करतांना मला आनंद होत आहे.

भारत युरोपिअन युनियनसह करण्यात आलेल्या बहुविध क्षेत्रांमधील भागीदारीचे महत्व जाणतो. आम्ही आपल्या धोरणात्मक भागीदारीला प्राधान्य देत असून १९६२पासून युरोपिअन आर्थिक समुदायाबरोबर राजनैतिकसंबंध स्थापन करणाऱ्या राष्ट्रांपैकी भारत हा पहिला देश आहे.

युरोपियन युनियन हा आमचा सर्वात मोठा व्यापार भागीदार असून विदेशी गुंतवणुकीचा आमचा सर्वात मोठा स्त्रोत आहे.

जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण नैसर्गिक भागीदार आहोत. आपले जवळचे संबंध हे लोकशाही, कायद्या संदर्भातील नियम, मूलभूत स्वातंत्र्य आणि बहुसंस्कृतिवाद यांच्याबद्दलचा आदर असलेल्या सामायिक मूल्यांवर आधारित आहेत.

आम्ही बहु-ध्रुवीय, नियम-आधारित आंतरराष्ट्रीय आदेशाचे स्वप्न देखील सामायिक करतो. मागील वर्षी ब्रुसेल्सच्या 13 व्या शिखर परिषदेपासून आमच्या संबंधाने हळूहळू वेग घेताला असून, काही दिवसांपूर्वी अध्यक्ष जँकर यांनी दिलेल्या मैत्रीच्या आश्वासनामुळे भारत-युरोपीय संघाच्या संबंधांच्या नौकेला चांगले वळण लागले आहे.

मित्रांनो,

मी अध्यक्ष टास्क आणि अध्यक्ष जंकर यांचे मनापासून आभार मानतो, ज्यांनी आज आपल्या विस्तारित व्यापारी धोरणांवर सखोल आणि फलदायी चर्चा केली.

आम्ही भारत-ईयूमधील गुंतवणूकीला अनेक नवीन क्षेत्रात विस्तारित केले आहे. आम्ही सहमत आहोत की परस्पर विश्वास आणि सामंजस्यावर आधारित, आम्हाला अधिक व्यापक आणि फायदेशीर बनविण्यासाठी आमचे प्रयत्न चालूच ठेवणे आवश्यक आहे.

आज, आम्ही मागील परिषदेत घेतलेल्या निर्णय प्रक्रियेची पाहणी करून प्रगतीचा तसेच मागील वर्षी जे २०२० धोरण घोषित केले होते त्याचा ही आढावा घेतला आहे.

आम्ही आमचे सुरक्षा सहकार्य मजबूत करण्यासाठी आणि दहशतवादविरोधी काम करण्यास सहमती दर्शविली आहे. आम्ही केवळ या समस्येवरद्विपक्षीय संबंधअधिक बळकट करणार नाही,तर बहुपक्षीय मंचावर आमचा सहकार्य आणि समन्वय वाढविण्यात येईल.

आमचे दोन्ही देश २०१५च्या स्वच्छ ऊर्जा आणि हवामान बदलसंदर्भातील, पॅरिस करारासाठी प्रतिबद्ध आहेत . वातावरणीयबदल, ऊर्जा सुरक्षितता , परवडण्याजोग्या आणि टिकाऊ पुरवठा संबंधित करणे हा आमचा सामायिक अग्रक्रम आहे. नवीकरणीय ऊर्जेच्या उपयोजनाची किंमत कमी करण्यासाठी परस्पर सहकार्य करण्यास आम्ही आमची बांधिलकी पुन्हा एकदा विषद केली आहे.

आम्ही स्मार्ट सिटीज विकसित करण्याच्या आणि शहरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी युरोपियन युनियनशी आमचे सहकार्य बळकट करू.

मी आनंदित आहे की, भारत- युरोपिअन युनियन क्षैतिज नागरी विमानचालन करारआता कार्यान्वित केला गेला आहे. मला विश्वास आहे की, यामुळे आपल्यात हवाई संपर्क वाढेल आणि प्रत्यक्ष लोकांशी संपर्क वाढविण्यास मदत होईल.

आपल्या नातेसंबंधाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानातील सहकार्य तसेच संशोधन आणि नवकल्पना. यासंदर्भात, मी आज तरुणशास्त्रज्ञ आणि संशोधकांच्या परस्परिक भेटींवरील करण्यात आलेल्या कराराचे स्वागत करतो.

भारतातील युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेसह विकास प्रकल्पांसाठीच्या कर्ज करारांवरील स्वाक्षऱ्यांचे ही स्वागत करतो.

इंटरनॅशनल सोलरअलायन्सच्या सदस्य देशांमध्ये सौर-संबंधित प्रकल्पांनानिधी पुरवण्यासाठी युरोपियन इनव्हेस्टमेंट बँकच्या निर्णयाचा मी आभारी आहे.

आम्ही आमच्या व्यापार आणि गुंतवणूकीच्या प्रवाहांना बळकट करण्यासाठी तसेच युरोपिअन युनियनसह कार्य करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

महामहिम,

आपल्या नेतृत्वासाठी आणि भारत-ईयू धोरणात्मक भागीदारीला बळकटी देण्याबद्दल मी आपला आभारी आहे. मला आशा आहे की तुमची पुढील भारत भेट हि संक्षिप्त राहणार नाही.

धन्यवाद.

खूप धन्यवाद!

***

B.Gokhale