संसदेत पुनर्रचित व्यापारी जहाज वाहतूक विधेयक 2016 सादर करायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. व्यापारी जहाज वाहतूक कायदा, 1958 चे हे सुधारित रुप आहे. या विधेयकात व्यापारी जहाज वाहतूक कायदा, 1958 आणि किनारी जहाज कायदा, 1838 रद्द करण्याची तरतूद आहे.
वेळोवेळी करण्यात आलेल्या विविध सुधारणांमुळे व्यापारी जहाज वाहतूक कायदा 1958 क्लिष्ट झाला होता, आणि त्यातील कलमांची संख्या साडेपाचशे वर गेली होती. त्यात घट करुन नवीन विधेयकात 280 कलमे समाविष्ट करण्यात आली आहेत.
विधेयकातील तरतुदींमुळे भारतातील व्यापारी जहाज वाहतुकीचे नियम सोपे होतील. तसेच किनारी व्यापारी वाहतुकीला चालना मिळेल. खलाशांसाठी कल्याणकारी उपाययोजना जसे की, सागरी चाच्यांकडून अपहरण झाल्यास मजुरीची हमी यांसारख्या बाबींही या विधेयकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
B.Gokhale/J.Patanakar/Anagha